वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 नोव्हेंबर पृ. ३२
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “उपासनेची गीतं” तोंडपाठ करा
  • आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • धैर्य उत्पन्‍न करणारी राज्यगीतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • यहोवाचे स्तवन करू या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • यहोवाचे गुणगान करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 नोव्हेंबर पृ. ३२

अभ्यास करण्यासाठी एक टीप

“उपासनेची गीतं” तोंडपाठ करा

“जेव्हा मला कमीपणाची भावना सतावते, तेव्हा यहोवा मला JW ब्रॉडकास्टिंगच्या गीतांनी प्रोत्साहन देतो.”​—लॉरेन, अमेरिका.

खूप पूर्वीपासून आपण उपासनेसाठी ‘उपासनेच्या गीतांचा’ वापर करत आलो आहोत. (कलस्सै. ३:१६) ही गीतं तोंडपाठ केल्यामुळे तुमच्याकडे गीत पुस्तक नसलं किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण नसलं, तरी तुम्हाला फायदा होईल. ही गीतं तोंडपाठ करण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टी करून पाहा.

  • गीताचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यातले बोल लक्ष देऊन वाचा. एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे ती आठवायला सोपी जाते. jw.org वर या सगळ्या गीतांचे बोल उपलब्ध आहेत. यांमध्ये खास गीतं आणि लहान मुलांसाठी असलेली गीतंसुद्धा येतात. यासाठी तुम्ही लायब्ररी विभागात संगीत या शीर्षकाखाली या गीतांचे बोल पाहू शकता.

  • गीतांचे बोल लिहून काढा. यामुळे गीतांचे बोल तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात राहतील.​—अनु. १७:१८.

  • मोठ्याने सराव करा. गीतं पुन्हापुन्हा वाचा किंवा गा.

  • तुम्हाला किती आठवतं ते पाहा. गीतांचे बोल न बघता ते आठवायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला कितपत आठवतंय ते तपासून पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा