४-१० मे
यशया ५८-५९
गीत २१ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. यहोवाकडून बरेच आशीर्वाद मिळवा
(१० मि.)
पाहुणचार करा (यश ५८:७-९)
आध्यात्मिक गोष्टींना जीवनात पहिली जागा द्या (यश ५८:१३, १४; टेहळणी बुरूज०६ ७/१ १३ ¶९)
यहोवा तुमची काळजी घेईल अशी खातरी बाळगा (यश ५९:१; टेहळणी बुरूज१३ १/१५ १३ ¶५-६)
यावर विचार करा: ‘इस्राएली लोकांना यहोवाकडून आशीर्वाद का मिळाले नाहीत आणि त्यांच्या उदाहरणातून मला काय शिकायला मिळतं?’ (यश ५८:१-५; यशायाह की भविष्यवाणी-II अध्या. १९ ¶६, ८)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ५९:२—यहोवाला पापाचा द्वेष असण्याचं एक कारण काय आहे? (टेहळणी बुरूज२४.०८ ३ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ५९:१-१२ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. एखाद्या पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ यात दिलेल्या एखाद्या बायबल सत्याबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)
६. भाषण
(५ मि.) शिष्य बनवा ‘आणखी माहिती—क’ मुद्दा १६—विषय: आपण नेहमी देवाला प्रार्थना केली पाहिजे. (शिकवणे अभ्यास ८)
गीत १००
७. “पाहुणचार करत राहा”
(१५ मि.) चर्चा.
पौलने ख्रिश्चनांना ‘पाहुणचार करत राहायचं’ प्रोत्साहन दिलं. (रोम १२:१३ टेहळणी बुरूज०९ १०/१५ ६ ¶१३; टे.बु.९६ १०/१ ९ ¶३; ११ ¶११, १२) त्याचा सल्ला ऐकणाऱ्यांना भरभरून आशीर्वाद मिळतात.—नीत ११:२५.
यहोवाचे मित्र बना—पाहुणचार करा. हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
या व्हिडिओतून तुम्हाला पाहुणचार करण्याबद्दल काय शिकायला मिळालं?
पाहुणचार केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा झाला आहे?
पाहुणचार करण्याबद्दल यहोवाचं सर्वात चांगलं उदाहरण आहे. (प्रेका १४:१७) अनुवाद १०:१७, १८ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
पाहुणचाराच्या बाबतीत यहोवाच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
जवळच्या मित्रांशिवाय इतर लोकांचा पाहुणचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
बायबलमध्ये पाहुणचार करण्याच्या बाबतीत आणखी कोणती उदाहरणं आहेत आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
विचार करा, तुम्हाला कोणाचा पाहुणचार करायला आवडेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल ते लिहून काढा:
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ८२-८३