वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp24 क्र. १ पृ. १४-१५
  • काय बरोबर आणि काय चुकीचं: तुम्हाला निवड करावी लागेल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काय बरोबर आणि काय चुकीचं: तुम्हाला निवड करावी लागेल
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलमध्ये योग्य आणि अयोग्य यांसाठी जे स्तर ठरवले आहेत ते आजही तितकेच उपयोगी आहेत का?
    आणखी विषय
  • जे यहोवावर प्रेम करतात ते नीतिमत्त्वावर प्रेम करतात!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • कोणाच्या दर्जांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • काय बरोबर आणि काय चुकीचं: बायबल​—एक भरवशालायक मार्गदर्शक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२४
wp24 क्र. १ पृ. १४-१५
आधीच्या लेखात दाखवलेली तरुण व्यक्‍ती डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यावर आनंदाने दूरवर पाहत आहे.

काय बरोबर आणि काय चुकीचं: तुम्हाला निवड करावी लागेल

बरोबर काय आणि चुकीचं काय हे आपण कशाच्या आधारावर ठरवतो; तसंच आपण त्याप्रमाणे जगतो की नाही यावरून ठरेल की, पुढे आपण आनंदी होऊ की नाही. आणि ही गोष्ट यहोवा देवाला माहीत आहे. त्यामुळे आपण त्याच्या स्तरांनुसार जगावं अशी त्याची इच्छा आहे.

यहोवाला वाटतं की आपण शांतीने आणि आनंदाने जगावं.

“मी यहोवा तुझा देव आहे. मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो, आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो. तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल! मग तुझी शांती नदीसारखी, आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.”​—यशया ४८:१७, १८.

आपलं जीवन कसं असलं पाहिजे हे देवालाच सगळ्यात चांगलं माहीत आहे, कारण त्याने आपल्याला घडवलंय. आपण त्याचं ऐकावं आणि त्याप्रमाणे वागावं असं त्याला वाटतं. यामुळे आपलं भलं होईल. जेव्हा आपण देवाच्या आज्ञांनुसार चालू तेव्हा आपल्याला अशी शंका नसेल की आपण केलेली निवड बरोबर आहे की चुकीची आहे. आपण खातरी ठेवू शकतो की, आपण बरोबरच निवड केली आहे. आणि यामुळे आपण नेहमी शांतीने आणि आनंदाने राहू.

यहोवा आपल्याला अशा गोष्टी करायला सांगत नाही ज्या आपल्याला जमणार नाहीत.

“आज मी तुम्हाला देत असलेली आज्ञा तुमच्यासाठी कठीण नाही किंवा तुमच्यापासून फार दूरही नाही.”​—अनुवाद ३०:११.

बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल देवाचा जो दृष्टिकोन आहे, त्याप्रमाणे जगण्यासाठी आपल्याला कदाचित आपल्या विचारांत आणि वागण्यात बदल करावे लागतील. पण, यहोवा आपल्याकडून खूप जास्तीची अपेक्षा करत नाही. कारण आपला निर्माणकर्ता या नात्याने आपली किती क्षमता आहे हे त्याला चांगलं माहीत आहे. आपण जितकं जास्त यहोवाला जाणून घेऊ तितकं आपल्या समजेल की, “त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”​—१ योहान ५:३.

दोन साक्षीदार बहिणी एका स्त्रीसोबत “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या पुस्तकाचा वापर करून बायबलचा अभ्यास करत आहेत.

यहोवा वचन देतो की त्याच्या स्तरांनुसार जगणाऱ्‍यांना तो मदत करेल.

“कारण मी तुझा देव यहोवा, तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे, ‘घाबरू नकोस, मी तुला मदत करीन.’”​—यशया ४१:१३.

बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल देवाच्या स्तरांप्रमाणे आपण जगू शकतो. कारण त्यासाठी तो आपल्याला मदत करेल. तो आपल्याला बायबलद्वारे मदत करू शकतो. त्यातून आपल्याला प्रोत्साहन आणि आशा मिळते.

बायबलच्या स्तरांनुसार जगल्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना हे जाणवलंय की, त्यांचं जीवन सुधारलंय. तेव्हा बायबलमध्ये कोणते चांगले सल्ले दिले आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे बायबल आधारित माहितीपत्रक वाचू शकता. याची मोफत प्रत jw.org/mr वर मिळेल. या माहितीपत्रकात खाली दिलेले धडे दिलेत:

  • देव आपल्याला आनंदी राहायला कसं शिकवतो?

  • बायबल आपल्याला एक आशा देतं

  • बायबलमधल्या माहितीवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

तुम्ही जसजसा देवाच्या वचनाचा, म्हणजे बायबलचा अभ्यास कराल तसतसं तुम्हाला जाणवेल की, यातली माहिती जुनी नाही; तर ती “आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक” आहे. (स्तोत्र १११:८) खरंतर, जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, बायबलमधल्या नैतिक स्तरांनुसार जगणं. पण देव आपल्याला तसं करण्याची जबरदस्ती करत नाही. (अनुवाद ३०:१९, २०; यहोशवा २४:१५) ही निवड प्रत्येकाला स्वतः करावी लागेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा