थोडक्यात परिचय
आज जगात जे काही चाललं आहे त्यावरून असं वाटतं का, की लवकरच या जगाचा अंत होणार आहे? जर होणार असेल, तर त्यातून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि अंत झाल्यानंतर काय होईल? या प्रश्नांची उत्तरं देवाने पवित्र शास्त्रात, म्हणजे बायबलमध्ये दिली आहेत. ती तुम्हाला या मासिकात वाचायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप दिलासा मिळेल!