१६-२२ फेब्रुवारी
यशया ३६-३७
गीत १५० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. त्यांचे शब्द ऐकून “तू घाबरून जाऊ नकोस”
(१० मि.)
रबशाके यहोवाच्या लोकांचं मनोबल खचवण्यासाठी यरुशलेमला गेला (यश ३६:१, २; इन्साइट “हिज्कीया” क्र. १ ¶१४)
रबशाकेने यहोवाचे लोक कमजोर आहेत आणि त्यांच्याकडे कोणतीही आशा नाही हे त्यांना दाखवायचा प्रयत्न केला (यश ३६:८; यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. २९ ¶१०)
रबशाकेने यहोवाच्या लोकांची थट्टा केली कारण त्यांचा यहोवावर आणि त्यांच्या राजावर भरवसा होता (यश ३६:७, १८-२०; यशायाह की भविष्यवाणी-I अध्या. २९ ¶१३-१४)
लोक जेव्हा यहोवाच्या लोकांना घाबरवण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना घाबरण्याची गरज नाही.—यश ३७:६, ७
कौटुंबिक उपासनेसाठी एक कल्पना: “हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे” हा व्हिडिओ पाहा आणि त्यातून शिकलेल्या गोष्टींवर चर्चा करा.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
यश ३७:२९—यहोवाने सन्हेरीब राजाच्या तोंडात लगाम घातला, या गोष्टीचा काय अर्थ आहे? (इन्साइट “लगाम” ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) यश ३७:१४-२३ (शिकवणे अभ्यास २)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा या माहितीपत्रिकेतल्या आणखी माहिती—क मधल्या एका विषयाबद्दल समोरच्या व्यक्तीला सांगा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(५ मि.) प्रात्यक्षिक. बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख ११० ¶१-४—विषय: बाप्तिस्मा म्हणजे काय? (शिकवणे अभ्यास १७)
गीत ११८
७. “कसल्या गोष्टीचा तुला एवढा भरवसा आहे?”
(१५ मि.) चर्चा.
तुमचा देवावर आणि बायबलवर असलेल्या विश्वासामुळे किंवा तुम्ही यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे कोणी कधी तुमची थट्टा केली आहे का? किंवा तुमच्या विश्वासाबद्दल कोणी कधी तुम्हाला प्रश्न विचारले आहेत का? जर असं झालं असेल, तर तुम्ही कदाचित घाबरला असाल किंवा काय बोलावं हे तुम्हाला कळलं नसेल. तसंच, कदाचित तुम्ही मानत असलेल्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात शंकाही आली असेल. तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?
यशया ३६:४ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
आपण मानत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत, यावर आपला विश्वास वाढवणं का महत्त्वाचं आहे?
माझे किशोरवयातले दिवस—माझा देवावर विश्वास का आहे? हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
एलिबोल्डो आणि क्रिस्टल यांनी बायबलवर आपला विश्वास मजबूत करण्यासाठी काय केलं?
देव खरंच आहे असं तुम्ही का मानता?
बायबलमधल्या कोणत्या वचनांमुळे तुम्हाला खातरी पटते की . . .
यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे?
यहोवा नेहमी तुम्हाला मदत करेल?
तुम्हाला देवाचे लोक सापडले आहेत?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ६२-६३