जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ
© 2024 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
६-१२ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं स्तोत्रं १२७-१३४
आईवडिलांनो—आपल्या अनमोल वारशाची काळजी घेत राहा
यहोवाच्या कुटुंबात असल्याचा अभिमान बाळगा!
९ यहोवाने मानवांना, मुलांना जन्म द्यायची क्षमता दिली आहे. तसंच, मुलांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला शिकवायची जबाबदारीही त्याने त्यांना दिली आहे. हे खरं आहे, की यहोवाने स्वर्गदूतांना अद्भुत क्षमता दिल्या आहेत. पण त्यांना, मुलांना जन्म द्यायची क्षमता दिली नाही, ती फक्त मानवांना दिली आहे. त्यामुळे आईवडिलांनो, यहोवाकडून मिळालेल्या या खास भेटीची तुम्ही मनापासून कदर करता का? त्यासोबतच, आईवडिलांना एक महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली आहे. ती म्हणजे, मुलांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” वाढवण्याची जबाबदारी. (इफिस. ६:४; अनु. ६:५-७; स्तो. १२७:३) ती पार पाडण्यासाठी, आपल्या संघटनेने आईवडिलांना बायबलवर आधारित बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. जसं की, प्रकाशनं, व्हिडिओ, संगीत आणि वेबसाईटवरचे लेख. यावरून कळतं, की यहोवाचं आणि येशूचं लहान मुलांवर खूप प्रेम आहे. (लूक १८:१५-१७) मुलांना चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आईवडील यहोवाकडे मदत मागतात तेव्हा त्याला खूप आनंद होतो. अशा प्रकारे आईवडील आपल्या मुलांना यहोवाच्या कुटुंबाचा भाग व्हायला मदत करत असतात.
आईवडिलांनो, मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
२० आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे जाणून घ्या. स्तोत्र १२७ यात मुलांची तुलना बाणांशी केली आहे. (स्तोत्र १२७:४ वाचा.) बाण वेगवेगळ्या आकाराचे आणि धातूंपासून बनवले असल्यामुळे ते एकसारखे नसतात, त्याच प्रकारे मुलंसुद्धा एकसारखी नसतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक मुलाला कसं प्रशिक्षण द्यायचं हे आईवडिलांना ठरवावं लागतं. इझरायलमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने आपल्या दोन मुलांना यहोवाची सेवा करण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली याबद्दल ते सांगतात: “आम्ही आमच्या दोन्ही मुलांचा एकत्र बायबल अभ्यास घेतला नाही, तर प्रत्येकाचा वेगवेगळा घेतला.” पण याच पद्धतीने अभ्यास घेणं गरजेचं किंवा शक्य आहे की नाही, हे प्रत्येक कुटुंबप्रमुखाने ठरवायला हवं.
आध्यात्मिक रत्नं शोधा
स्वतःच्या प्रगतीत आनंद माना!
६ स्तोत्र १३१:१, २ वाचा. या वचनांतून आईवडील एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतात. त्यांत दावीद म्हणतो, “मोठमोठ्या गोष्टी करण्याची; किंवा माझ्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी करण्याची, मी इच्छा बाळगत नाही.” दावीद नम्र होता. आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही याची त्याला जाणीव होती. या जाणिवेमुळे त्याचं मन शांत आणि स्थिर झालं. दावीदच्या या शब्दांतून आईवडील काय शिकू शकतात? हेच, की त्यांनी नम्र असलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःकडून आणि आपल्या मुलांकडूनसुद्धा जास्तीची अपेक्षा ठेवू नये. आपली मुलं काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत, हे लक्षात घेऊन आईवडिलांनी त्यांना ध्येयं ठेवायला मदत केली पाहिजे. त्यामुळे मुलं ती ध्येयं गाठू शकतील आणि त्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटणार नाही. मरीना नावाची एक बहीण म्हणते, “आईने कधीच माझी तुलना माझ्या भावंडांशी किंवा इतर मुलांशी केली नाही. तिने मला शिकवलं, की प्रत्येकामध्ये काही ना काही करण्याची क्षमता असते आणि प्रत्येक जण यहोवासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी सहसा इतरांसोबत स्वतःची तुलना करत नाही.”
१३-१९ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं स्तोत्रं १३५-१३७
“आपला प्रभू इतर सगळ्या देवांपेक्षा महान आहे”
ख्रिस्त—देवाचं सामर्थ्य आहे
१५ येशू ख्रिस्ताला यहोवानं शक्ती दिली होती, त्यामुळे यहोवाचाही नैसर्गिक शक्तींवर ताबा आहे हे आपल्याला कळतं. उदाहरणार्थ, जलप्रलयाआधी यहोवानं म्हटलं: “अजून सात दिवसांचा आवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार.” (उत्प. ७:४) तसंच, निर्गम १४:२१ या वचनात आपण वाचतो की, यहोवानं “पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटवला.” आणि योना १:४ या वचनात आपण वाचतो की, यहोवानं “समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले.” नवीन जगात यहोवा नैसर्गिक शक्तींवर नेहमी ताबा ठेवेल हे जाणून आपल्याला खरंच किती दिलासा मिळतो!
यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?
१६ यहोवा आपलं संरक्षण करेल असा भरवसा आपल्याला असतो, तेव्हा आपल्याला खूप सुरक्षित वाटतं. पण काही वेळा आपल्याला खूप निराश वाटतं आणि ही भावना काही केल्या मनातून जात नाही. अशा वेळी यहोवा काय करतो? (स्तोत्र १३६:२३ वाचा.) अशा वेळी, तो आपल्याला त्याच्या ‘बाहूंनी आधार देतो,’ म्हणजे आपल्याला प्रेमाने उचलून घेतो आणि निराशेच्या भावनेतून सावरायला मदत करतो. (स्तो. २८:९; ९४:१८) यामुळे आपल्याला कसा फायदा होतो: आपल्या दुःखाच्या काळात यहोवा आपल्याला आधार देईल याची खातरी असल्यामुळे दोन मार्गांनी आपल्याला मदत होते. एक म्हणजे, आपण कुठेही असलो तरी यहोवा आपलं संरक्षण करेल असा भरवसा आपण ठेवू शकतो. आणि दुसरं म्हणजे, यहोवा आपली मनापासून काळजी करतो हा भरवसासुद्धा आपण ठेवू शकतो.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ १२४८
याह
याह हा शब्द मनापासून स्तुती करण्यासाठी सहसा गाण्यांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये वापरण्यात आलाय. यहोवाने त्याच्या लोकांना शत्रूंपासून सोडवल्यानंतर आणि त्यांना विजय मिळवून दिल्यानंतर त्यांनी हा शब्द वापरला. यहोवाच्या शक्तीची कदर करण्यासाठीसुद्धा हा शब्द वापरण्यात आलाय. स्तोत्र १०४:३५ मध्ये पहिल्यांदा “याहची स्तुती कर!” (हालेलुयाह) असे शब्द देवाच्या स्तुतीसाठी वापरण्यात आलेत. बायबलच्या काही भागांमध्ये “याह” हा शब्द गीतांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये पाहायला मिळतो. (निर्ग १५:२) यशयाने जोर देण्यासाठी “याह” आणि “यहोवा” ही दोन्ही नावं वापरली. (यश १२:२; २६:४) हिज्कीयाला चमत्काराने बरं करण्यात आल्यानंतर त्याने “याह” हा शब्द परत-परत वापरला. (यश ३८:९, ११) यहोवाने आपल्या लोकांची सुटका केली, त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांना सुधारलं. या गोष्टींसाठी कदर दाखवायला काही स्तोत्रांमध्ये “याह” हा शब्द वापरण्यात आलाय.—स्तो ९४:१२; ११८:५, १४.
२०-२६ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं स्तोत्रं १३८-१३९
भीतीमुळे स्वतःला रोखू नका
मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा
१० प्रत्येक वेळी उत्तर देण्यासाठी हात वर करण्याच्या नुसत्या विचारानेच तुमच्या पोटात गोळा येतो का? असं फक्त तुमच्याबाबतीतच घडतं असा विचार करून निराश होऊ नका. खरंतर आपल्यापैकी बहुतेक जणांना उत्तर देताना काही प्रमाणात तरी भीती वाटतेच. यावर मात करण्यासाठी तुम्हाला आधी भीतीचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही उत्तर विसराल किंवा चुकीचं उत्तर द्याल अशी तुम्हाला भीती वाटते का? किंवा तुमची उत्तरं दुसऱ्यांइतकी चांगली नसतील म्हणून तुम्हाला चिंता वाटते का? खरंतर, अशी भीती बाळगणं एका चांगल्या गोष्टीचं लक्षण आहे. ती म्हणजे, तुम्ही नम्र आहात आणि इतरांना तुम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ समजता. आणि यहोवाला नम्रतेचा गुण आवडतो. (स्तो. १३८:६; फिलिप्पै. २:३) पण यहोवाची हीदेखील इच्छा आहे, की तुम्ही त्याची स्तुती करावी आणि सभेदरम्यान बंधुभगिनींना प्रोत्साहन द्यावं. (१ थेस्सलनी. ५:११) त्याचं तुमच्यावर प्रेम आहे आणि उत्तर देण्यासाठी लागणारं धैर्य तो तुम्हाला देईल.
मंडळीच्या सभांमध्ये एकमेकांना प्रोत्साहन द्या
७ यासाठी टेहळणी बुरूज मासिकाच्या आधीच्या काही अंकांमध्ये काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत. त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. उदाहरणार्थ, त्यात एक सल्ला असा दिला होता, की अभ्यासाची चांगली तयारी करा. (नीति. २१:५) तुम्ही जितकी चांगली तयारी कराल तितकं उत्तर देणं तुम्हाला सोपं जाईल. तसंच, थोडक्यात उत्तर द्या. (नीति. १५:२३; १७:२७) उत्तर छोटं असेल तर ते द्यायला भीतीही वाटणार नाही. बरेच मुद्दे असलेलं लांबलचक उत्तर देण्यापेक्षा, एकदोन वाक्यांत दिलेलं छोटंसं उत्तर भाऊबहिणींना सहज समजू शकतं. तुम्ही जर स्वतःच्या शब्दांत थोडक्यात उत्तर दिलं, तर त्यावरून दिसून येईल की तुम्ही अभ्यासाची चांगली तयारी केली आहे आणि ती माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली आहे.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ ८६२ ¶४
क्षमा
नाही. दुसरे जेव्हा आपलं मन दुखावतात तेव्हा आपण त्यांना क्षमा केली पाहिजे अशी अपेक्षा ख्रिश्चनांकडून केली जाते. इतरांनी बऱ्याच वेळा असं केलं तरी आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. (लूक १७:३, ४; इफि ४:३२; कल ३:१३) आपण जर इतरांना क्षमा केली नाही तर आपल्यालाही यहोवाकडून क्षमा मिळणार नाही. (मत्त ६:१४, १५) जर एखाद्याने गंभीर पाप केलं तर त्याला बहिष्कृत केलं जातं. पण, जर त्याने खरा पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा मिळते. अशा वेळी मंडळीतले सगळे जण त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवतात. (१कर ५:१३; २कर २:६-११) पण जे सतत जाणूनबुजून गंभीर पाप करत राहतात आणि पश्चत्ताप करत नाहीत, अशांना क्षमा करण्याची अपेक्षा ख्रिश्चनांकडून केली जात नाही. कारण असे लोक देवाचे शत्रू बनतात.—इब्री १०:२६-३१; स्तो १३९:२१, २२.
२७ जानेवारी–२ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं स्तोत्रं १४०-१४३
प्रार्थनेप्रमाणे कामही करा
“बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक”
१३ सल्ला देवाच्या प्रेमाचाच एक पुरावा आहे. आपलं नेहमी भलं व्हावं असं यहोवाला वाटतं. (नीति. ४:२०-२२) त्यामुळे जेव्हा तो त्याच्या वचनातून, बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनांतून किंवा एखाद्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीकडून आपल्याला सल्ला देतो, तेव्हा तो त्याच्या प्रेमाचाच एक पुरावा असतो. आणि म्हणूनच इब्री लोकांना १२:९, १० मध्ये म्हटलं आहे, तो जे काही करतो ते ‘आपल्या भल्यासाठीच’ असतं.
१४ सल्ला कसा दिला आहे त्यापेक्षा काय दिला आहे याकडे लक्ष द्या. काही वेळा आपल्याला असं वाटेल, की आपल्याला ज्या पद्धतीने सल्ला देण्यात आला ती पद्धत योग्य नव्हती. हे खरं आहे, की जो कोणी सल्ला देतो त्याने तो अशा पद्धतीने दिला पाहिजे, की समोरच्याला तो सहज स्वीकारता येईल. (गलती. ६:१) आपल्याला जर कोणी सल्ला दिला तर तो आणखी चांगल्या प्रकारे देता आला असता असं म्हणण्याऐवजी, सल्ला काय आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण स्वत:ला विचारू शकतो: ‘सल्ला देण्याची पद्धत जरी मला बरोबर वाटत नसली, तरी त्यात काहीतरी तथ्य असू शकतं का? सल्ला देणाऱ्याच्या चुकांकडे लक्ष देण्याऐवजी मी त्याच्या सल्ल्याचा फायदा करून घेऊ शकतो का?’ आपल्याला मिळणाऱ्या सल्ल्यातून कसा फायदा करून घेता येईल ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे.—नीति. १५:३१.
या कठीण काळात “मनाची शुद्धता” टिकवून ठेवा
विरोध करणाऱ्यांचा दबाव, आर्थिक अडचणी व गंभीर आजारपण यांसारख्या समस्या देवाच्या सेवकांपैकी काहींच्या समोर येतात. कधीकधी अशा समस्यांचा त्यांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. दावीद राजालाही असा अनुभव आला होता. त्याने म्हटले: “माझा आत्मा माझ्या ठायी व्याकुळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.” (स्तो. १४३:४) अशा वेळी त्याला कोणत्या गोष्टीने धैर्य दिले? देवाने कशा प्रकारे त्याच्या सेवकांसोबत व्यवहार केला व कशा प्रकारे आपल्याला निरनिराळ्या संकटांतून सोडवले याबद्दल दाविदाने विचार केला. यहोवाने आपल्या महान नावाखातर काय काय केले आहे याबद्दलही दाविदाने मनन केले. देवाच्या कार्यांबद्दल दावीद सतत विचार करत राहिला. (स्तो. १४३:५) दाविदाप्रमाणेच आपणही आपल्या निर्माणकर्त्याबद्दल, त्याने आजपर्यंत काय काय केले आहे आणि आजही तो आपल्याकरता काय काय करत आहे याबद्दल मनन केल्यास आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांना तोंड देणे आपल्याला शक्य होईल.
“केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची आज्ञा—आजही व्यावहारिक?
दाविदानं एकदा यहोवाला म्हटलं, “हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा क्षय पावत आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नको.” (स्तो. १४३:५-७, १०) योग्य जोडीदाराची वाट पाहत असताना कधीकधी तुम्हालाही दाविदासारखं वाटेल. पण, धीर सोडू नका. यहोवाच्या मनात तुमच्याविषयी काय आहे, हे तो तुम्हाला दाखवेपर्यंत थांबून राहा. बायबलचं वाचन करून त्यावर खोलवर मनन करत राहा. यामुळे, तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो आणि गतकाळात त्यानं आपल्या सेवकांना कशी मदत केली हे तुम्हाला समजेल. शिवाय, त्याच्या आज्ञा पाळण्यातच शहाणपण आहे या गोष्टीची तुम्हाला खात्री पटेल.
आध्यात्मिक रत्नं शोधा
प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा
२ दावीद राजाच्या मनात प्रार्थनेच्या बहुमानाबद्दल खूप कदर होती. म्हणूनच त्याच्या एका गीतात तो यहोवाला असं म्हणाला: “माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या धूपाप्रमाणे असो.” (स्तो. १४१:१, २) त्याच्या काळात याजक मंदिरात जो पवित्र धूप जाळायचे तो खूप काळजीपूर्वक तयार केला जायचा. (निर्ग. ३०:३४, ३५) अगदी त्याच प्रकारे यहोवाला प्रार्थना करताना आपण त्याच्यासोबत जे काही बोलणार आहोत त्याचा आधीच चांगला विचार करावा अशी दावीदची इच्छा होती. आपलीही अशीच इच्छा आहे. कारण आपल्या प्रार्थनेमुळे यहोवाला आनंद व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं.
३-९ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं स्तोत्रं १४४-१४६
“यहोवा ज्यांचा देव आहे, ते लोक सुखी आहेत!”
वाचकांचे प्रश्न
१. या स्तोत्रातले बाकीचे शब्द पडताळून पाहा. १२ ते १४ वचनांत ज्या आशीर्वादांबद्दल सांगितलं आहे, ते दुष्टांच्या हातून सोडवून मुक्त कर अशी विनंती करणाऱ्या नीतिमान लोकांना लागू होतात (वचन ११). हीच गोष्ट आपल्याला १५ व्या वचनातही पाहायला मिळते. या वचनात “धन्य” हा शब्द एकाच प्रकारच्या लोकांसाठी दोनदा वापरण्यात आला आहे; म्हणजेच, “ज्या लोकांचा देव” यहोवा आहे त्यांच्यासाठी.
२. बायबलच्या इतर अहवालांत विश्वासू सेवकांसाठी जी अभिवचनं दिली आहेत त्याच्याशी ही समज जुळते. या स्तोत्रात दावीदने देवावर असलेला आपला विश्वास स्पष्टपणे व्यक्त केला आहे. इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून मुक्त केल्यावर देव आपल्या लोकांना आशीर्वाद देईल आणि समृद्ध करेल अशी त्याला खात्री होती. (लेवी. २६:९, १०; अनु. ७:१३; स्तो. १२८:१-६) उदाहरणार्थ, अनुवाद २८:४ मध्ये म्हटलं आहे: “तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे यांचे वत्स आशीर्वादित होतील.” दावीदच्या मुलाच्या, म्हणजे शलमोनच्या शासनकाळात संपूर्ण राष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी भरभराट आणि शांती होती. त्याच्या शासनकाळावरून आपल्याला हेही कळतं की मसीहाच्या राज्यात काय होईल.—१ राजे ४:२०, २१; स्तो. ७२:१-२०.
आपली आशा कायम डोळ्यांसमोर ठेवा
१६ सर्वकाळाच्या जीवनाची आशा देवाकडून मिळालेली एक मौल्यवान भेट आहे. त्या सुंदर भविष्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. कारण यहोवा आपलं अभिवचन पूर्ण करेल अशी आपल्याला खातरी आहे. ही आशा एका नांगरासारखी आहे. कारण ती आपल्याला परीक्षांचा सामना करायला, छळात टिकून राहायला आणि मृत्यू समोर असतानाही स्थिर राहायला मदत करते. तसंच ही आशा सैनिकाच्या टोपासारखीसुद्धा आहे. कारण ती आपल्या विचारांचं संरक्षण करते. आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टी सोडून द्यायला आणि चांगल्या गोष्टी करायला मदत होते. बायबलवर आधारित असलेल्या या आशेमुळे आपल्याला देवासोबत एक जवळचं नातं जोडता येतं. आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हेसुद्धा दिसून येतं. आपली आशा पक्की आणि मजबूत ठेवल्यामुळे आपल्याला नक्कीच खूप फायदा होतो.
१७ “आपल्या आशेमुळे आनंदी राहा,” असं उत्तेजन पौलने रोम इथल्या ख्रिश्चनांना दिलं. (रोम. १२:१२) पौल आनंदी होता, कारण त्याला माहीत होतं की आपण जर शेवटपर्यंत विश्वासू राहिलो तर स्वर्गात आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. आपणही आपल्या आशेमुळे आनंदी असलं पाहिजे, कारण यहोवा आपलं वचन पूर्ण करेल अशी खातरी आपल्याला आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की “जो आपला देव यहोवा याची आशा धरतो, तो सुखी आहे!” कारण ‘तो नेहमी विश्वासू राहतो.’—स्तो. १४६:५, ६.
कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?
१९ मागील ६००० पेक्षा जास्त वर्षांपासून सैतानाच्या जगाने मानवांचा छळ केला आहे. या दुष्ट व्यवस्थेच्या शेवटल्या काळात आज बरेच लोक स्वतःवर, पैशावर आणि चैन करण्यावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. त्यांना काय मिळू शकतं याचाच ते विचार करतात आणि स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करणं हे त्यांच्या जीवनाचं ध्येय बनलं आहे. पण असे लोक जीवनात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत! याच्या अगदी उलट, बायबल सांगतं: “ज्याच्या साहाय्याकरता याकोबचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य.”—स्तो. १४६:५.
२० यहोवाचे सेवक त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. या सेवकांमध्ये दरवर्षी नवीन लोकांची भर पडत आहे आणि तेदेखील यहोवावर मनापासून प्रेम करायला शिकतात. देवाचं राज्य शासन करत आहे याचा हा स्पष्ट पुरावा आहे. हे राज्य लवकरच या पृथ्वीवर अनेक आशीर्वादांचा वर्षाव करेल. आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही असे आशीर्वाद! आपण यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करतो तेव्हा त्याला आनंद होतो आणि त्यामुळे आपल्यालादेखील खरं समाधान मिळतं. यहोवावर प्रेम करणारे सदासर्वकाळ आनंदी राहतील! पण स्वार्थी प्रेमामुळे कोणते वाईट गुण उत्पन्न होतात? या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या लेखात पाहू. तसंच, हे वाईट गुण देवाच्या सेवकांमध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांच्या विरुद्ध कसे आहेत हेदेखील आपण पाहू या.
आध्यात्मिक रत्नं शोधा
दिल्याने मिळणारा आनंद अनुभवा!
६ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, यहोवा आपल्या शारीरिक गरजा पुरवतो, कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे. मत्तय ६:२५, २६ (वाचा.) मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांकडे लक्ष द्या. येशूने सृष्टीतल्या उदाहरणांचा वापर केला. पक्ष्यांबद्दल बोलताना तो म्हणाला: “ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत.” लक्ष द्या तो पुढे काय म्हणतो: “तरीही स्वर्गातला तुमचा पिता त्यांना खाऊ घालतो.” मग येशू विचारतो: “तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का?” तर मुद्दा हा आहे, की यहोवाच्या नजरेत त्याचे उपासक, प्राण्यांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत. मग जर यहोवा प्राण्यांच्या गरजा पुरवतो, तर तो आपल्याही गरजा पुरवणार नाही का? नक्कीच पुरवेल. काळजी करणाऱ्या एका मानवी पित्याप्रमाणे यहोवा प्रेमापोटी आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतो.—स्तो. १४५:१६; मत्त. ६:३२.
१०-१६ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं स्तोत्रं १४७-१५०
याहची स्तुती करण्यासाठी आपल्याकडे बरीच कारणं आहेत
आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे?
५ यहोवाने केवळ इस्राएल राष्ट्राचंच नाही, तर त्या राष्ट्रातल्या प्रत्येक इस्राएली व्यक्तीचं सांत्वन केलं होतं. आजसुद्धा यहोवा हेच करतो. स्तोत्रकर्त्याने यहोवाविषयी लिहिलं: “भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.” (स्तो. १४७:३) आपण आजारी असतो किंवा निराश होतो तेव्हा आपण याची खातरी बाळगू शकतो, की यहोवाला आपली काळजी आहे. आपलं सांत्वन करण्यासाठी आणि आपल्या भावनिक जखमा भरून काढण्यासाठी तो नेहमी तयार असतो. (स्तो. ३४:१८; यश. ५७:१५) तो आपल्याला बुद्धी आणि बळ देतो आणि त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करू शकतो.—याको. १:५.
६ स्तोत्रकर्ता नंतर आकाशाकडे आपलं लक्ष वेधतो. तो म्हणतो, की यहोवा “ताऱ्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.” (स्तो. १४७:४) स्तोत्रकर्त्याला आकाशात तारे तर दिसत होते, पण त्यांची नेमकी संख्या किती आहे याची त्याला कल्पना नव्हती. आज, वैज्ञानिकांना माहीत आहे की आपल्या आकाशगंगेत कोट्यवधी तारे आहेत. आणि अशा अब्जावधी आकाशगंगा संपूर्ण विश्वात असतील! आकाशात नेमके किती तारे आहेत हे मानव मोजू शकत नाही; पण, आपल्या सृष्टिकर्त्याला ते सहजशक्य आहे. खरंतर, त्याला प्रत्येक ताऱ्याची इतकी अचूक माहिती आहे, की त्याने त्या प्रत्येकाला एक नावसुद्धा दिलं आहे. (१ करिंथ. १५:४१) कोणता तारा कुठे आहे हे जर देवाला माहीत आहे, तर तो तुम्हालाही व्यक्तिशः ओळखत नसेल का? नक्कीच. तुम्ही कुठे आहात, तुम्हाला नेमकं कसं वाटतं आणि तुम्हाला कशाची गरज आहे हे त्याला नेहमी माहीत असतं.
आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे?
७ आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याची यहोवाला जाणीव आहे आणि आपल्याला मदत करण्याचं सामर्थ्यही त्याच्याकडे आहे. (स्तोत्र १४७: ५ वाचा.) तुम्हाला कदाचित असं वाटेल, की तुमची समस्या खूप मोठी आहे आणि तुम्ही तिचा सामना करू शकत नाही. पण, यहोवा आपल्या कमतरता समजू शकतो, कारण आपण “केवळ माती आहो हे तो आठवतो.” (स्तो. १०३:१४) अपरिपूर्ण असल्यामुळे आपण वारंवार त्याच त्या चुका करतो आणि त्यांबद्दल आपल्याला अतिशय वाईटसुद्धा वाटतं. एखाद्याला नको ते बोलून गेल्यामुळे, मनात चुकीच्या इच्छा येऊ दिल्यामुळे किंवा एखाद्याचा हेवा केल्यामुळे नंतर आपल्याला किती पस्तावा होतो! यहोवा देवामध्ये कोणत्याही कमतरता नसल्या, तरी आपल्याला नेमकं कसं वाटतं हे तो अचूकपणे समजू शकतो; कारण “त्याची बुद्धी अमर्याद आहे.”—स्तो. १४७:५.
आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे?
१८ स्तोत्रकर्त्याला माहीत होतं, की यहोवाने पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमधून प्राचीन इस्राएल राष्ट्राला आपलं राष्ट्र म्हणून निवडलं आहे. केवळ हेच एक असं राष्ट्र होतं ज्याला देवाचं “वचन” आणि “नियम” देण्यात आले होते. (स्तोत्र १४७:१९, २० वाचा.) आज आपल्यालाही देवाच्या नावाने ओळखले जाण्याचा बहुमान लाभला आहे. आपल्याला यहोवाची ओळख झाली आहे, आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याजवळ त्याचं वचन आहे आणि त्याच्यासोबत आपण एक घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! खरंच, स्तोत्र १४७ च्या लेखकाप्रमाणेच यहोवाची स्तुती करण्याची आणि इतरांनाही तसं करण्याचं प्रोत्साहन देण्याची कितीतरी कारणं आज आपल्याकडे आहेत.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यहोवा के करीब अध्या. ५ ¶१६
सृजने की शक्ति—‘आकाश और पृथ्वी का कर्त्ता’
१६ भजन १४८:१० में “पक्षियों” के बारे में भी बताया गया है। ज़रा सोचिए कि पक्षियों में ही कितनी किस्में पायी जाती हैं! यहोवा ने अय्यूब को शुतुरमुर्ग के बारे में बताया, जो “घोड़े और उसके सवार दोनों को कुछ नहीं” समझता। जी हाँ, यह आठ फुट ऊँचा पक्षी भले ही उड़ने के काबिल न हो, मगर यह ६५ किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से दौड़ सकता है और एक ही डग में साढ़े चार मीटर की दूरी तय कर सकता है! (अय्यूब ३९:१३,१८) दूसरी तरफ, अल्बाट्रॉस पक्षी है जिसकी ज़्यादातर ज़िंदगी समुद्र के ऊपर उड़ते हुए बीतती है। ग्लाइडर की तरह हवा में तैरनेवाले, इस पक्षी के पंखों का फैलाव ३ मीटर तक होता है। यह बिना पंख फड़फड़ाए हवा में घंटों उड़ सकता है। मगर इन सबसे अलग, बी हमिंगबर्ड है जो दुनिया का सबसे छोटा पक्षी है और जिसकी लंबाई सिर्फ दो इंच होती है। यह पक्षी एक सेकंड में ८० बार अपने पंख फड़फड़ाता है! हमिंगबर्ड उड़ते हुए जगमगाते रत्नों जैसे लगते हैं और ये हेलीकॉप्टर की तरह हवा में मंडराते हैं और पीछे की तरफ भी उड़ सकते हैं।
१७-२३ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १
तरुणांनो—तुम्ही कोणाचं ऐकाल?
कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका
१६ तुम्ही जर एक किशोरवयीन असाल आणि तुमचे पालक तुम्हाला समजून घेत नाहीत किंवा ते खूपच कडक आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर काय? या गोष्टीचा तुम्हाला कदाचित इतका त्रास होत असेल, की यहोवाची सेवा करावी की नाही असा प्रश्न तुम्हाला पडत असेल? पण, यामुळे जर तुम्ही यहोवाची सेवा करणं सोडून दिलं, तर तुमचा निर्णय किती चुकीचा होता हे लवकरच तुम्हाला कळून येईल. कारण, या जगातली कोणतीही व्यक्ती तुमच्यावर तितकं प्रेम करू शकणार नाही, जितकं प्रेम तुमचे ख्रिस्ती आईवडील आणि मंडळीतले बंधुभगिनी करतात.
१७ जरा या गोष्टीचा विचार करा: तुमच्या आईवडिलांनी जर कधीच तुमची चूक सुधारली नाही, तर त्यांना खरंच तुमची काळजी आहे हे तुम्हाला कसं कळेल? (इब्री १२:८) अर्थात, तुमचे आईवडील परिपूर्ण नाहीत. त्यामुळे, शिस्त लावण्याची त्यांची पद्धत कदाचित तुम्हाला आवडत नसेल. पण, त्यावरच लक्ष देऊ नका; तर ते असं का वागतात किंवा बोलतात यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. शांत राहा, टोकाची प्रतिक्रिया देऊ नका. बायबल म्हणतं: “जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.” (नीति. १७:२७) सल्ला स्वीकारून त्यापासून शिकणारी प्रौढ व्यक्ती बनण्याचं ध्येय ठेवा; मग, तो सल्ला कोणत्याही पद्धतीने दिलेला असो. (नीति. १:८) यहोवावर प्रेम करणारे आईवडील आपल्यासाठी मोठा आशीर्वाद आहेत हे कधीही विसरू नका. तुम्हाला सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून तुम्हाला मदत करण्याची त्यांची इच्छा आहे.
टेहळणी बुरूज०५ २/१५ १९-२० ¶११-१२
ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कधीही नजरेआड होऊ नये
११ मनुष्याला नव्हे तर देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गटासोबत आपल्याला ओळखले जावे, स्वीकारले जावे अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. सर्वांना मित्रांची गरज असते, आणि आपले मित्र आपल्याला स्वीकारतात या जाणिवेने आपल्याला समाधान वाटते. किशोरवयात, तसेच जीवनात नंतरही साथीदारांचा दबाव अतिशय प्रभावशाली असू शकतो. या दबावामुळे कधीकधी आपण इतरांचे अनुकरण करण्यासाठी किंवा त्यांची मर्जी राखण्यासाठी काहीही करायला तयार होतो. पण साथीदार किंवा मित्र नेहमीच आपल्या हिताचा विचार करत नाहीत. कधीकधी त्यांना एखादी चुकीची गोष्ट करण्यासाठी दुसऱ्यांची साथ हवी असते. (नीतिसूत्रे १:११-१९) एखादा ख्रिस्ती जेव्हा साथीदारांच्या अशा अयोग्य दबावाला बळी पडतो तेव्हा तो सहसा आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करू लागतो. (स्तोत्र २६:४) प्रेषित पौलाने इशारा दिला: “या युगाबरोबर समरुप होऊ नका.” (रोमकर १२:२) अयोग्य वर्तनात सामील होण्याच्या दबावाला तोंड देण्यासाठी लागणारी आंतरिक शक्ती यहोवा आपल्याला पुरवतो.—इब्री लोकांस १३:६.
१२ साथीदारांच्या दबावामुळे जेव्हा ख्रिस्ती असण्याविषयीची आपली जाणीव कमजोर होऊ लागते तेव्हा आपण एक गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे. ती अशी, की लोक आपल्या विषयी काय विचार करतात किंवा बहुतेकजण काय करतात याचा विचार करण्यापेक्षा यहोवाला एकनिष्ठ राहणे जास्त महत्त्वाचे आहे. निर्गम २३:२ यातील तत्त्वाचे पालन केल्यास आपण सुरक्षित राहू शकतो: “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजनसमाजास अनुसरू नको.” बहुतेक सहइस्राएली बांधवांनी यहोवा आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करेल किंवा नाही याविषयी शंका घेतली तेव्हा कालेबने लोकांच्या मागे जाण्यास ठामपणे नकार दिला. त्याला पूर्ण खात्री होती की देवाच्या प्रतिज्ञा भरवशालायक आहेत आणि अशी भूमिका घेतल्याबद्दल त्याला उत्तम प्रतिफळ मिळाले. (गणना १३:३०; यहोशवा १४:६-११) देवासोबतचा आपला नातेसंबंध कायम राखण्यासाठी तुम्ही बहुतेक लोकांच्या मताविरुद्ध वागण्यास कालेबसारखेच तयार आहात का?
आध्यात्मिक रत्नं शोधा
खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
७ ज्यांना सहज फसवलं जाऊ शकतं अशा भोळ्याभाबड्या, अनुभव नसलेल्या लोकांना बायबलमध्ये ‘अज्ञानी लोक’ असं म्हटलं आहे. (नीति. १४:१५, तळटीप.) सेवाकार्यात अशा प्रकारचे लोक आपल्याला नेहमी भेटतात. उदाहरणार्थ, आज धार्मिक आणि राजकीय पुढारी लाखो लोकांची दिशाभूल करत असल्याचं बघायला मिळतं. अशा लोकांकडून आपली दिशाभूल झाली आहे हे समजल्यावर अनेकांना धक्काच बसतो. पण नीतिवचनं १:२२ मध्ये ज्यांना ‘अज्ञानी लोक’ म्हटलं आहे त्यांना याचा काहीच फरक पडत नाही. ते अज्ञानीच राहायची निवड करतात. कारण त्यांना तसंच राहायला आवडतं. (यिर्म. ५:३१) त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगायला आवडतं. बायबल काय म्हणतं हे शिकायला किंवा बायबलच्या नीतिनियमांप्रमाणे चालायला त्यांना आवडत नाही. कॅनडाच्या क्यूबेकमध्ये राहणाऱ्या एका अतिशय धार्मिक स्त्रीचा विचार करा. एकदा प्रचार कार्यात आपल्या एका भावाला ती भेटली तेव्हा ती त्याला म्हणाली: “जर पाळक आमची दिशाभूल करत असतील तर ही त्यांची चूक आहे, आमची नाही.” या स्त्रीसारखंच आज अनेक लोकांना वाटतं. पण आपल्याला मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या लोकांसारखं व्हायचं नाही.—नीति. १:३२; २७:१२.
२४ फेब्रुवारी–२ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २
आपल्याला वैयक्तिक अभ्यासाची उत्सुकता का असली पाहिजे?
‘सत्याच्या मार्गावर चालत राहा’
१६ सगळ्यांनाच वाचायला आणि अभ्यास करायला आवडत नाही. पण सत्याची सखोल समज मिळण्यासाठी यहोवा आपल्याला ‘शोध घेत राहायचं’ प्रोत्साहन देतो. (नीतिवचनं २:४-६ वाचा.) जर आपण अशी मेहनत घेतली, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. कॉरी नावाचा एक भाऊ सांगतो, की तो बायबल वाचताना एका वेळी एकाच वचनावर लक्ष देतो. तो सांगतो: “मी त्या वचनातली प्रत्येक फुटनोट वाचतो. मी संदर्भ वचनं उघडून पाहतो आणि थोडा रिसर्चही करतो. अशा पद्धतीने अभ्यास केल्यामुळे मला प्रत्येक वचनातून बरंच काही शिकायला मिळतं.” कदाचित आपली अभ्यास करायची पद्धत वेगळी असेल. पण आपण कोणत्याही पद्धतीने अभ्यास केला, तरीसुद्धा जेव्हा आपण त्यासाठी वेळ काढतो आणि मेहनत घेतो, तेव्हा सत्याबद्दल आपल्याला कदर आहे, हे आपण दाखवत असतो.—स्तो. १:१-३.
खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
३ आपल्या ज्ञानाचा उपयोग करून चांगले निर्णय घेण्याच्या क्षमतेला बुद्धी म्हणतात. पण खरी बुद्धी यापेक्षा खूप वेगळी आहे. बायबल म्हणतं: “यहोवाची भीती बाळगणं हीच बुद्धीची सुरुवात आहे, आणि परमपवित्र देवाचं ज्ञान हीच समजशक्ती आहे.” (नीति. ९:१०) त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपण ‘परमपवित्र देवाच्या ज्ञानाच्या’ आधारावर, म्हणजे यहोवाचे विचार लक्षात घेऊन ते घेतले पाहिजेत. आपल्याला हे कसं करता येईल? त्यासाठी आपण बायबलचा आणि बायबलवर आधारित प्रकाशनांचा अभ्यास करू शकतो. असं करून आपण खरी बुद्धी दाखवत असतो.—नीति. २:५-७.
४ फक्त यहोवाच आपल्याला खरी बुद्धी देऊ शकतो. (रोम. १६:२७) असं का म्हणता येईल? पहिलं कारण म्हणजे, तो आपला निर्माणकर्ता आहे आणि त्याने जे काही निर्माण केलंय त्याबद्दल त्याला अमर्याद ज्ञान आहे. (स्तो. १०४:२४) दुसरं कारण म्हणजे, तो जे काही करतो त्यातून त्याची अफाट बुद्धी दिसून येते. (रोम. ११:३३) आणि तिसरं कारण म्हणजे, जे त्याच्या सुज्ञ सल्ल्यांप्रमाणे चालतात त्यांना नेहमी फायदाच होतो. (नीति. २:१०-१२) आपल्याला जर खरी बुद्धी मिळवायची असेल, तर या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. आणि कोणतेही निर्णय घेताना किंवा कोणतंही काम करताना आपण या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
तरुणांनो, आपला विश्वास मजबूत करा
२ देवाने आपल्याला निर्माण केलं आहे, यावर अनेक जण विश्वास ठेवत नाहीत. जर तुम्ही तरुण आहात व यहोवाचे सेवक आहात किंवा त्याच्याबद्दल शिकत आहात, तर तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडला असेल की, ‘यहोवा देवानेच सर्व काही निर्माण केलं आहे हे इतरांना कसं पटवून द्यावं?’ आपण जे शिकतो, ऐकतो किंवा वाचतो त्यावर विचार करण्यासाठी आणि तर्क करण्यासाठी बायबल आपल्याला मदत करतं. देवाचं वचन म्हणतं: “विवेक तुझे रक्षण करेल.” या वचनात ‘विवेक’ या शब्दासाठी मूळ इब्री भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ ‘विचार करण्याची क्षमता’ असा होतो. मग बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे विचार करण्याची क्षमता आपलं संरक्षण कशी करू शकते? या क्षमतेमुळे आपल्याला खोट्या शिकवणींना बाजूला सारून देवावरील आपला विश्वास आणखी मजबूत करण्यास मदत मिळते.—नीतिसूत्रे २:१०-१२ वाचा.
३ पण यहोवावरचा आपला विश्वास मजबूत होण्यासाठी, आपण त्याच्याविषयी आणखी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. (१ तीम. २:४) यासाठी जेव्हा तुम्ही बायबल किंवा आपली प्रकाशनं वाचता, तेव्हा थोडं थांबून वाचलेल्या गोष्टींवर विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जे वाचत आहात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. (मत्त. १३:२३) जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अभ्यास कराल तेव्हा यहोवाच निर्माणकर्ता असल्याचा आणि बायबल हे देवाचं वचन असल्याचे भरपूर पुरावे तुम्हाला मिळतील. (इब्री ११:१) तुम्हाला हे कसं करता येईल याबद्दल आपण आता पाहू.
आध्यात्मिक रत्नं शोधा
‘सत्याच्या मार्गावर चालत राहा’
१६ सगळ्यांनाच वाचायला आणि अभ्यास करायला आवडत नाही. पण सत्याची सखोल समज मिळण्यासाठी यहोवा आपल्याला ‘शोध घेत राहायचं’ प्रोत्साहन देतो. (नीतिवचनं २:४-६ वाचा.) जर आपण अशी मेहनत घेतली, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. कॉरी नावाचा एक भाऊ सांगतो, की तो बायबल वाचताना एका वेळी एकाच वचनावर लक्ष देतो. तो सांगतो: “मी त्या वचनातली प्रत्येक फुटनोट वाचतो. मी संदर्भ वचनं उघडून पाहतो आणि थोडा रिसर्चही करतो. अशा पद्धतीने अभ्यास केल्यामुळे मला प्रत्येक वचनातून बरंच काही शिकायला मिळतं.” कदाचित आपली अभ्यास करायची पद्धत वेगळी असेल. पण आपण कोणत्याही पद्धतीने अभ्यास केला, तरीसुद्धा जेव्हा आपण त्यासाठी वेळ काढतो आणि मेहनत घेतो, तेव्हा सत्याबद्दल आपल्याला कदर आहे, हे आपण दाखवत असतो.—स्तो. १:१-३.