वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. ११
  • आपल्या इच्छांना ताब्यात ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या इच्छांना ताब्यात ठेवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. ११

ख्रिस्ती जीवन

आपल्या इच्छांना ताब्यात ठेवा

अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला कायम आपल्या इच्छांना ताब्यात ठेवण्यासाठी झगडावं लागतं. आपण जर या इच्छांना आपल्यावर ताबा मिळवू दिला, तर यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येऊ शकतं. उदाहरणार्थ, काही जण देवापेक्षा खाणंपिणं, कपडालत्ता आणि घरदार यांसारख्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. तर काही जण आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाच्या तत्त्वांच्या विरोधात वागतात. (रोम १:२६, २७) तसंच, लोकांनी आपल्याला त्यांच्यात सामील करून घ्यावं म्हणून काही जण चुकीच्या गोष्टी करण्याच्या त्यांच्या दबावाला बळी पडतात.—निर्ग २३:२.

मग आपण आपल्या इच्छांवर कशा प्रकारे नियंत्रण मिळून शकतो? यासाठी आपण आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. (मत्त ४:४) तसंच, आपल्या इच्छांवर नियंत्रण करता यावं म्हणून आपण यहोवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे. कारण आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे आणि आपल्या योग्य इच्छा कशा पूर्ण करायच्या हे त्यालाच माहीत आहे.—स्तो १४५:१६.

सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • “सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका” या व्हिडिओतल्या एका दृष्यात मशीनमधून रिगारेट पिणाऱ्‍या बाहुल्या बनून बाहेर येत आहेत.

    काही लोक सिगारेट का पितात?

  • “सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका” या व्हिडिओतल्या एका दृष्यात सिगारेट पिणाऱ्‍या व्यक्‍तीचं फुफ्फुस जोरजोरात खोकत आहे.

    सिगारेट ओढल्यामुळे कोणते वाईट परिणाम होऊ शकतात?

  • “सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका” या व्हिडिओतल्या एका दृष्यात एक भल्या मोठ्या आकाराचा व्यापारी मासे पकडण्याच्या गळाला वेपिंगचं उपकरण लावून एका तरूण मुलीला आमिष दाखवत आहे.

    सिगारेट ओढणं किंवा वेपिंग (ई-सिगारेटचा वापर करणं) चुकीचं का आहे?—२कर ७:१

  • “सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका” या व्हिडिओतल्या एका दृष्यात एक तरूणी घराच्या गच्चीवर निखळ प्रकाशात आकाशाकडे पाहत आहे.

    तुम्ही सिगारेट पिण्याच्या इच्छेवर नक्कीच मात करू शकता!

    सिगारेट पिण्याच्या दबावाचा तुम्ही सामना कसा करू शकता? आणि सिगारेट पिण्याची सवय तुम्ही कशी मोडू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा