वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb24 जानेवारी पृ. ८-९
  • २९ जानेवारी-४ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ जानेवारी-४ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२४
mwb24 जानेवारी पृ. ८-९

२९ जानेवारी–४ फेब्रुवारी

ईयोब ४०-४२

गीत १२९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. ईयोबच्या अनुभवातून शिकण्यासारखे धडे

(१० मि.)

यहोवाच्या आणि आपल्या दृष्टिकोनात खूप फरक आहे (ईयो ४२:१-३; टेहळणी बुरूज१० १०/१५ ३-४ ¶४-६)

यहोवा आणि त्याच्या संघटनेकडून मिळणारा सल्ला स्वीकारायला उशीर करू नका (ईयो ४२:५, ६; टेहळणी बुरूज१७.०६ २५ ¶१२)

परीक्षेतून जात असतानाही एकनिष्ठ राहणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो (ईयो ४२:१०-१२; याक ५:११; टेहळणी बुरूज२२.०६ २५ ¶१७-१८)

ईयोब आणि त्याची पत्नी आनंदाने एकमेकांकडे पाहत आहेत. ईयोब आपल्या कळपाकडे आणि घराकडे इशारा करत आहे.

ईयोबच्या एकनिष्ठेमुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिले

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • ईयो ४२:७—ईयोबचे तीन मित्र खरंतर कोणाविरुद्ध बोलत होते आणि ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपली जेव्हा टीका केली जाते तेव्हा तिचा सामना करायला आपल्याला कशी मदत होईल? (इन्साइट-२ ८०८)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

(४ मि.) ईयो ४२:१-१७ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक ख्रिस्ती नाही. (शिष्य बनवा  धडा ५ मुद्दा ३)

५. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा १३ मुद्दा ६-७ आणि काही जण म्हणतात (शिष्य बनवा  धडा ११ मुद्दा ४)

६. भाषण

(४ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती क मुद्दा २​—विषय: पृथ्वीचा कधीच नाश होणार नाही. (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

गीत १०८

७. इतरांना यहोवाच्या प्रेमाची जाणीव करून द्या

(१५ मि.) चर्चा.

“यहोवाच्या कुटुंबात आम्ही ख्रिस्ती प्रेम अनुभवलं” या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. मिमि आणि तिची आई हॉस्पिटलमध्ये असलेल्या बहिणीसाठी फुलं आणि कार्ड घेऊन आलेत.

देव प्रेम आहे. (१यो ४:८, १६) आणि अशा देवाची उपासना करणं हा आपल्यासाठी मोठा बहुमान आहे. त्याच्या प्रेमामुळेच आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याच्याशी मैत्री करायला प्रवृत्त होतो. आणि त्याचे सेवक असल्यामुळे आपण सर्व जण त्याचं हे प्रेम अनुभवतो.

आपण आपल्या घरच्यांशी, मंडळीतल्या भाऊबहिणींशी आणि इतरांशी प्रेमाने वागतो, तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो. (ईयो ६:१४; १यो ४:११) आपण इतरांशी प्रेमाने वागतो, तेव्हा त्यांना यहोवाची ओळख करून घ्यायला आणि त्याच्या जवळ जायला मदत करत असतो. पण जर आपण त्यांच्याशी प्रेमाने वागलो नाही, तर त्यांना कदाचित यहोवाच्या प्रेमाची जाणीव होणार नाही.

यहोवाच्या कुटुंबात आम्ही ख्रिस्ती प्रेम अनुभवलं  हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:

इतरांवर प्रेम करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लैलै आणि मिमिच्या उदाहरणातून कसं शिकायला मिळतं?

आपल्या भाऊबहिणींना यहोवाच्या प्रेमाची जाणीव व्हावी म्हणून आपण कायकाय करू शकतो?

  • आपले भाऊबहीण यहोवाची मेंढरं आहेत आणि ते त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहेत असा दृष्टिकोन ठेवा.​—स्तो १००:३

  • त्यांना नेहमी प्रोत्साहन मिळेल असं बोला.​—इफि ४:२९

  • त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा.​—मत्त ७:११, १२

८. मंडळीचा बायबल अभ्यास

(३० मि.) साक्ष द्या  अध्या. ५ ¶१-८, पान ३९ वरची चौकट

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १२६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा