वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb26 जानेवारी पृ. ६-७
  • १९-२५ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १९-२५ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
mwb26 जानेवारी पृ. ६-७

१९-२५ जानेवारी

यशया २४-२७

गीत १५९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “हा आमचा देव आहे!”

(१० मि.)

यहोवाबद्दल अभिमान बाळगण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत (यश २५:९; यहोवा के करीब अध्या. १ ¶२१)

यहोवा नवीन जगात आपल्याला बऱ्‍याच चांगल्या गोष्टी देईल; जसं की भरपूर चविष्ट अन्‍न (यश २५:६; टेहळणी बुरूज२४.१२ ६ ¶१४)

तो आपल्याला कायमचं जीवन देईल (यश २५:७, ८; टेहळणी बुरूज२५.०१ २८-२९ ¶११-१२)

एक वयस्कर भाऊ व्हिलचेअरवर बसले आहेत आणि त्यांची काळजी घेणाऱ्‍याला साक्ष देत आहेत.

यावर विचार करा: ‘या आठवड्यात मी यहोवाच्या अभिवचनांबद्दल कोणाला सांगू शकतो?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • यश २४:२—हे वचन नवे जग भाषांतर यामध्ये काव्य रूपात का मांडण्यात आलंय? (टेहळणी बुरूज१५ १२/१५ १६-१७ ¶१-३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) यश २५:१-९ (शिकवणे अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला कोणत्या विषयामध्ये आवड आहे ते शोधा आणि त्या विषयाबद्दल jw.org वर माहिती कशी शोधायची ते दाखवा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. शिष्य बनवा या माहितीपत्रिकेतल्या आणखी माहिती—क मधल्या एका विषयाबद्दल एखाद्या व्यक्‍तीला सांगा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं लेख १६०—विषय: येशूला देवाचा मुलगा का म्हटलंय? (शिकवणे अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

गीत १४४

७. वैद्यकीय उपचार किंवा सर्जरीसाठी पूर्णपणे यहोवावर विसंबून राहा

(१५ मि.) चर्चा.

यहोवावर “पूर्णपणे विसंबून राहणाऱ्‍यांचं” तो रक्षण करतो. (यशया २६:३ वाचा.) यहोवाने त्याच्या संघटनेकडून आपल्याला बरीच मदत पुरवली आहे. या तरतुदींचा वापर करून आपण वैद्यकीय उपचारासाठी तयारी करताना, यहोवावर पूर्णपणे विसंबून असल्याचं दाखवू शकतो.

“तुम्ही वैद्यकीय परिस्थितींना तोंड द्यायला तयार आहात का?” या व्हिडिओतले दृश्‍य: १. एक भाऊ बायबलचा आणि “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या पुस्तकातल्या ३९ धड्याचा वापर करून संशोधन करत आहे. २. एक भाऊ डी.पी.ए. कार्ड भरत आहे. ३. हॉस्पिटल संपर्क समितीतले एक भाऊ फोनवरून माहिती देऊन मदत करत आहेत. ४. एक बहीण डॉक्टरला तिचे रिपोर्ट दाखवत आहे.

तुम्ही वैद्यकीय परिस्थितींना तोंड द्यायला तयार आहात का? हा व्हिडिओ दाखवा मग भाऊबहिणींना विचारा:

  • वैद्यकीय उपचारासाठी तयारी करताना कोणत्या तीन गोष्टींमुळे आपल्याला मदत होऊ शकते?

  • आपल्याला मदत व्हावी म्हणून वैद्यकीय माहिती देणारे फॉर्म a कशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत?

  • हॉस्पिटल संपर्क समितीला संपर्क करणं आपल्यासाठी कधी योग्य ठरेल?

  • या प्रेमळ तरतुदींबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

यहोवाने यशया २६:३ मध्ये आपल्याला “कायम टिकणारी शांती” देण्याचं वचन दिलंय. पण याचा अर्थ असा होत नाही की तो नेहमीच आपल्याला आजारातून वाचवेल. उलट, अशा परिस्थितीत आपल्याला सुरक्षित वाटावं आणि शांती मिळावी म्हणून तो संघटनेचा वापर करून आपल्याला मदत करतो.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ५४-५५

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५३ आणि प्रार्थना

a गरजेच्या वेळी पुढे दिलेली माहिती तुम्ही वडिलांकडून मागू शकता: S-401 (गरोदर स्त्रियांसाठी माहिती), S-407 (सर्जरी किंवा किमोथेरपीची गरज असलेल्यांसाठी माहिती) आणि S-55 (ज्या मुलांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे त्यांच्या आईवडिलांसाठी माहिती).

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा