वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ५
  • तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • मी त्रास देणाऱ्‍यांचा सामना कसा करू शकतो?
    तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
  • दांडगाई करण्यात गैर काय?
    सावध राहा!—१९९७
  • “मला मरावं लागलं तरी चालेल”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ५
एक तरुण मुलगी पालकांना तिचा फोन दाखवत आहेत आणि तिला काय वाटतं ते सांगत आहे. तिचे पालक तिचं लक्ष देऊन ऐकत आहेत.

ख्रिस्ती जीवन

तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा

काही लोक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ शकतात. ते आपल्याला मारहाण करू शकतात किंवा मानसिक त्रास देऊ शकतात. तसंच, आपण यहोवाची उपासना करू नये म्हणून ते आपल्याला घाबरवू शकतात. आणि यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर करायचा प्रयत्न करू शकतात. तर मग अशा त्रास देणाऱ्‍या लोकांपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकता?

यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांनी त्याच्यावर भरवसा ठेवून त्रास देणाऱ्‍या लोकांचा यशस्वीपणे सामना केला आहे. (स्तो १८:१७) उदाहरणार्थ, एस्तेरने हामान नावाच्या एका दुष्ट माणसाचा कट उघड करण्यासाठी राजाला त्याबद्दल सांगितलं. (एस्ते ७:१-६) पण असं करण्याआधी तिने उपास केला आणि यहोवावर तिचा भरवसा आहे हे दाखवलं. (एस्ते ४:१४-१६) यहोवाने तिच्या कामांवर आशीर्वाद दिला आणि तिचं आणि त्याच्या लोकांचं संरक्षण केलं.

तरुणांनो, तुम्हालाही कोणी त्रास देत असेल तर यहोवाकडे मदत मागा. तसंच तुमच्या पालकांशी किंवा त्यांच्यासारख्या एखाद्या प्रौढ व्यक्‍तीशी या समस्येबद्दल बोला. यहोवाने जसं एस्तेरला मदत केली तशी तो तुम्हालाही मदत करेल याची खातरी ठेवा. पण त्रास देणाऱ्‍या लोकांचा सामना करण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?

माझे किशोरवयातले दिवस—शाळेत मुलं त्रास देतात तेव्हा?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • चार्ली आणि फेरिनच्या उदाहरणातून मुलं काय शिकू शकतात?

  • चार्ली आणि फेरिनने जे म्हटलं त्यावरून, पालक आपल्या मुलांना त्रास देणाऱ्‍या लोकांचा सामना करण्यासाठी कशी मदत करू शकतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा