१४-२० जुलै
नीतिवचनं २२
गीत ७९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. मुलांना वाढवण्यासाठी सुज्ञ सल्ले
(१० मि.)
जीवनातल्या समस्यांचा सामना करण्यासाठी मुलांना तयार करा (नीत २२:३; टेहळणी बुरूज२०.१० २७ ¶७)
अगदी लहान वयापासूनच मुलांना शिकवा आणि प्रशिक्षण द्या (नीत २२:६; टेहळणी बुरूज१९.१२ २६ ¶१७-१९)
त्यांना प्रेमाने शिस्त लावा (नीत २२:१५; टेहळणी बुरूज०७ ९/१ २३-२४ ¶७, ९)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत २२:२९—मंडळीतल्या कामांच्या बाबतीत आपण हे वचन कसं लागू करू शकतो आणि याचा काय फायदा होईल? (टेहळणी बुरूज२१.०८ २२ ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत २२:१-१९ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. आईवडिलांसाठी उपयोगी असलेली माहिती jw.org वर कशी शोधायची हे समोरच्या व्यक्तीला दाखवा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
६. भाषण
(५ मि.) १० प्रश्न, प्रश्न ४—विषय: मी आपल्या चुका कशा सुधारू शकतो? (शिकवणे अभ्यास २०)
गीत १३४
७.धीर धरा, पण चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
(१५ मि.) चर्चा.
मुलांना वाढवताना खूप धीर धरावा लागतो. आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय हे आईवडिलांना माहीत असलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या मुलांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. (अनु ६:६, ७) मुलांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आईवडिलांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि मुलं बोलत असताना त्यांचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. (नीत २०:५) मुलांना एखादी गोष्ट समजत नाही आणि ते त्याप्रमाणे वागत नाहीत, तोपर्यंत कदाचित आईवडिलांना आपल्या मुलांना त्या गोष्टीची सारखीसारखी आठवण करून द्यावी लागेल.
पण धीर दाखवत असताना आईवडिलांनी मुलांच्या चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्षही करू नये. यहोवाने आईवडिलांना आपल्या मुलांसाठी मर्यादा घालून द्यायचा अधिकार दिलाय. तसंच मुलं ऐकत नसतील, तर त्यांना शिस्त लावायचा अधिकारही त्याने त्यांना दिलाय.—नीत ६:२०; २३:१३.
इफिसकर ४:३१ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
रागात असताना आईवडिलांनी आपल्या मुलांना शिस्त का लावू नये?
गलतीकर ६:७ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, ही गोष्ट आईवडिलांनी मुलांना शिकवणं का गरजेचं आहे?
‘सहनशीलता दाखवून प्रेमाने एकमेकांचं सहन करा’—तुमची मुलं हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
या व्हिडिओमधून तुम्हाला कोणते धडे शिकायला मिळाले?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! “नियमन मंडळाकडून पत्र,” भाग १ प्रस्तावना आणि पाठ १