वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जुलै पृ. २-३
  • ७-१३ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जुलै पृ. २-३

७-१३ जुलै

नीतिवचनं २१

गीत ९८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आनंदी विवाहासाठी सुज्ञ सल्ले

(१० मि.)

एखाद्याला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याआधी त्याच्याशी लग्न करायची घाई करू नका (नीत २१:५; टेहळणी बुरूज०३ १०/१५ ४ ¶५)

वाद होतात तेव्हा नम्रता दाखवा (नीत २१:२, ४; टेहळणी बुरूज०५ ३/१ १४ ¶१९)

एकमेकांशी धीराने आणि दयेने वागा (नीत २१:१९; टेहळणी बुरूज०६ १०/१ १५ ¶१३)

एक पती आपल्या पत्नीचं बोलणं लक्ष देऊन ऐकतोय.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत २१:३१—या वचनामुळे आपल्याला प्रकटीकरण ६:२ मधली भविष्यवाणी समजून घ्यायला कशी मदत होते? (टेहळणी बुरूज०५ १/१५ १७ ¶९)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) नीत २१:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. देवाचे प्रेम २५१-२५३—विषय: घटस्फोटाबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचा काय दृष्टिकोन आहे? (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत १३२

७. आपल्या जोडीदाराचा आदर करा

(१५ मि.) चर्चा.

“आनंदी विवाहासाठी: आदर दाखवा” या व्हिडिओतलं एक दृष्य. एक भाऊ सोफ्यावर बसून वाचत असताना त्याची पत्नी त्याच्यासाठी कॉफी आणते.

तुम्ही लग्न करता, तेव्हा तुम्ही यहोवासमोर तुमच्या जोडीदाराला एक वचन देता. तुम्ही त्याला असं वचन देता, की तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल आणि त्याचा आदर कराल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीशी किंवा पत्नीशी जसं वागता त्याचा यहोवासोबतच्या तुमच्या नात्यावर परिणाम होतो.—नीत २०:२५; १पेत्र ३:७.

आनंदी विवाहासाठी: आदर दाखवा हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • पती-पत्नीने एकमेकांचा आदर करणं महत्त्वाचं का आहे?

  • एकमेकांचा आदर करण्यासाठी आपल्याला कदाचित कोणते बदल करावे लागतील?

  • बायबलमधल्या कोणत्या तत्त्वांमुळे आपल्याला मदत होईल?

  • आपण आपल्या जोडीदाराला कोणत्या विशिष्ट मार्गांनी आदर करू शकतो?

  • जोडीदाराच्या कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि का?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २८ ¶१६-२२

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा