१७-२३ मार्च
नीतिवचनं ५
गीत १२२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर राहा
(१० मि.)
आपल्याला अनैतिक लैंगिक कृत्यांचा मोह होऊ शकतो (नीत ५:३; टेहळणी बुरूज०० ७/१५ २९ ¶१)
अनैतिक लैंगिक कृत्यांमुळे आपल्यावर दुःख ओढवू शकतं (नीत ५:४, ५; टेहळणी बुरूज०० ७/१५ २९ ¶२)
अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर राहा (नीत ५:८; टेहळणी बुरूज०० ७/१५ २९ ¶५)
एक बहीण एका मुलाला आपला नंबर द्यायला नकार देते
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत ५:९—अनैतिक लैंगिक कृत्यांमुळे आपण दुसऱ्यांच्या नजरेत आपलं “चांगलं नाव” कसं गमावू शकतो? (टेहळणी बुरूज०० ७/१५ २९ ¶७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत ५:१-२३ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. ख्रिस्ती नसलेल्या व्यक्तीला स्मारकविधीचं आमंत्रण द्या. तसंच, jw.org चा वापर करून तिच्या जवळचं स्मारकविधीचं ठिकाण शोधायला तिला मदत करा. (शिष्य बनवा धडा ६ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. आधीच्या भेटीत घरमालकाने स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं होतं आणि आवड दाखवली होती. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)
६. शिष्य बनवण्यासाठी
(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १६ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय. जेव्हा विद्यार्थी विचारतो की येशूचं लग्न झालं होतं का, तेव्हा त्याला उत्तर शोधायला संशोधन कसं करायचं ते दाखवा. (शिष्य बनवा धडा ११ मुद्दा ४)
गीत १२१
७. डेटिंग करताना नैतिकरीत्या शुद्ध राहण्यासाठी पावलं उचला
(१५ मि.) चर्चा.
जेव्हा “एक पुरुष आणि स्त्री एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि एकमेकांमध्ये आवड असल्याचं दाखवतात,” तेव्हा त्याला सहसा डेटिंग म्हटलं जाऊ शकतं. जगातले लोक डेटिंग करताना सहसा एकट्यात किंवा चारचौघांत भेटतात. ते याबद्दल इतरांना सांगतात किंवा गुपित ठेवतात. तसंच ते डेटिंग प्रत्यक्ष भेटून, फोनवरून किंवा मेसेज करून करतात. पण आपण डेटिंगकडे फक्त मजा म्हणून बघत नाही, तर आपल्यासाठी ती एक गंभीर गोष्ट आहे. एक व्यक्ती आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण डेटिंग करतो. तुमचं वय कमी असो किंवा जास्त, डेटिंग करताना तुमच्याकडून अनैतिक लैंगिक कृत्यं होऊ नये म्हणून तुम्ही कोणती पावलं उचलू शकता?—नीत २२:३.
वैवाहिक जीवनाची तयारी—भाग १: मी डेटिंगसाठी तयार आहे का?—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
एक व्यक्ती जोपर्यंत लग्नासाठी तयार नाही तोपर्यंत तिने डेटिंग का करू नये? (नीत १३:१२; लूक १४:२८-३०)
आईवडिलांनी आपल्या मुलीला ज्या प्रकारे मदत केली त्याबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट आवडली?
नीतिवचनं २८:२६ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
मोहात पाडणारी परिस्थिती टाळता यावी म्हणून एक जोडपं आधीपासूनच काय ठरवू शकतं?
एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांचे हात धरणं आणि किस करणं (चुंबन घेणं) यांसारख्या गोष्टी आपण करणार की नाही, याबद्दल आधीच ठरवणं जोडप्यासाठी शहाणपणाचं का असेल?
इफिसकर ५:३, ४ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
फोनवर किंवा ऑनलाईन एकमेकांशी बोलताना एका जोडप्याने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ ¶१-६