वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मे पृ. १५
  • लोकांसोबत संभाषण सुरू करून आनंद मिळवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लोकांसोबत संभाषण सुरू करून आनंद मिळवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • योग्य मनोवृत्ती असलेल्यांना लवकरात लवकर मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मे पृ. १५

ख्रिस्ती जीवन

लोकांसोबत संभाषण सुरू करून आनंद मिळवा

लोकांसोबत दररोजच्या विषयांवर सहज गप्पागोष्टी करणं हा साक्ष देण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे. आणि त्यातून खूप आनंदही मिळतो. पण बायबलमधली एखादी माहिती कशी सांगता येईल यावर जर आपण खूप जास्त विचार करत बसलो, तर संभाषण सुरू करायच्या विचारानेच आपल्याला भीती वाटेल. त्यामुळे साक्ष देण्यासाठी काय बोलता येईल याबद्दल जास्त विचार करत बसण्यापेक्षा त्यांच्याशी बोलायला, त्यांचे विचार जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं हे दाखवा. (मत्त २२:३९; फिलि २:४) आणि मग गप्पांच्या ओघात जर आपल्या विश्‍वासाबद्दल काहीतरी सांगायची संधी मिळाली तर त्या संधीचा फायदा घ्या. आणि त्यासाठी आपल्याकडे बरीच साधनं उपलब्ध आहेत.

गप्पागोष्टी करताना जर साक्ष द्यायची संधी मिळाली तर तुम्ही पुढे दिलेल्या साधनांचा कशा प्रकारे वापर करू शकता?

JW.ORG संपर्क कार्ड
jw.org चा लोगो.
कोलाज: वेगवेगळ्या पत्रिका. १. “बायबलबद्दल तुमचं काय मत आहे?” २. “भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?” ३. “कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?” ४. “जगावर खरंतर कोणाचं नियंत्रण आहे?” ५. “दुःख कधी संपेल का?” ६. “मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?” ७. “देवाचं राज्य काय आहे?” ८. “जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?”

दुसऱ्‍यांकडून शिका कुशल बना—संभाषणाची सुरुवात,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

संभाषणाची कौशल्यं वाढवण्यासाठी तुम्ही कोणती तीन पावलं उचलू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा