२०-२६ ऑक्टोबर
उपदेशक ९-१०
गीत ३० आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. परीक्षांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा
(१० मि.)
आपल्यावर परीक्षा येतात म्हणजे यहोवा आपल्यावर नाराज आहे असं नाही (उप ९:११; टेहळणी बुरूज१३ ८/१५ १४ ¶२०-२१)
सैतानाच्या या दुष्ट जगात राहताना आपल्यासोबत सगळं चांगलंच होईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही (उप १०:७; टेहळणी बुरूज१९.०९ ४ ¶१०)
यहोवाने दिलेल्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपण नेहमीच, अगदी समस्यांचा सामना करतानासुद्धा वेळ काढला पाहिजे (उप ९:७, १०; टेहळणी बुरूज११ १०/१५ ८ ¶१-२)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
उप १०:१२-१४—एखाद्याबद्दल त्याच्या मागे बोलण्याविषयी या वचनांतून आपल्याला कोणता इशारा मिळतो? (इन्साइट “एखाद्याच्या मागे बोलणं, बदनामी” ¶४, ८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) उप १०:१-२० (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. दुःखी वाटत असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. आर्थिक गोष्टींबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला शिष्य बनवा माहितीपत्रकातल्या ‘आणखी माहिती—क’ या शीर्षकाखाली असलेल्या “आपल्याला शिकवायला आवडतात अशी सत्यं” यातलं एखादं सत्य सांगा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ४)
६. शिष्य बनवण्यासाठी
गीत ४७
७. संकटाच्या काळात स्थिर कसं राहता येईल?
(१५ मि.) चर्चा.
आपल्याला दररोज वेगवेगळ्या परीक्षांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. काही वेळा परीक्षा अगदी अचनाक येऊ शकतात आणि त्या इतक्या भयंकर असू शकतात की त्यामुळे आपण भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही कमजोर होऊ शकतो. अशा वेळी आपल्याला स्थिर कसं राहता येईल?
आपल्यावर कोणतंही संकट आलं तरी यहोवा आपल्याला ‘स्थिर राहायला’ मदत करू शकतो. (यश ३३:६) पण यहोवावर विसंबून राहण्यासाठी परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन संतुलित असला पाहिजे आणि आपण नम्र राहून आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. (नीत ११:२) आपल्यावर एखादं संकट कोसळतं तेव्हा स्वतःला आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला सावरण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी आणि दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल.—उप ४:६.
आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा भाऊबहिणींचा उपयोग करा. म्हणून मदत मागायला किंवा ती स्वीकारायला कधीच मागेपुढे पाहू नका. हे नेहमी लक्षात असू द्या, की भाऊबहीण तुमच्यावर मनापासून प्रेम करतात आणि तुम्हाला मदत करताना त्यांना नेहमी आनंदच होतो.
२ करिंथकर ४:७-९ वाचा आणि भाऊबहिणींना विचारा:
संकट येतं तेव्हा उपासनेशी संबंधित नेहमीच्या गोष्टी करणं कदाचित कठीण जाईल. पण अशा वेळीसुद्धा त्या करत राहायचा आपण होईल तितका प्रयत्न का केला पाहिजे?
यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो हा व्हिडिओ दाखवा मग भाऊबहिणींना विचारा:
यहोवाने भाऊ आणि बहीण सेप्टर यांना कशी मदत केली?
मंडळीतल्या भाऊबहिणींनी त्यांना कशी मदत केली?
त्यांच्या उदाहरणातून तुम्हाला आणखी काय शिकायला मिळालं?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ २८, भाग ६ ची प्रस्तावना आणि पाठ २९