वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. १५
  • आपल्या प्रार्थनांना यहोवा मौल्यवान समजतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या प्रार्थनांना यहोवा मौल्यवान समजतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • तुमच्या प्रार्थना “धुपाप्रमाणे” आहेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुमच्या प्रार्थना केवढ्या अर्थभरीत आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • ‘प्रार्थना ऐकणाऱ्‍याकडे’ कसे याल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. १५
कोलाज: जगभरातले भाऊबहीण प्रार्थना करत आहेत. १. एक लहान मुलगी आपल्या आईसोबत झोपताना प्रार्थना करत आहे. २. एक पती हॉस्पिटलमध्ये बेडवर असलेल्या आपल्या पत्नीसोबत प्रार्थना करत आहे. ३. एक भाऊ डोंगर चढताना प्रार्थना करत आहे. ४. चिंतेत असलेली बहीण प्रार्थना करत आहे. ५. एक बहीण बायबल अभ्यास घ्यायला जाण्याआधी प्रार्थना करत आहे. ६. एक भाऊ जेमतेम परिस्थिती असलेल्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. ७. जेवणाच्या आधी आईवडील आपल्या लहान मुलीसोबत प्रार्थना करत आहे.

ख्रिस्ती जीवन

आपल्या प्रार्थनांना यहोवा मौल्यवान समजतो

मंदिरात नियमितपणे यहोवासमोर धूप जाळला जायचा. यहोवाच्या इच्छेप्रमाणे केलेल्या प्रार्थनासुद्धा त्या सुगंधी धूपासारख्या आहेत. (स्तो १४१:२) जेव्हा आपण प्रार्थनेत आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल वाटणारं प्रेम आणि कदर व्यक्‍त करतो, आपल्या चिंता आणि इच्छा त्याला सांगतो आणि त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी विनंती करतो, तेव्हा आपण दाखवतो की यहोवासोबतचं मैत्रीचं नातं आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. सभांमध्ये सर्वांच्या वतीने केल्या जाणाऱ्‍या प्रार्थना सहसा थोडक्यात केल्या जातात. आणि यहोवा या प्रार्थनांचीही कदर करतो. कारण त्या आपल्या उपासनेचा महत्त्वाचा भाग आहेत. पण, आपल्या वैयक्‍तिक प्रार्थनांमध्ये जेव्हा आपण यहोवासमोर आपलं मन मोकळं करून बराच वेळ त्याच्याशी बोलतो तेव्हा त्याला किती आनंद होत असेल!—नीत १५:८.

मी नेहमी यहोवाकडे प्रार्थना करतो  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बंधू जॉन्सन यांनी कोणकोणत्या मार्गाने यहोवाची सेवा केली?

  • बंधू जॉन्सन कशा प्रकारे प्रार्थनेद्वारे यहोवावर विसंबून राहिले?

  • बंधू जॉन्सन यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा