वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ११
  • जगाच्या अंताच्या वेळी आपला बचाव होईल अशी खातरी बाळगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगाच्या अंताच्या वेळी आपला बचाव होईल अशी खातरी बाळगा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • हर्मगिदोनची आतुरतेने वाट पाहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • कशा रीतीने होईल या जगाचा अंत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • अंत जवळ येत असताना यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा निश्‍चय करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ११
एक बांधव “शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!” या पुस्तकाचा अभ्यास करत आहे. हर्मगिदोनच्या वेळी यहोवाचा स्वर्गदूत त्याच्या सेवकांचं संरक्षण करत असल्याची तो कल्पना करत आहे.

ख्रिस्ती जीवन

जगाच्या अंताच्या वेळी आपला बचाव होईल अशी खातरी बाळगा

आजपर्यंत यहोवाने या जगातल्या लोकांना सहन केलंय. पण आता लवकरच त्याचा धीर संपेल. खोट्या धर्मांचा नाश होईल, राष्ट्रांचा समूह देवाच्या लोकांवर हल्ला करेल आणि हर्मगिदोनात यहोवा दुष्ट लोकांचा नाश करेल. या सगळ्या रोमांचक आणि महत्त्वाच्या घटनांची आपण वाट पाहत आहोत.

मोठ्या संकटादरम्यान काय-काय होईल याबद्दल बारीकसारीक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. उदाहरणार्थ, मोठं संकट नेमकं कधी सुरू होईल, राजकीय सत्ता खोट्या धर्मांवर हल्ला करण्यासाठी कोणती कारणं पुढे करतील आणि देवाच्या लोकांवर राष्ट्रांचा हल्ला किती काळ चालेल आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी सामील असतील हे आपल्याला माहीत नाही. हर्मगिदोनात दुष्टांचा नाश करण्यासाठी यहोवा नेमक्या कोणत्या गोष्टींचा वापर करेल हेसुद्धा आपल्याला माहीत नाही.

पण भविष्यात होणाऱ्‍या या गोष्टींचा आत्मविश्‍वासाने आणि धैर्याने सामना करण्यासाठी आपल्याला लागणारी सगळी माहिती शास्त्रवचनांमध्ये दिली आहे. उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे, की आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत. (२ती ३:१) आपल्याला हेही माहीत आहे की खऱ्‍या धर्माचा नाश होऊ नये म्हणून खोट्या धर्मावर होणाऱ्‍या हल्ल्याचे दिवस ‘कमी करण्यात येतील.’ (मत्त २४:२२) आणि यहोवा त्याच्या लोकांचं नक्की संरक्षण करेल. (२पेत्र २:९) तसंच आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी आणि मोठ्या लोकसमुदायाला हर्मगिदोनातून वाचवण्यासाठी यहोवाने ज्याची निवड केली आहे तो नीतीने न्याय करणारा आणि शक्‍तिशाली आहे.—प्रक १९:११, १५, १६.

पुढे होणाऱ्‍या या घटनांमुळे लोक घाबरतील आणि त्यांचे “हातपाय गळून जातील.” पण यहोवाने त्याच्या लोकांना आधी कसं वाचवलं होतं आणि भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींबद्दल त्याने आपल्याला जे सांगितलंय त्याबद्दल वाचून आपण त्यावर मनन करू शकतो. असं केल्यामुळे आपल्याला आपलं ‘डोकं वर करून ताठ उभं राहता येईल.’ कारण आपल्या सुटकेची वेळ जवळ आहे याची आपल्याला पूर्ण खातरी असेल.—लूक २१:२६, २८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा