वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 मार्च पृ. १३
  • २२-२८ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २२-२८ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 मार्च पृ. १३

२२-२८ एप्रिल

स्तोत्रं ३२-३३

गीत १०३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आपण गंभीर पाप का कबूल केलं पाहिजे?

(१० मि.)

दावीदने आपलं पाप लपवायचा प्रयत्न केला तेव्हा त्या ओझ्याने तो खूप हताश झाला. हे कदाचित बथशेबासोबत केलेलं पाप असावं (स्तो ३२:३, ४; अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४ १२ ¶७)

दावीदने यहोवासमोर आपलं पाप कबूल केलं आणि यहोवाने त्याला माफ केलं (स्तो ३२:५; यहोवा के करीब २६२ ¶८)

यहोवाने क्षमा केल्यामुळे दोषीपणाच्या भावनेतून दावीदचं मन हलकं झालं (स्तो ३२:१; टेहळणी बुरूज०१ ६/१ ३० ¶१)

कोलाज: १. एका तरुण भावाला खूप मनःस्ताप झालाय आणि त्याने आपलं तोंड हातांनी झाकून घेतलंय. २. तो प्रार्थना करतोय. ३. तो मंडळीतल्या दोन वडिलांना भेटतो. ४. त्याचा विवेक शुद्ध असल्यामुळे तो आनंदी दिसतोय.

आपल्या हातून जर एखादं गंभीर पाप झालं असेल, तर आपण नम्रपणे यहोवासमोर ते कबूल केलं पाहिजे आणि त्याच्याकडे क्षमेची याचना केली पाहिजे. तसंच यहोवासोबतचं आपलं नातं पुन्हा घट्ट करण्यासाठी आपण मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली पाहिजे. (याक ५:१४-१६) त्यामुळे यहोवाकडून आपल्याला तजेला मिळेल.—प्रेका ३:१९.

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ३३:६—यहोवाचा “श्‍वास” म्हणजे काय? (टेहळणी बुरूज०६ ६/१ ५ ¶५)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) स्तो ३३:१-२२ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. नम्रपणे वागा—पौलने काय केलं?

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि शिष्य बनवा  धडा ४ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. नम्रपणे वागा—पौलने केलं तसं करा

(८ मि.) शिष्य बनवा  धडा ४ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर आधारित चर्चा करा.

ख्रिस्ती जीवन

गीत ६२

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ८ ¶२२-२४, पान ६७ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ३९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा