वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 मार्च पृ. ६-७
  • २३-२९ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 मार्च पृ. ६-७

२३-२९ मार्च

यशया ४८-४९

गीत ८९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. यहोवा जे सांगतो त्याकडे लक्ष दिल्याने फायदा होतो

(१० मि.)

यहोवा त्याच्या सेवकांना शिकवतो (यश ४८:१७; इन्साइट “शिक्षक, शिकवणे” ¶२)

आपण यहोवाच्या शिकवणींकडे लक्ष द्यायची निवड केली पाहिजे (यश ४८:१८क; बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं लेख ४४ ¶२-३-mwbr)

मग आपली “शांती नदीसारखी” आणि आपलं “नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.” (यश ४८:१८ख; देवाचे प्रेम अध्या. १७ ¶८)

एक बहीण सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनारी चालत आहे.

अर्थ: ज्या इब्री शब्दाचं भाषांतर “शांती” असं करण्यात आलं आहे त्यात आरोग्य, सुरक्षा, ताकद, मैत्री आणि पूर्णतासुद्धा सामील आहे.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश ४९:८—ही भविष्यवाणी तीन प्रकारे कशी पूर्ण झाली? (इन्साइट “कृपेचा काळ” ¶१-३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश ४८:९-२० (शिकवणे अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. एका अक्रियाशील नातेवाइकाला खास भाषणाचं आणि स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरची व्यक्‍ती स्मारकविधीला यायचा विचार करते. त्या ठिकाणी काय होईल याबद्दलच्या तिच्या प्रश्‍नांची उत्तरं द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(५ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. स्मारकविधीचं भाषण झाल्यावर, स्मारकविधीला आलेल्या व्यक्‍तीच्या प्रश्‍नांची उत्तरं द्या. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत १०७

७. वर्षातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवसाचा फायदा घ्या

(१५ मि.) चर्चा.

दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित राहून आपण येशूची आज्ञा पाळतो आणि यहोवाने दिलेल्या खंडणीच्या भेटीसाठी कदर असल्याचं दाखवतो. (लूक २२:१९) तसंच, यहोवा आणि येशूचं आपल्यावर किती प्रेम आहे याचीही आपल्याला या दिवशी आठवण होते. (गल २:२०; १यो ४:९, १०) मग आपण स्माकरविधीसाठी आपलं मन तयार कसं करू शकतो? आपण खंडणीसाठी कृतज्ञ असल्याचं कसं दाखवू शकतो? तसंच, आपण आवड दाखवणाऱ्‍यांनाही असंच करायला कशी मदत करू शकतो?

  • स्मारकविधीसाठी असलेली बायबलची वचनं वाचा आणि त्यांवर मनन करा

  • खंडणीच्या भेटीवर मनन करा आणि त्याबद्दल कदर असल्याचं आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून कसं दाखवू शकतो याचा विचार करा

  • ओळखीच्या लोकांना, नातेवाइकांना आणि तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना खास भाषणाचं आणि स्मारकविधीचं आमंत्रण द्यायला प्रचारात होताहोईल तितका सहभाग घ्या

  • स्मारकविधीला आलेल्या सगळ्यांचं प्रेमाने स्वागत करा. फक्‍त तुम्ही बोलावलेल्या लोकांकडेच नाही, तर मोहिमेदरम्यान इतरांकडून आमंत्रण मिळालेल्या लोकांकडेही लक्ष द्या. हवं तर तुम्ही कार्यक्रमादरम्यान त्यांच्यासोबत बसू शकता

  • कोणी प्रश्‍न विचारला तर त्याचं उत्तर द्यायला तयार असा

  • मंडळीतून काढून टाकलेल्या लोकांचं स्वागत करा. खासकरून वडील या गोष्टीकडे खास लक्ष देतील

“येशू ‘हरवलेले शोधावयास व तारावयास आला’ ” या व्हिडिओतलं एक दृष्य: स्मारकविधीच्या दिवशी भाऊबहीण राज्य सभागृहात एकमेकांशी बोलत आहेत.

येशू “हरवलेले शोधावयास व तारावयास आला” हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • अक्रियाशील लोकांचं प्रेमाने स्वागत करण्याच्या बाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळालं?

    “येशू ‘हरवलेले शोधावयास व तारावयास आला’ ” या व्हिडिओतलं एक दृष्य: एक बहीण स्मारकविधीला आलेल्या एका अक्रियाशील बहिणीला प्रेमाने मिठी मारत आहे.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ७२-७३

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १३४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा