वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb25 जानेवारी पृ. २-३
  • ६-१२ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ६-१२ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२५
mwb25 जानेवारी पृ. २-३

६-१२ जानेवारी

स्तोत्रं १२७-१३४

गीत १३४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आईवडिलांनो—आपल्या अनमोल वारशाची काळजी घेत राहा

(१० मि.)

कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी यहोवा आईवडिलांना मदत करेल असा भरवसा ते ठेवू शकतात (स्तो १२७:१, २)

मुलं यहोवाकडून मिळालेला अनमोल वारसा आहेत (स्तो १२७:३; टेहळणी बुरूज२१.०८ ५ ¶९)

प्रत्येक मुलाची गरज ओळखून त्याला त्याप्रमाणे प्रशिक्षण द्या (स्तो १२७:४; टेहळणी बुरूज१९.१२ २७ ¶२०)

”बायबल धडे” हे माहितीपत्रक वापरून एक वडील आपल्या दोन मुलांसोबत अभ्यास करत आहे. आपण नंदनवनात हत्ती आणि गोरीलासोबत खेळतोय अशी ती मुलं कल्पना करत आहेत.

आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी आईवडील जेव्हा यहोवावर भरवसा ठेवतात आणि मनापासून प्रयत्न करतात तेव्हा ते यहोवाला आवडतं

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १३१:१, २—आईवडील या वचनांमधून काय शिकू शकतात? (टेहळणी बुरूज२१.०७ २१-२२ ¶६)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १३२:१-१८ (शिकवणे अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ३)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरची व्यक्‍ती बायबलच्या विरोधात असलेल्या शिकवणीबद्दल बोलते. (शिष्य बनवा धडा ५ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १६ मुद्दे ४-५. पुढच्या आठवड्यात तुम्ही अभ्यास घ्यायला प्रत्यक्ष नसल्यामुळे, तुम्ही बायबल अभ्यासाची काय व्यवस्था केली आहे हे विद्यार्थ्याला सांगा. (शिष्य बनवा धडा १० मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत १३

७. आईवडिलांनो—तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही हे जबरदस्त साधन वापरत आहात का?

(१५ मि.) चर्चा.

आईवडिलांना आपल्या मुलांना शिकवता यावं म्हणून यहोवाच्या संघटनेने बरीच प्रकाशनं काढली आहेत. असं असलं तरी, मुलांना शिकवण्यासाठी आईवडिलांकडे असलेलं जबरदस्त साधन म्हणजे त्यांचं स्वतःचं उदाहरण.—अनु ६:५-९.

आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी येशूनेही हेच साधन वापरलं.

योहान १३:१३-१५ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • स्वतःच्या उदाहरणातून शिकवण्याची येशूची पद्धत प्रभावी होती असं तुम्हाला का वाटतं?

तुम्ही मुलांना जे शिकवता तेच तुम्ही स्वतः करता, तेव्हा त्याचा मुलांवर चांगला प्रभाव पडतो. तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे तुम्ही शिकवलेल्या गोष्टी मुलं ऐकतील आणि त्याप्रमाणे वागतील.

कोलाज: “आम्ही मुलांसमोर स्वतःचं चांगलं उदाहरण ठेवलं” या व्हिडिओमधली दृष्यं. १. गार्सिया कुटुंब कारमध्ये बसून सभेला चाललंय. २. सभेवरून परत आल्यावर कुटुंब सोबत मिळून नाश्‍ता करत बोलत आहे. ३. ब्रदर गार्सिया आपल्या अभ्यासातून वेळ काढून आपल्या मुलीसोबत बोलत आहेत. ४. ब्रदर आणि सिस्टर गार्सिया बायबलमधून आपल्या एका मुलीशी तर्क करत आहेत.

आम्ही मुलांसमोर स्वत:चं चांगलं उदाहरण ठेवलं हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

  • ब्रदर आणि सिस्टर गार्सिया यांनी आपल्या मुलींना कोणते महत्त्वाचे धडे शिकवले?

  • आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडत राहण्यासाठी या व्हिडिओमुळे तुम्हाला कशी मदत झाली आहे?

मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडून . . .

  • त्यांना मनोरंजनाबद्दल, मद्याबद्दल आणि सोशल मिडियाच्या वापराबद्दल योग्य निर्णय घ्यायला शिकवा

  • आध्यात्मिक गोष्टींना पहिली जागा द्यायला शिकवा

  • आपल्या विवाहसोबत्याशी प्रेमाने आणि आदराने वागायला शिकवा

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. २० ¶१३-२०

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा