वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 फेब्रुवारी पृ. ३२
  • तुम्हाला लागू करता येतील अशी बायबलमधली रत्नं शोधा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला लागू करता येतील अशी बायबलमधली रत्नं शोधा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • शिका आणि सांगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?​—भाग १: सुरुवात अशी करा
    तरुण लोक विचारतात
  • गुप्त खजिन्यासारखा शोध घेत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 फेब्रुवारी पृ. ३२

अभ्यास करण्यासाठी एक टीप

तुम्हाला लागू करता येतील अशी बायबलमधली रत्नं शोधा

बायबल वाचत असताना त्याबद्दलची इतर माहिती शोधून तुम्ही शास्त्रवचनांतली अनमोल रत्नं शोधू शकता. पण आपण हे आणखी चांगल्या प्रकारे कसं करू शकतो?

खोलवर संशोधन करा.  बायबल अहवाल वाचत असताना त्याबद्दलची बारीकसारीक माहिती शोधून काढा. जसं की, तो अहवाल कोणी लिहिलाय, कोणासाठी लिहिलाय आणि कधी लिहिलाय ते शोधा. तसंच, त्या वेळी परिस्थिती कशी होती, अहवालात लिहिलेल्या घटनेच्या आधी काय घडलं होतं, आणि नंतर काय झालं यांबद्दल माहिती घ्या.

अहवालातून काय शिकायला मिळतं ते पाहा.  तुम्ही हे पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर संशोधन करून शोधू शकता: ‘त्यात असलेल्या लोकांच्या भावना काय होत्या? त्यांनी कोणते गुण दाखवले? मी ते गुण कसे दाखवू शकतो किंवा कसे टाळू शकतो?’

शिकलेल्या गोष्टी लागू करा.  तुम्हाला शिकायला मिळालेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या सेवाकार्यात किंवा इतरांशी वागताना लागू करू शकता. असं केल्यामुळे तुम्ही देवाकडून मिळणारी बुद्धी दाखवत असता. कारण बायबल म्हणतं: “शहाणा या गोष्टींकडे लक्ष देईल.”​—स्तो. १०७:४३.

  • टीप: आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत ‘देवाच्या वचनातली अनमोल रत्नं’ या भागात बायबलच्या एखाद्या अहवालाबद्दल माहिती दिलेली असते. या माहितीमुळे अहवालातून शिकायला मिळालेल्या गोष्टी लागू करायला कशी मदत होते याकडे लक्ष द्या. या भागात स्वतःला विचारण्यासाठी काही प्रश्‍न दिलेले असतात. तसंच, यात मनन करण्यासाठी काही मुद्दे दिलेले असतात आणि विचार करण्यासाठी काही चित्रंही दिलेली असतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा