वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 जुलै पृ. १४-१५
  • ३१ ऑगस्ट–६ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३१ ऑगस्ट–६ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 जुलै पृ. १४-१५

३१ ऑगस्ट–६ सप्टेंबर

यिर्मया ३१

गीत २७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “मी . . . एक नवीन करार करीन”

(१० मि.)

यहोवाने मोशेच्या नियमशास्त्राच्या जागी “नवीन करार” करण्याचं वचन दिलं होतं. हा करार कायम टिकेल आणि यामुळे बऱ्‍याच लोकांना फायदा होईल (यिर्म ३१:३१, ३२; जेरमाया अध्या. १४ ¶४-mwbr)

हा करार यहोवा आणि देवाच्या इस्राएलमध्ये असणार होता. तसंच यामुळे यहोवाला पापांची क्षमा करायला एक कायदेशीर आधार मिळणार होता (यिर्म ३१:३३, ३४; जेरमाया अध्या. १४ ¶९-mwbr)

देवाच्या इस्राएलचा भाग नसलेल्या ख्रिश्‍चनांनाही या करारामुळे फायदा होतो (टेहळणी बुरूज१० ३/१५ २७ ¶१४; जेरमाया अध्या. १४ ¶१८-mwbr)

कोलाज: १. महायाजक वेदीवर प्राण्याचं बलिदान अर्पण करतोय. २. सैनिक वधस्तंभावरून येशूचा मृतदेह खाली घेत आहेत.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यिर्म ३१:१५—ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज१४ १२/१५ २१ ¶५-६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यिर्म ३१:१-११ (शिकवणे अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. बायबल अभ्यास सुरू करायची इच्छा आहे का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. तुमच्या वर्गसोबत्याला वाटतं, की तुमचे शिक्षक तुमच्याशी चांगलं वागत नाहीत. त्याला तरुणांसाठी, लेख १०६ चा वापर करून मदत करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) भाषण. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न, लेख ३७—विषय: यहोवाचे साक्षीदार राजकीय गोष्टींमध्ये तटस्थ का राहतात? (शिकवणे अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

गीत ६७

७. बदल करायला तयार असा—JW.ORG वापरा

(१५ मि.) चर्चा.

घरोघरच्या साक्षकार्यात एक जोडपं एका स्त्रीला आणि तिच्या लहान मुलीला jw.org वेबसाईट दाखवत आहे.

आपल्या क्षेत्रातल्या लोकांना कोणत्या विषयावर बोलायला आवडेल याचा आपण विचार करतो. पण काही वेळा ते असं काहीतरी विचारतात, ज्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नसते. मग अशा वेळी आपल्याला संभाषणात बदल करायला कशामुळे मदत होईल?

“दुसऱ्‍यांकडून शिका कुशल बना—JW.ORG चा प्रभावीपणे वापर करा”—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

कल्पना करा, मोहिमेदरम्यान घरोघरचं साक्षकार्य करत असताना एक घरमालक तुम्हाला सांगतो, की तो समस्येत असताना देवाने त्याला मदत केली नाही म्हणून त्याचा देवावर विश्‍वास नाही.

  • साक्ष देण्याआधी आपण त्या व्यक्‍तीबद्दल काळजी असल्याचं कसं दाखवू शकतो?—याक १:१९

  • तुम्ही कोणतं वचन दाखवाल? तुम्ही jw.org वरून ते वचन कसं शोधाल?

  • जर तुम्हाला लगेच वचन आठवलं नाही तर एखादी माहिती मिळवण्यासाठी, शोधा या बॉक्समध्ये तुम्ही काय टाईप कराल?

  • जर jw.org वेबसाईट उघडत नसेल किंवा तुमच्या फोनमध्ये JW लायब्ररी ॲप नसेल, तर तुम्ही घरमालाकाला मदत करायला काय कराल?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) धैर्य अध्या. ६

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा