वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w20 फेब्रुवारी पृ. २६-३०
  • चांगल्या उदाहरणांवरून शिकल्यामुळे मला बरेच आशीर्वाद मिळाले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगल्या उदाहरणांवरून शिकल्यामुळे मला बरेच आशीर्वाद मिळाले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रचारकार्याबद्दल माझं प्रेम वाढलं
  • खास पायनियर म्हणून क्विबेकमध्ये परत येणं
  • प्रवासी कार्यासाठी मिळालेलं आमंत्रण
  • एक महत्त्वाचं वर्ष
  • दुसऱ्‍या क्षेत्रात मिळालेली नेमणूक
  • “युद्ध आपलं नाही, देवाचं आहे”
    सावध राहा!—२०००
  • यहोवा मला माझ्या तरुणपणापासून शिकवत आला आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • इतरांबद्दल काळजी असल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • यहोवाच्या संघटनेत स्वतःला व्यस्त ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
w20 फेब्रुवारी पृ. २६-३०

जीवन कथा

चांगल्या उदाहरणांवरून शिकल्यामुळे मला बरेच आशीर्वाद मिळाले

लियॉन्स क्रॅपॉल्ट

लियॉन्स क्रॅपॉल्ट तरुण असताना.

लहान असताना प्रचार करणं मला कठीण वाटायचं. पुढे जसजसं मी मोठा होत गेलो तसतसं मला अनेक नेमणुकी मिळत गेल्या. पण त्या नेमणुकी हाताळणं मला जमेल का याबद्दल मला शंका वाटत होती. मग, या भीतीवर मात करण्यासाठी काही बांधवांच्या चांगल्या उदाहरणांमुळे मला कशी मदत झाली हे मी तुम्हाला सांगतो. तसंच, त्यांच्यामुळे मला ५८ वर्षं पूर्ण वेळेच्या सेवेत कोणते अनोखे आशीर्वाद अनुभवता आले हेसुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे.

माझा जन्म कॅनडा इथल्या क्विबेक शहरात झाला. तिथे फ्रेंच भाषा बोलली जायची. माझे आईवडील लॉईस आणि झॅलिया यांनी खूप प्रेमाने मला लहानाचं मोठं केलं. माझे बाबा शांत स्वभावाचे होते आणि त्यांना वाचनाची खूप आवड होती. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला लेखनाची आवड होती आणि पुढे जाऊन पत्रकार बनण्याचीही माझी इच्छा होती.

मी बारा वर्षांचा असताना माझ्या वडिलांसोबत काम करणारे रडॉल्फ सूसी आणि त्यांचे मित्र आमच्या घरी आले. ते यहोवाचे साक्षीदार होते. मला साक्षीदारांबद्दल जास्त काही माहीत नव्हतं आणि त्यांच्या धर्माबद्दल जाणून घ्यायची इतकी काही इच्छा नव्हती. पण, त्यांनी आमच्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून दिली आणि ती तर्काला पटणारी होती. ते आमच्याशी प्रेमळपणे बोलले. माझ्या आईवडिलांनाही त्यांचं बोलणं खूप आवडलं आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करायला तयार झालो.

त्या वेळी मी एका कॅथलिक शाळेत जायचो. मी बायबल अभ्यासातून काय शिकतो हे मी कधीकधी माझ्या वर्गातल्या मुलांना सांगायचो. पण कालांतराने याबद्दल माझ्या शिक्षकांना कळलं. ते चर्चचे पाळक होते. मी जे बोलत होतो ते चुकीचं आहे हे शास्त्रवचनांतून सिद्ध करण्याऐवजी, त्यांपैकी एकाने संपूर्ण वर्गासमोर मी बंडखोर आहे असं म्हटलं. ती तणावपूर्ण परिस्थिती होती तरी त्याचे चांगले परिणाम घडून आले. कारण यामुळे मी पाहू शकलो की शाळेत जी धर्माची शिकवण दिली जायची ती बायबलवर आधारित नाही. मला जाणीव झाली की मला ही शाळा सोडली पाहिजे. आईवडिलांची परवानगी मिळाल्यावर मी एका दुसऱ्‍या शाळेत जाऊ लागलो.

प्रचारकार्याबद्दल माझं प्रेम वाढलं

मी बायबल अभ्यास सुरू ठेवला पण मी भरभर आध्यात्मिक प्रगती केली नाही. कारण मला घरोघरचं प्रचारकार्य करण्याची भीती वाटायची. त्या काळी कॅथलिक चर्चचा भरपूर दबदबा होता आणि त्यामुळे प्रचारकार्याचा खूप विरोध केला जायचा. त्या वेळी मॉरिस डूपलॅसिस हे क्विबेकमधले एक राजकीय पुढारी होते आणि त्यांचा चर्चसोबत चांगला नातेसंबंध होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे लोकांच्या जमावाने साक्षीदारांना त्रास दिला आणि त्यांच्यावर हल्लासुद्धा केला. त्या वेळी साक्षीदारांना प्रचार करण्यासाठी धैर्य दाखवण्याची गरज होती.

या भीतीवर मात करण्यासाठी बंधू जॉन रे यांनी मला मदत केली. ते गिलियड प्रशालेच्या नवव्या वर्गातून पदवीधर झाले होते. बंधू जॉन खूप अनुभवी आणि नम्र होते. त्यांनी फार कमी वेळा मला थेटपणे सल्ले दिले. खरंतर, त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळेच मला खूप काही शिकायला मिळालं. बंधू जॉन यांना फ्रेंच भाषा बोलायला अवघड जायचं. त्यामुळे सेवाकार्यात मी बऱ्‍याच वेळा त्यांच्यासोबत असायचो आणि त्यांना मदत करायचो. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्यामुळे मी यहोवाचा साक्षीदार बनण्याचा निर्णय घेऊ शकलो. शेवटी, साक्षीदारांना पहिल्यांदा भेटल्याच्या दहा वर्षांनंतर, २६ मे १९५१ रोजी मी बाप्तिस्मा घेतला.

लियॉन्स क्रॅपॉल्ट आणि जॉन रे हे त्यांच्या काही मित्रांसोबत.

जॉन रे (क) यांच्या चांगल्या उदाहरणामुळे मला (ख) घरोघरचं साक्षकार्य करण्याच्या माझ्या भीतीवर मात करायला मदत झाली

क्विबेकमधली आमची मंडळी छोटी होती पण त्यात बरेच पायनियर होते. त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे मला पायनियरींग करण्याचं प्रोत्साहन मिळालं. त्या काळी आम्ही घरोघरच्या प्रचारकार्यात कोणत्याच साहित्यांचा वापर करत नव्हतो. फक्‍त बायबलचा वापर करायचो. त्यामुळे आम्हाला शास्त्रवचनं प्रभावीपणे कशी वापरायची हे शिकून घेणं गरजेचं होतं. म्हणून मग, सत्याची बाजू मांडण्याकरता कोणती बायबल वचनं मदतीची ठरतील हे लक्षात ठेवण्यासाठी मी अभ्यास करू लागलो. असं असलं तरी, प्रचारात बरेच जण बायबलमधून वाचायलाही नकार द्यायचे, कारण ते फक्‍त कॅथलिक चर्चने मान्यता दिलेलं बायबल वाचायचे.

मग १९५२ मध्ये सिमोने पॅट्री हिच्यासोबत माझं लग्न झालं. सिमोने आमच्याच क्षेत्रात राहायची. पुढे आम्ही माँट्रिऑल या ठिकाणी राहायला गेलो आणि एका वर्षानंतर आम्हाला मुलगी झाली. तिचं नाव आम्ही लॅझ ठेवलं. लग्नाच्या काही काळाआधी मी पायनियरींग थांबवली होती, पण सिमोने आणि मी आमची जीवनशैली होईल तितकी साधी ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण असं केल्यामुळे आम्हाला मंडळीतल्या कार्यांमध्ये जास्तीत जास्त हातभार लावणं शक्य होणार होतं.

मग दहा वर्षांनी मी पुन्हा पायनियरींग करण्याचा विचार करू लागलो. १९६२ मध्ये कॅनडा बेथेलमध्ये मी वडिलांसाठी असलेल्या राज्य सेवा प्रशालेसाठी गेलो. ही प्रशाला महिन्याभराची होती. मी तिथे कॅमील वॉलेटसोबत राहिलो. कॅमीलचं लग्न झालेलं आणि त्याला मुलं होती, तरी त्याचं पायनियरींग करण्याचं ध्येय होतं. सेवाकार्याबद्दलचा त्याचा आवेश पाहून मी थक्क झालो. कारण त्या काळी क्विबेकमध्ये असे फार कमी पालक होते जे पायनियरींगसुद्धा करायचे. आम्ही सोबत असताना त्याने मला माझ्या परिस्थितीबद्दल विचार करायला सांगितलं. काही महिन्यांनी मला जाणीव झाली की मी पुन्हा पायनियरिंग सुरू करू शकतो. काहींनी माझ्या निर्णयावर प्रश्‍न उचलला तरीही मी पायनियरिंग सुरू केली, कारण मला माहीत होतं की सेवाकार्यात जास्त करण्यासाठी यहोवा मला मदत करेल.

खास पायनियर म्हणून क्विबेकमध्ये परत येणं

१९६४ मध्ये सिमोने आणि मला आमच्या शहरात, क्विबेकमध्ये खास पायनियर म्हणून नेमणूक मिळाली. तिथे आम्ही बरीच वर्षं सेवा केली. क्विबेकमध्ये आधी प्रचारकार्याला खूप विरोध व्हायचा पण परत आल्यावर आम्हाला जाणवलं की त्याचं प्रमाण आता कमी झालं होतं. पण काही लोक अजूनही आमचा विरोध करत होते.

मग एका शनिवारी दुपारी सॅन्ट-मॅरी या ठिकाणी मला अटक करण्यात आली. हे लहान शहर क्विबेकपासून फार लांब नव्हतं. एका पोलीस अधिकाऱ्‍याने मला धरलं आणि जेलमध्ये टाकलं. कारण त्याचं म्हणणं होतं की मी परवानगीशिवाय घरोघरचं प्रचारकार्य करत आहे. नंतर मला बार्योझॉन नावाच्या न्यायाधीशासमोर आणण्यात आलं. लोक त्यांना घाबरायचे. त्यांनी मला विचारलं की माझा वकील कोण असणार आहे. मी जेव्हा यहोवाचा साक्षीदार असलेल्या वकीलांचं, म्हणजे ग्लेन हाऊa यांचं नाव घेतलं तेव्हा ते अगदी चिंतित होऊन म्हणाले “अरे तो! नको, नको!” कारण ग्लेन हाऊ हे नावाजलेले वकील होते आणि त्यांनी आधीसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांच्या बऱ्‍याचशा केसेस यशस्वीपणे लढल्या होत्या. कोर्टाने मला लवकरच कळवलं की माझ्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप रद्द करण्यात आले आहेत.

क्विबेकमध्ये प्रचारकार्याला विरोध होत असल्यामुळे आमच्या लहान मंडळीला सभांसाठी भाड्याने ठिकाण मिळणं कठीण गेलं. शेवटी आम्हाला एक जुनं गॅरेज सापडलं. पण त्यात इलेक्ट्रिक हिटरची सोय नव्हती. त्या कडाक्याची थंडीत ऊब मिळण्यासाठी बांधवांनी तेलावर चालणाऱ्‍या हिटरची सोय केली. सहसा भाऊबहीण सभा सुरू होण्याच्या काही तासांआधीच यायचे आणि आम्ही त्या हिटरभोवती जमून एकमेकांना प्रोत्साहन देणारे अनुभव सांगायचो.

कित्येक वर्षं प्रचारकार्यामुळे मिळालेले चांगले परिणाम पाहून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. १९६०च्या दशकात क्विबेक शहराच्या क्षेत्रात, कोट नॉर आणि गॅस्पे या तिन्ही ठिकाणी फार कमी मंडळ्या होत्या आणि त्या लहान होत्या. पण आज या क्षेत्रांमध्ये दोनपेक्षा जास्त विभाग (सर्किट) आहेत आणि अनेक सुंदर राज्य सभागृहसुद्धा आहेत.

प्रवासी कार्यासाठी मिळालेलं आमंत्रण

१९७७ मध्ये कॅनडातल्या टराँटो या ठिकाणी असलेल्या सभेसाठी बंधू लियॉन्स क्रॅपॉल्ट इतर प्रवासी पर्यवेक्षकांसोबत उपस्थिती राहिले.

१९७७ मध्ये कॅनडातल्या टराँटो या ठिकाणी, मी प्रवासी प्रर्यवेक्षकांच्या सभेसाठी उपस्थित राहिलो

१९७० साली सिमोने आणि मला प्रवासी कार्यात सेवा करण्याची नेमणूक मिळाली. नंतर १९७३ मध्ये मला प्रांतीय पर्यवेक्षकाची नेमणूक मिळाली. त्या काळी, लॉरिया सॉमियुरb आणि डेवीड स्प्लेनc या अनुभवी बांधवांकडून मी बरंच काही शिकलो. या दोन्ही बांधवांनी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा केली होती. प्रत्येक संमेलनानंतर मी आणि डेवीड एकमेकांना सांगायचो की आम्ही आमच्या शिकवण्याच्या पद्धतीत आणखी सुधार कसा करू शकतो. मला आठवतं की डेवीडने मला एकदा सांगितलं: “लियॉन्स, मला तुझं शेवटचं भाषण आवडलं. ते चांगलं होतं. पण तू इतकी माहिती दिलीस की त्यातून मी तीन टॉक बनवू शकलो असतो!” त्यांचं म्हणणं बरोबर होतं कारण माझ्या भाषणांत बरीचशी माहिती असायची. मला पटलं की मला मुद्देसूद भाषणं देणं शिकून घ्यावं लागणार होतं.

बंधू लियॉन्स क्रॅपॉल्ट यांनी कॅनडातल्या ज्या शहरांमध्ये सेवा केली ती शहरं दाखवणारा नकाशा: सॅन्ट-मॅरी, क्विबेक शहर, माँट्रिऑल आणि टराँटो.

कॅनडाच्या पूर्वेकडे असलेल्या बऱ्‍याचशा शहरांत मी सेवा केली

विभागीय पर्यवेक्षकांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी प्रांतीय पर्यवेक्षकांना देण्यात आली होती. खरंतर, क्विबेकमधले बरेचसे प्रचारक मला चांगल्या प्रकारे ओळखत होते. मी जेव्हा मंडळ्यांना भेटी द्यायचो तेव्हा त्यांना सहसा माझ्यासोबत प्रचार करण्याची इच्छा असायची. मला त्यांच्यासोबत प्रचार करताना खूप आनंद मिळायचा खरा, पण मी विभागीय पर्यवेक्षकांना हवा तितका वेळ देत नव्हतो. एका प्रसंगी विभागीय पर्यवेक्षकांनी मला प्रेमळपणे सांगितलं की “तुम्ही बांधवांना वेळ देताय ही चांगली गोष्टय, पण या आठवडी तुम्ही मला भेटायला आला आहात हे विसरू नका. मलाही प्रोत्साहनाची गरज आहे!” या प्रेमळ सल्ल्यामुळे मला माझ्या कामात संतुलन ठेवायला खूप मदत झाली.

१९७६ मध्ये एक अनपेक्षित आणि दुःखद घटना घडली. माझी प्रिय पत्नी सिमोने खूप आजारी पडली आणि वारली. ती माझी चांगली साथीदार होती कारण तिचा स्वभाव निःस्वार्थ होता आणि तिचं यहोवावर खूप प्रेम होतं. यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिल्यामुळे मला या दुःखातून बाहेर पडायला मदत झाली. मी यहोवाचा खूप आभारी आहे की त्याने मला या कठीण परिस्थितीत मदत केली. पुढे जाऊन मी कॅरलीन एलियट हिच्याशी लग्न केलं. ती आवेशी पायनियर होती आणि इंग्रजी भाषा बोलायची. क्विबेकमध्ये प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी ती सेवा करण्यासाठी आली होती. कॅरलीनचा स्वभाव मनमिळाऊ आहे आणि ती खासकरून लाजाळू स्वभावाच्या व ज्यांना एकटेपणा जाणवतो अशांसोबत मैत्री करते. प्रवासीकार्यात मला तिची चांगली साथ मिळाली आणि यामुळे मला खूप मदत झाली आहे.

एक महत्त्वाचं वर्ष

जानेवारी, १९७८ साली क्विबेकमध्ये पहिली पायनियर सेवा प्रशाला आयोजित करण्यात आली. तिथे मला प्रशिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. पण याआधी मी कधीही पायनियर प्रशालेला उपस्थित राहिलो नव्हतो किंवा प्रशालेचं पुस्तकही पाहिलं नव्हतं आणि यामुळे मला खूप भीती वाटत होती. माझ्यासाठी सर्वकाही नवीन होतं. प्रशालेत शिकवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती पण तिथे सर्व अनुभवी पायनियर असल्यामुळे, माझी भीती निघून गेली. जरी मी तिथे शिकवत होतो तरी मला विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकायला मिळालं!

त्यानंतर १९७८ मध्ये माँट्रिऑल ऑलंपिक स्टेडियम या ठिकाणी “विक्टोरीयस फेथ” हे शीर्षक असलेलं आंतरराष्ट्रीय अधिवेशन झालं. ते अधिवेशन क्विबेकमध्ये झालेलं तेव्हापर्यंतचं सर्वात मोठं अधिवेशन होतं. त्याची उपस्थिती ८०,००० पेक्षा जास्त होती. मला त्या अधिवेशनात वृत्त सेवा विभागात काम करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं. त्या वेळी मी बऱ्‍याच पत्रकारांशी बोललो. त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल लिहिलेल्या चांगल्या गोष्टी वाचून मला खूप आनंद झाला. २० पेक्षा जास्त तासांसाठी बऱ्‍याच मुलाखती टेलिव्हिजन आणि रेडिओवर दाखवण्यात आल्या. तसंच, शेकडो लेखसुद्धा छापण्यात आले. यामुळे लोकांना जबरदस्त साक्ष मिळाली.

दुसऱ्‍या क्षेत्रात मिळालेली नेमणूक

१९९६ मध्ये माझ्या जीवनात एक मोठा बदल झाला. बाप्तिस्म्यानंतर मी अनेक वर्षं क्विबेक या फ्रेंच भाषिक क्षेत्रात सेवा केली होती, पण त्या वर्षी मला टराँटो या ठिकाणी इंग्रजी भाषेच्या क्षेत्रात सेवा करण्याची नेमणूक मिळाली. इंग्रजी भाषा इतकी काही चांगली येत नसल्यामुळे मला भाषणं द्यायची भीती वाटत होती. त्या वेळी मला जाणवलं की मला आता वारंवार प्रार्थना करण्याची आणि यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्याची गरज आहे.

टराँटोमध्ये सेवा करण्याआधी मला भीती वाटली, पण आज मी म्हणू शकतो की मी दोन वर्षं तिथे आनंदाने सेवा केली. मला इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे बोलता यावी म्हणून कॅरलीनने खूप धीराने मला मदत केली आणि बांधवांनीसुद्धा मला खूप साथ दिली व प्रोत्साहन दिलं. तिथे आमचे लवकरच बरेचसे नवीन मित्र बनले.

आठवड्याच्या शेवटी असलेल्या संमेलनासाठी मला बरीचशी तयारी आणि इतर कामं करावी लागायची. पण सहसा मी शुक्रवारी संध्याकाळी किमान एक तास तरी घरोघरचा प्रचार करायचो. काही जणांनी कदाचित असा विचार केला असेल की ‘संमेलनाच्या तयारीत भरपूर कामं असतात मग त्याच्या आदल्या दिवशी प्रचाराला जाण्याची काय गरज आहे?’ खरंतर, प्रचारकार्यात लोकांशी चांगली चर्चा केल्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळायचं. आणि आजही प्रचारकार्य केल्यामुळे मला आनंद होतो.

मग १९९८ मध्ये आम्हाला माँट्रिऑलमध्ये खास पायनियर म्हणून नेमणूक मिळाली. अनेक वर्षं मला बऱ्‍याच नेमणुकी मिळाल्या जसं की, खास सार्वजनिक साक्षकार्य आयोजित करणं आणि यहोवाच्या साक्षीदारांबद्दल गैरसमज दूर करण्यासाठी बातम्या देणाऱ्‍या माध्यमांशी बोलणं. कॅरलीन आणि मला अशा लोकांना प्रचार करायला खूप आवडतं जे नुकतेच कॅनडामध्ये स्थलांतरित झाले आहेत आणि ज्यांना बायबलबद्दल शिकण्याची मनापासून आवड आहे.

बंधू लियॉन्स क्रॅपॉल्ट, त्यांची पत्नी कॅरलीनसोबत.

माझी पत्नी कॅरलीन हिच्यासोबत

यहोवाच्या सेवेत घालवलेल्या ६८ वर्षांबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा यहोवाने मला खूप आशीर्वाद दिले हे मला जाणवतं. सर्वात जास्त आनंद मला सेवाकार्य केल्यामुळे आणि लोकांना सत्यात येण्यासाठी मदत केल्यामुळे झाला. माझी मुलगी लॅझ आणि जावई यांना मुलं झाली. मग पुढे जाऊन त्यांनीसुद्धा पायनियरिंग सुरू केली. सेवाकार्यात आजही माझ्या मुलीचा आवेश पाहून मला खरोखर आनंद होतो. मी खासकरून अशा बांधवांचा खूप आभारी आहे, ज्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे आणि त्यांनी दिलेल्या सुज्ञ सल्ल्यांमुळे मला आध्यात्मिक प्रगती करायला आणि माझ्या नेमणुकी पूर्ण करायला मदत झाली. मला जाणवलं आहे की कोणतीही नेमणूक विश्‍वासूपणे पूर्ण करणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण यहोवाच्या पवित्र आत्म्यावर पूर्णपणे विसंबून राहतो. (स्तो. ५१:११) मी यहोवाचा नेहमी आभारी राहीन की त्याने मला त्याच्या नावाची स्तुती करण्याची मौल्यवान संधी दिली आहे.—स्तो. ५४:६.

a सावध राहा!  मे, २००० यात डब्ल्यू. ग्लेन हाऊ यांची जीवन कथा “युद्ध आपलं नाही, देवाचं आहे” पाहा.

b “आय फाऊंड समथींग वर्थ फायटींग फॉर” ही लॉरिया सॉमियुर यांची जीवन कथा टेहळणी बुरूज -E १५ नोव्हेंबर, १९७६ मध्ये पाहा.

c डेवीड स्प्लेन हे यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा