वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 नोव्हेंबर पृ. २-१६
  • ४-१० नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 नोव्हेंबर पृ. २-१६

४-१० नोव्हेंबर

स्तोत्र १०५

गीत ३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

वचन दिलेला देश. कोलाज: १. अब्राहाम २. इसहाक ३. याकोब.

१. “त्याचा करार तो सर्वकाळ आठवणीत ठेवतो”

(१० मि.)

यहोवाने अब्राहामला अभिवचन दिलं आणि त्याबद्दल नंतर इसहाक आणि याकोबलाही सांगितलं (उत्प १५:१८; २६:३; २८:१३; स्तो १०५:८-११)

हे अभिवचन पूर्ण होणार नाही असं वाटत होतं (स्तो १०५:१२, १३; टेहळणी बुरूज२३.०४ २८ ¶११-१२)

अब्राहामसोबत केलेला करार यहोवा कधीच विसरला नाही (स्तो १०५:४२-४४; इन्साइट-२ १२०१ ¶२)


स्वतःला विचारा, ‘यामुळे यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवायला मला कशी मदत होते?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १०५:१९—‘यहोवाच्या वचनांमुळे’ योसेफला चांगले गुण वाढवायला कशी मदत झाली? (टेहळणी बुरूज१६.०८ २३ ¶१३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो १०५:२४-४५ (शिकवणे अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(१ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक व्यस्त आहे. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक वाद घालायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेमाने आणि शांतीने संभाषण तिथेच थांबवा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ५)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या भेटीत ज्या विषयात आवड दाखवली होती त्या विषयावर असणारं मासिक वाचायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

७. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. JW लायब्ररी ॲपबद्दल समोरच्या व्यक्‍तीला सांगा आणि ते डाऊनलोड करायला मदत करा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत ८४

८. तुमच्या प्रेमाचा पुरावा

(१५ मि.) चर्चा.

जेव्हा आपण आपला वेळ, शक्‍ती आणि साधनसंपत्ती राज्याच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी वापरतो, तेव्हा आपण आपल्या राजावर, ख्रिस्त येशूवर प्रेम असल्याचं दाखवत असतो. अशा प्रकारे आपण आपलं प्रेम दाखवतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो आणि भाऊबहिणींना फायदा होतो. (योह १४:२३) “दान किए गए पैसों का इस्तेमाल कैसे किया जाता है?” या jw.org वर असलेल्या लेखमालिकेत जगभरातल्या भाऊबहिणींना आपल्या दानातून कशा प्रकारे जबरदस्त मदत होत आहे ते सांगितलंय.

दानपेटीत दान टाकत असताना एका माणसाचा हात. कोलाज: १. एक भाऊ न्यायालयात न्यायाधीशाच्या समोर उभा आहे. २. एक बहीण संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात काम करत आहे. ३. एक बहीण साईन लँग्वेजमधला व्हिडिओ पाहत आहे.

तुमच्या दानामध्ये आहे ताकद! हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  • मिळालेल्या दानाचा आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी वापर केल्यामुळे भाऊबहिणींना कसा फायदा झाला आहे?

  • मिळालेल्या दानाचा ‘समानतेने’ वापर केल्यामुळे राज्य सभागृहांच्या बांधकामांसाठी त्याचा कसा फायदा झाला आहे?—२कर ८:१४

  • बायबलचं अनेक भाषांमध्ये भाषांतर करायच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी मिळालेल्या दानाचा वापर केल्यामुळे कोणते फायदे झाले आहेत?

ऑनलाईन माहिती घ्या

The “Donations” icon, which shows a hand holding a coin.

यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाला मदत करण्यासाठी तुम्ही दान कसं देऊ शकता? JW लायब्ररी ॲपच्या होमपेजवर सर्वात खाली दिलेल्या दानाच्या चिन्हावर क्लिक करा. बऱ्‍याच देशांसाठी या पेजवर तुम्हाला FAQ टॅब पाहायला मिळेल. या टॅबवर क्लिक केल्यानंतर यहोवा के साक्षियों के लिए दान—अकसर पूछे जानेवाले सवाल असा विषय असलेली माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या अध्या. १७ ¶१३-१९

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ९४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा