वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ७
  • यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • वडिलांची मदत घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • भावांनो, तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ७

ख्रिस्ती जीवन

यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ

ज्यांच्याकडे अधिकार असतो त्यांच्यावर लोक सहसा भरवसा ठेवत नाहीत. आणि खरंतर त्यात त्या लोकांचीही काही चूक नसते. कारण आजपर्यंत अनेक लोकांनी स्वार्थासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. (मीख ७:३) पण आपल्या मंडळीतल्या वडिलांच्या बाबतीत असं नाही. त्यांना यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करायला शिकवलं जातं आणि यासाठी आपण खरंच किती आभारी आहोत!—एस्ते १०:३; मत्त २०:२५, २६.

आज जगात ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्यापेक्षा मंडळीतले वडील खूप वेगळे आहेत. त्यांचं यहोवावर आणि त्याच्या लोकांवर प्रेम असल्यामुळे ते मंडळीत देखरेख करायची जबाबदारी स्वीकारतात. (योह २१:१६; १पेत्र ५:१-३) ते येशूच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतात. आणि प्रत्येक प्रचारकाला तो यहोवाच्या कुटुंबाचा भाग आहे याची खातरी करून देतात. तसंच यहोवाच्या जवळ राहायलासुद्धा ते भाऊबहिणींना मदत करतात. भाऊबहिणींना प्रोत्साहनाची गरज असते किंवा एखादा तातडीचा प्रसंग उद्‌भवतो, किंवा नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा ते लगेच मदतीला धावून जातात. तुम्हालाही जर मदतीची गरज असेल तर तुमच्या मंडळीतल्या एखाद्या वडिलांशी बोलायला संकोच करू नका.—याक ५:१४.

“मेंढरांची काळजी घेणारे मेंढपाळ” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. मंडळीतले वडील ब्रदर एलियासला मिठी मारून भेटत आहेत.

मेंढरांची काळजी घेणारे मेंढपाळ,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • वडिलांनी पुरवलेल्या मदतीमुळे मारीयानाला कसा फायदा झाला?

  • वडिलांनी पुरवलेल्या मदतीमुळे एलियासला कसा फायदा झाला?

  • हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, वडील मंडळीत जे काम करतात त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

मंडळीतल्या वडिलांशी स्वतःहून बोला जर . . .

  • तुमच्या घराचा पत्ता किंवा फोन नंबर बदलला असेल तर

  • तुम्ही एखाद्या कठीण समस्येचा सामना करत असाल तर

  • तुम्ही जास्त काळासाठी दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जाणार असाल तर

  • आरोग्याची गंभीर समस्या आली किंवा हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं तर

  • तुम्ही गंभीर पाप केलं असेल तर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा