वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ५
  • लग्न—आयुष्यभराची साथ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लग्न—आयुष्यभराची साथ
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • लग्न करणं किंवा न करणं याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • यशस्वी विवाहाकरता तयारी करणे
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ५
एक जोडपं सोबत मिळून प्रचारकार्य करत आहे.

ख्रिस्ती जीवन

लग्न—आयुष्यभराची साथ

ख्रिस्ती पतीपत्नीच्या यशस्वी विवाहामुळे यहोवाचा सन्मान होतो आणि पतीपत्नींनाही त्यातून आनंद मिळतो. (मार्क १०:९) पण विवाह टिकून राहावा आणि तो आनंदी असावा, म्हणून यहोवाच्या सेवकांनी जोडीदाराची निवड करताना बायबल तत्त्वांचं पालन केलं पाहिजे.

बायबल असा सल्ला देतं, की ‘ऐन तारुण्याचा काळ ओसरल्यावरच’ लग्नाचा विचार करावा. कारण या काळात लैंगिक भावना तीव्र असल्यामुळे योग्य निर्णय घेणं कठीण जाऊ शकतं. (१कर ७:३६) याउलट, अविवाहित असताना देवासोबतचं नातं घट्ट्‌ करायचा आणि ख्रिस्ती गुण विकसित करायचा प्रयत्न करणं सुज्ञतेचं ठरेल. असं केल्यामुळे पुढे तुम्हाला एक चांगला जोडीदार बनता येईल आणि तुमचा विवाह यशस्वी होईल.

लग्नाचा निर्णय घेण्याआधी, भावी जोडीदाराला जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ घ्या. “मनातल्या गुप्त व्यक्‍तीला” ओळखायचा प्रयत्न करा. (१पेत्र ३:४) जर तुम्हाला असं वाटलं की एखाद्या गोष्टीमुळे पुढे मोठी समस्या निर्माण होऊ शकते, तर तुमच्या भावी जोडीदाराशी याबद्दल चर्चा करा. (फिलि २:३, ४) कोणतंही नातं यशस्वी होण्यासाठी, त्या नात्यातून मला काय मिळेल याचा विचार करण्यापेक्षा मला काय देता येईल याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचंय. वैवाहिक नात्याबद्दलही हेच खरंय. जर लग्नाआधी तुम्ही बायबलच्या तत्त्वांप्रमाणे वागलात, तर पुढेही तसं करत राहणं तुम्हाला सोपं जाईल आणि यामुळे तुमचं वैवाहिक जीवन आनंदी होईल.

वैवाहिक जीवनाची तयारी—भाग ३: ‘खर्चाचा हिशोब लावा’  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • व्हिडिओत दाखवलेल्या बहिणीची सॅमसोबत ओळख कशी वाढली?

  • ओळख वाढल्यावर कोणत्या गोष्टी तिच्या लक्षात आल्या?

  • तिच्या आईवडिलांनी तिला कशी मदत केली आणि तिने कोणता योग्य निर्णय घेतला?

लग्नाच्या विचारात असलेला मुलगा मुलीबद्दल या प्रश्‍नांवर विचार करू शकतो:

तिच्यामध्ये कोणते ख्रिस्ती गुण आहेत? देवाच्या राज्याला तिच्या जीवनात पहिलं स्थान आहे हे दिसून येतं का? बायबलमधून आणि संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचा ती आदर करते का? तिला इतरांची काळजी आहे हे तिच्या वागण्यातून दिसून येतं का?

लग्नाच्या विचारात असलेली मुलगी मुलाबद्दल या प्रश्‍नांवर विचार करू शकते:

त्याच्यामध्ये कोणते ख्रिस्ती गुण आहेत? तो नोकरी, पैसा, खेळ, मनोरंजन यांपेक्षा यहोवाच्या उपासनेला आणि मंडळीतल्या जबाबदाऱ्‍यांना जास्त महत्त्व देतो का? तो त्याच्या घरच्यांशी कसा वागतो? त्याला इतरांची काळजी आहे हे त्याच्या वागण्यातून दिसून येतं का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा