जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
३-९ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते १५-१६
“विश्वासघात करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे”
विश्वासघात शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात!
४ सर्वात प्रथम आपण दुष्ट दलीलाचे उदाहरण पाहू या, जिच्या प्रेमात शास्ता शमशोन पडला होता. पलिष्ट्यांविरुद्धच्या युद्धात देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्याची शमशोनाची इच्छा होती. दलीला शमशोनावर खरोखर प्रेम करत नाही हे कदाचित पलिष्ट्यांच्या पाच सरदारांनी पाहिले असावे. त्यामुळे, शमशोनाच्या अफाट शक्तीचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी तिला मोठी लाच देऊ केली. लोभी दलीलाने त्यांच्याकडून लाच घेतली, पण शमशोनाच्या शक्तीचे रहस्य जाणून घेण्याचे तिचे प्रयत्न तीनदा फसले. त्यानंतर ती त्याच्यावर रोज दडपण आणू लागली व त्याच्याजवळ हट्ट करू लागली. शेवटी, तिच्या “रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला.” म्हणून त्याने तिला सांगितले की त्याचे केस कधीच कापण्यात आलेले नाहीत; केस कापल्यास त्याची शक्ती नाहिशी होईल. हे जाणून घेतल्यावर, दलीलाने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले व त्याचे केस कापवून घेतले आणि त्याला त्याच्या शत्रूंच्या हवाली केले. (शास्ते १६:४, ५, १५-२१) तिचे ते कृत्य किती निंदनीय होते! केवळ लोभापोटी तिने तिच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचा विश्वासघात केला.
शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे
१४:१६, १७; १६:१६. अश्रू गाळून व एखाद्याच्या मागे टुमणे लावून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतो.—नीतिसूत्रे १९:१३; २१:१९.
टेहळणी बुरूज१२ ४/१५ ११-१२ ¶१५-१६
विश्वासघात शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात!
१५ तर मग, विवाहसोबती एकमेकांना एकनिष्ठ कसे राहू शकतात? देवाचे वचन म्हणते: “तू आपल्या तरुणपणाच्या बायकोच्या [किंवा नवऱ्याच्या] ठायी हर्षित ऐस,” आणि “तुझी बायको [किंवा नवरा] जी तुला प्रिय आहे तिच्याबरोबर तू आनंदाने आपले आयुष्य घालीव.” (नीति. ५:१८; उप. ९:९, पं.र.भा.) जसजसे पती-पत्नीचे वय वाढत जाते तसतसा दोघांनीही आपला नातेसंबंध शारीरिक रीत्या व भावनिक रीत्या आणखी मजबूत करण्याचा प्रयास केला पाहिजे. याचा अर्थ, त्यांनी एकमेकांकडे लक्ष दिले पाहिजे, एकमेकांच्या सहवासात वेळ घालवला पाहिजे आणि एकमेकांच्या आणखी जवळ आले पाहिजे. त्यांनी आपला विवाह आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी विवाहित दांपत्यांनी एकत्र मिळून बायबलचा अभ्यास केला पाहिजे, नियमितपणे एकत्र मिळून सेवेत गेले पाहिजे आणि यहोवाच्या आशीर्वादांसाठी एकत्र मिळून प्रार्थना केली पाहिजे.
यहोवाला एकनिष्ठ राहा
१६ मंडळीतील काहींनी गंभीर पापे केली आहेत आणि त्यांनी “विश्वासात खंबीर व्हावे” म्हणून त्यांना “कडकपणे” ताडन देण्यात आले आहे. (तीत १:१३, १४) काही जणांच्या बाबतीत पाहिल्यास, त्यांच्या आचरणामुळे त्यांना मंडळीतून बहिष्कृत करावे लागले. अशा प्रकारच्या ताडनामुळे ज्यांना चांगले “वळण लागले” त्यांना आपले आध्यात्मिक आरोग्य परत मिळवण्यास मदत मिळाली आहे. (इब्री १२:११) आपल्या एखाद्या नातेवाइकाला किंवा जवळच्या मित्राला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले असेल, तर काय? अशा वेळी आपण त्या व्यक्तीला एकनिष्ठ राहू, की देवाला, याची परीक्षा होऊ शकते. बहिष्कृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत आपण संबंध ठेवू नये अशी आज्ञा यहोवाने दिली आहे. आपण या आज्ञेचे पालन करणार की नाही हे यहोवा पाहत असतो.—१ करिंथकर ५:११-१३ वाचा.
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज०५-HI ३/१५ २७ ¶६
शिमशोन ने यहोवा की शक्ति से जीत पायी!
शिमशोन का मकसद था, पलिश्तियों से लड़ना और उसने अपना ध्यान इस मकसद से बिलकुल भटकने नहीं दिया। परमेश्वर के दुश्मनों से लड़ने के मकसद से ही उसने अज्जा में एक वेश्या के घर में पनाह ली। शिमशोन के मन में नाजायज़ संबंध रखने का कोई इरादा नहीं था। उसे दुश्मनों के शहर में रात गुज़ारने के लिए एक जगह चाहिए थी और एक वेश्या के घर से महफूज़ जगह और क्या हो सकती थी? उसने आधी रात को उस घर से निकलकर नगर के फाटकों के साथ-साथ उसके दोनों पल्लों को उखाड़ दिया और उन्हें ढोकर हेब्रोन के पास पहाड़ की चोटी पर ले गया, जो करीब ६० किलोमीटर की दूरी पर था। शिमशोन यह कारनामा परमेश्वर की मंज़ूरी और उसकी दी हुई ताकत की बदौलत कर पाया।—न्यायियों १६:१-३.
१०-१६ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते १७-१९
“देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे अनेक समस्या येतात”
इन्साइट-२ ३९०-३९१
मीखा
१. मीखा एफ्राईम वंशातला होता. त्याने आपल्या आईचे १,१०० चांदीचे तुकडे चोरले आणि नंतर ते तिला परत केले. मग त्याच्या आईने त्यातले २०० तुकडे घेऊन सोनाराला दिले. आणि त्यांपासून “एक कोरीव मूर्ती आणि एक धातूची मूर्ती” बनवली. मग त्या मूर्ती मीखाने आपल्या घरात ठेवल्या. त्याच्या घरात एक देवघर होतं. त्याने एक एफोद आणि कुलदैवतांच्या मूर्ती बनवल्या आणि आपल्या एका मुलाला याजक म्हणून नेमलं. मीखा आणि त्याच्या कुटुंबाला वाटत होतं की हे सगळं करून ते यहोवाचा गौरव करत आहेत. पण खरंतर ते त्याचा अनादर करत होते. कारण त्यांनी, ‘मूर्तिपूजा करू नका’ ही यहोवाची आज्ञा मोडली होती. (निर्ग २०:४-६) तसंच, त्याने उपासना मंडप आणि याजकपदाबद्दल यहोवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचाही अनादर केला होता. (शास १७:१-६; अनु १२:१-१४) नंतर मीखाने योनाथान नावाच्या एका लेवी माणसाला आपला याजक म्हणून नेमलं. मीखाला वाटत होतं, की त्याने जे काही केलं ते यहोवाच्या दृष्टीने योग्य आहे. म्हणून त्याने म्हटलं: “यहोवा माझं भलं करेल अशी आता मला खातरी आहे.” (शास १७:७-१३; १८:४) पण त्याला असं वाटणं चुकीचं होतं. कारण नियमशास्त्राप्रमाणे याजक फक्त अहरोच्या वंशजातून नेमले जाऊ शकत होते. पण हा तरूण लेवी मोशेचा मुलगा गेर्षोन याचा वंशज होता, अहरोनचा नाही. म्हणून योनाथान याजक म्हणून सेवा करण्यासाठी योग्य नव्हता. मीखाने आधीच बऱ्याच चुका केल्या होत्या. आणि आता योनाथानला याजक नेमून त्याने आणखी एक मोठी चुक केली होती.—शास १८:३०; गण ३:१०.
इन्साइट-२ ३९१ ¶२
मीखा
काही वेळानंतर मीखा आणि त्याची माणसं दान वंशाच्या लोकांचा पाठलाग करू लागले. त्यांना गाठल्यावर दान वंशाचे लोक मीखाला म्हणाले, “काय झालं? तू इतक्या लोकांना घेऊन का आलास?” तेव्हा मीखा म्हणाला: “मी बनवलेल्या देवांच्या मूर्ती तुम्ही घेतल्या आणि माझ्या याजकालाही तुम्ही घेऊन चाललात. आता माझ्याकडे काय उरलंय?” त्यावर दान वंशाच्या लोकांनी मीखाला धमकावून म्हटलं, ‘तू जर या विषयावर परत बोललास आणि आमचा पाठलाग केलास तर आम्ही तुझा आणि तुझ्या लोकांचा जीव घेऊ.’ दान वंशाचे लोक आपल्यापेक्षा शक्तिशाली आहेत हे पाहून मीखा आपल्या घरी परत गेला.—शास १८:२२-२६
आध्यात्मिक रत्नं शोधा
देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर
६ देवाच्या नावाचा वापर करण्यासाठी आधार देणारे पुष्कळ पुरावे आज आपल्या काळात आहेत. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या २०१३ मधील सुधारित आवृत्तीत देवाचं नाव ७,२१६ वेळा वापरण्यात आलं आहे. मागच्या आवृत्तीच्या तुलनेत ही संख्या आणखी सहानं वाढली आहे. कारण अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या मृत समुद्राजवळील गुंडळ्यांमध्ये आणखी पाच ठिकाणी हे नाव असल्याचं दिसून आलं आहे. हे नाव १ शमुवेल २:२५; ६:३; १०:२६; २३:१४, १६ या वचनांत सापडतं. तसंच, बायबलच्या जुन्या भरवशालायक हस्तलिखितांच्या आणखी अभ्यासामुळे शास्ते १९:१८ या वचनातही देवाचं नाव वापरण्यात आलं आहे.
१७-२३ जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते २०-२१
“यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा”
आव्हानांचा सामना करताना तुम्ही फीनहासाचे अनुकरण करू शकता का?
गिब्यातल्या बन्यामीन वंशातील पुरुषांनी एका लेव्याच्या उपपत्नीवर बलात्कार करून तिचा खून केला, तेव्हा इतर वंशातील लोक बन्यामीन वंशजांविरुद्ध युद्ध लढण्यास जमा झाले. (शास्ते २०:१-११) लढाईला जाण्याआधी त्यांनी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली, पण दोनदा ते हरले आणि त्यात त्यांचे भारी नुकसान झाले. (शास्ते २०:१४-२५) यावरून, आपल्या प्रार्थना निरर्थक होत्या असा निष्कर्ष त्यांनी काढला का? जे घोर कृत्य करण्यात आले होते त्याच्याविरुद्ध त्यांनी पाऊल उचलावे अशी खरोखर यहोवाची इच्छा होती का?
आव्हानांचा सामना करताना तुम्ही फीनहासाचे अनुकरण करू शकता का?
यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? मंडळीतील समस्या हाताळण्यास वडील जन फार प्रयत्न करतात व देवाच्या मदतीसाठी प्रार्थनाही करतात. तरीसुद्धा काही समस्या तशाच राहतात. असे घडल्यास, वडिलांनी येशूचे पुढील शब्द लक्षात ठेवावेत: “मागा [किंवा प्रार्थना करत राहा] म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल.” (लूक ११:९) आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्यास वेळ लागत आहे असे वाटत असले, तरी यहोवा त्याच्या नियुक्त समयी आपल्या प्रार्थनेचे उत्तर देईल याची खातरी वडील बाळगू शकतात.
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज१४-E ५/१ ११ ¶४-६
तुम्हाला माहीत होतं का?
प्राचीन काळात युद्ध लढताना गोफणीचा वापर कसा केला जायचा?
दावीदने गल्याथला मारण्यासाठी गोफणीचा वापर केला. त्याने बरीच वर्षं आपल्या मेढरांना संभाळलं होतं. आणि त्याच काळात तो गोफणीचा वापर करायला शिकला असावा.—१ शमुवेल १७:४०-५०.
मध्यपूर्व भागात शोध करणाऱ्या विद्वानांना काही गोफणीचे दगड सापडले आहेत. हे दगड प्राचीन काळात युद्धात वापरले जायचे.
गोफण चालवणारा आपल्या डोक्यावर गोफण गरगर फिरवायचा आणि आपल्या हातातल्या दोन दोरींपैकी एक दोरी सोडायचा. यातून निघालेल्या दगडाचा वेग ताशी १६० ते २४० कि.मी. इतका असायचा आणि त्याचा नेम अचूक असायचा. गोफणीचे दगड बाणाइतके दूर जायचे की नाही याबद्दल विद्यावांना नक्की माहित नाही पण ते बाणाइतकेच जीवघेणे होते हे मात्र नक्की.—शास्ते २०:१६.
२४-३० जानेवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | रूथ १-२
“एकनिष्ठ प्रेम करा”
यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा
५ रूथचं कुटुंब मवाबात होतं. ती त्यांच्याकडे गेली असती तर त्यांनी कदाचित तिचा सांभाळ केला असता. तसंच, तिथले लोक, तिथली भाषा आणि तिथली संस्कृतीही तिला माहीत होती. बेथलेहेममध्ये यातली एकतरी गोष्टी रूथला मिळेल का, याची खात्री नामी तिला देऊ शकत नव्हती. शिवाय, तिथं गेल्यानंतर रूथला एक पती आणि एक चांगलं घर मिळेल का, याविषयीदेखील नामीच्या मनात भीती होती. त्यामुळे, नामीनं तिला परत मवाबात जाण्यास आर्जवलं. अर्पा “आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली.” (रूथ १:९-१५) पण, रूथनं मात्र अशा परिस्थितीतही आपल्या लोकांकडे आणि खोट्या देवी-देवतांकडे पुन्हा न जाण्याचा निर्णय घेतला.
यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा
६ रूथला कदाचित तिच्या पतीकडून किंवा नामीकडून यहोवाविषयी शिकायला मिळालं असेल. यहोवा मवाबातील देवतांसारखा नाही हे तिला समजलं होतं. तिचं यहोवावर प्रेम होतं आणि तो आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या भक्तीसाठी पात्र आहे हेदेखील तिला माहीत होतं. त्यामुळे, रूथनं एक अतिशय सुज्ञ निर्णय घेतला. ती नामीला म्हणाली: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) रूथच्या मनात नामीसाठी असलेल्या प्रेमाबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं अंतःकरण भरून येतं. पण, रूथचं यहोवाप्रती असलेलं प्रेम जास्त प्रभावित करणारं आहे. बवाजही यामुळे प्रभावित झाला. आणि यहोवाच्या पंखांखाली तिनं आश्रय घेतला म्हणून त्यानं नंतर तिची प्रशंसा केली. (रूथ २:१२ वाचा.) बवाजानं ज्या शब्दांचा वापर केला त्यावरून एका पक्षाच्या पंखांखाली आश्रय घेणाऱ्या पिल्लांचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. (स्तो. ३६:७; ९१:१-४) यहोवानंही अगदी अशाच प्रकारे रूथचं प्रेमळपणे संरक्षण केलं आणि तिच्या विश्वासाचं तिला प्रतिफळ दिलं. रूथला आपल्या निर्णयाबद्दल कधीच पस्तावा झाला नाही.
आध्यात्मिक रत्नं शोधा
रूथच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
१:१३, २१—यहोवाने नामीचे जीवन क्लेशदायक करून तिला दुःख दिले होते का? नाही आणि नामीनेसुद्धा देवावर कोणत्याही प्रकारचा दोष लावला नाही. पण तिच्याबाबतीत जे काही घडले होते त्यावरून तिच्या मनात असा विचार आला की यहोवा तिच्या विरुद्ध होता. ती नाराज झाली होती, तिचा भ्रमनिरास झाला होता. शिवाय, त्या काळी पोटचे फळ देवाकडून आशीर्वाद आणि वांझोटेपणा एक शाप समजला जात होता. नातवंडे नाहीत, दोन्ही पुत्र मरण पावल्यामुळे नामीला असा विचार करणे उचित वाटले असावे की यहोवाने तिला पीडिले आहे.
३१ जानेवारी-६ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | रूथ ३-४
“चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा”
“सद्गुणी स्त्री”
१८ बवाज रूथशी ज्या शांत आणि प्रेमळ स्वरात बोलला ते ऐकून तिला किती धीर आला असेल. तो म्हणाला: “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा [“एकनिष्ठ प्रेम,” NW] दाखवलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस.” (रूथ ३:१०) “पहिल्यापेक्षा” असं म्हणताना, रूथनं नामीसोबत इस्राएलला येण्याद्वारे आणि तिची काळजी घेण्याद्वारे जे एकनिष्ठ प्रेम दाखवलं होतं, त्याविषयी बवाज बोलत होता. तर, “दुसऱ्या खेपेस” असं म्हणताना, रूथ एखाद्या तरुणासोबत लग्न करण्याचा विचार करण्याऐवजी, त्याच्यासारख्या वयस्क माणसाशी लग्न करायला तयार झाली, याविषयी तो बोलत होता. तिच्यासारख्या तरुण स्त्रीला बवाजापेक्षा पुष्कळ कमी वयाच्या एखाद्या तरुणाशी लग्न करणं शक्य होतं; मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. पण, रूथला फक्त नामीच्याच नाही, तर तिचा मृत पती अलीमलेख याच्याही हिताची काळजी होती. त्याच्या मायदेशात त्याचं नाव पुढं चालावं अशी तिची इच्छा होती. रूथच्या निःस्वार्थ वृत्तीमुळं बवाजाचं प्रभावित होणं स्वाभाविकच होतं.
“सद्गुणी स्त्री”
२१ रूथ एक “सद्गुणी स्त्री” असल्याचं गावच्या सर्व लोकांना माहीत आहे, असं बवाजानं म्हटलं होतं. बवाजाचे हे शब्द आठवून रूथला किती समाधान वाटलं असेल! यहोवा देवाची ओळख करून घेण्यास व त्याची सेवा करण्यास उत्सुक असल्यामुळेच तिनं हे चांगलं नाव कमवलं होतं यात शंका नाही. तसंच, नामी आणि तिच्या लोकांशी रूथनं खूप प्रेमळपणे व समजूतदारपणे व्यवहार केला होता; अनोळखी प्रथा व पद्धतींशी जुळवून घेण्याची तिची तयारी होती. रूथच्या विश्वासाचं अनुकरण केल्यास, आपणही नेहमी इतरांचा मनापासून आदर करू. तसंच, त्यांच्या रीतिरिवाजांचाही आपण आदर करू; अर्थात, बायबलमधील तत्त्वांशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता.
“सद्गुणी स्त्री”
२५ बवाज रूथशी लग्न करतो. त्यानंतर बायबल सांगतं, की “परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.” नातू झाल्याबद्दल बेथलेहमच्या स्त्रिया नामीचं अभिनंदन करतात. तसंच, रूथ नामीला सात पुत्रांहून अधिक आहे असं म्हणून त्या रूथची प्रशंसा करतात. पुढं, रूथच्या याच मुलाच्या वंशात इस्राएलचा थोर राजा दावीद याचा जन्म होतो. (रूथ ४:११-२२) आणि दाविदाच्या वंशात पुढं येशू ख्रिस्ताचा जन्म होतो.—मत्त. १:१.
आध्यात्मिक रत्नं शोधा
रूथच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
४:६—वतन सोडवण्याद्वारे वतन सोडवणारा आपल्या वतनाचा “बिघाड” कसा करू शकत होता? दारिद्र्य आलेल्या मनुष्याने वतनादाखल मिळालेली जमीन विकली तर, वतन सोडवणाऱ्या व्यक्तीला, पुढील योबेल येईपर्यंत किती वर्षे उरली आहेत या आधारावर ठरवलेली किंमत देऊन ती जमीन विकत घ्यावी लागायची. (लेवीय २५:२५-२७) असे केल्याने त्याच्या जमिनीचे भाव कमी होतील. शिवाय, रूथला मुलगा झाला तर, वतन सोडवणाऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाला नव्हे तर रूथच्या मुलाला ती विकत घेतलेली जमीन वतनादाखल मिळेल.
७-१३ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल १-२
“प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा”
तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं
१२ खरोखर, प्रार्थनेच्या बाबतीत हन्नानं देवाच्या सर्व सेवकांसाठी खूप चांगलं उदाहरण मांडलं. यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्याशी कोणताही आडपडदा न ठेवता, अगदी मोकळेपणानं बोलावं. ज्याप्रमाणे एखादं लहानसं मूल पूर्ण भरवशानं आपल्या आईवडिलांशी बोलतं, त्याचप्रमाणे आपणही यहोवाजवळ आपल्या सगळ्या चिंता व्यक्त कराव्यात, अशी त्याची इच्छा आहे. (स्तोत्र ६२:८; १ थेस्सलनीकाकर ५:१७ वाचा.) प्रार्थनेच्या संदर्भात प्रेषित पेत्रानं देवाच्या प्रेरणेनं पुढील शब्द लिहिले: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.
तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं
१५ हन्नानं यहोवाजवळ आपलं मन मोकळं केल्यामुळे आणि निवासमंडपात येऊन त्याची उपासना केल्यामुळे तिच्यावर कोणता चांगला परिणाम झाला? अहवालात असं सांगितलं आहे: “मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले, व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमु. १:१८) हन्नाचं मन हलकं झालं होतं. जणू आपल्या मनावरचं दुःखाचं मोठं ओझं तिनं स्वर्गातील आपल्या प्रेमळ पित्यावर टाकून दिलं होतं; आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं सामर्थवान असलेला यहोवा देवच आपली मदत करू शकतो, हा भरवसा तिला होता. (स्तोत्र ५५:२२ वाचा.) खरोखर, यहोवासाठी कोणतीही समस्या फार मोठी आहे का? नाही, तेव्हाही नव्हती, आताही नाही, आणि पुढं कधीही नसेल!
आध्यात्मिक रत्नं शोधा
पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे
२:१०—यहोवा आपल्या “राजास बल देईल” अशी हन्नाने प्रार्थना का केली, कारण तेव्हा तर इस्राएल राष्ट्रात कोणीही मानवी राजा नव्हता? इस्राएलांवर मानवी राजा राज्य करील हे मोशेच्या नियमशास्त्रात भाकीत करण्यात आले होते. (अनुवाद १७:१४-१८) याकोबाने मरणासन्न अवस्थेत केलेल्या भविष्यवाणीत असे म्हटले: “यहूदाकडचे राजवेत्र [राज्याधिकाराचे प्रतीक] . . . त्याजकडून जाणार नाही.” (उत्पत्ति ४९:१०) शिवाय इस्राएलांची पूर्वज सारा हिच्याविषयी यहोवाने असे म्हटले: “तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” (उत्पत्ति १७:१६) तेव्हा, हन्ना ही एका भावी राजाविषयी प्रार्थना करत होती.
१४-२० फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल ३-५
“यहोवा इतरांचा विचार करतो”
सर्वशक्तिमान तरी इतरांचा विचार करणारा
३ शमुवेल अगदी लहानपणापासून निवासमंडपात सेवा करू लागला होता. (१ शमु. ३:१) एका रात्री जेव्हा तो झोपायला गेला तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडली. (१ शमुवेल ३:२-१० वाचा.) त्याला कोणीतरी हाक मारल्याचं जाणवलं. त्याला वाटलं की वयस्क महायाजक एली त्याला बोलवत आहे. त्यामुळे तो उठला आणि पळत एलीकडे जाऊन म्हणाला: “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली.” पण एली त्याला म्हणाला: “मी हाक मारली नाही.” नंतर दोनदा परत असंच घडलं. मग एलीला कळलं की देव शमुवेलला हाक मारत आहे. म्हणून परत हाक ऐकू आली तर पुढे काय बोलायचं याबद्दल एली शमुवेलला सांगतो आणि शमुवेल तसंच करतो. पण यहोवाने शमुवेलला सुरुवातीलाच का नाही सांगितलं की तोच त्याला हाक मारत आहे? बायबल याचं उत्तर देत नाही. पण असं असू शकतं की यहोवाला शमुवेलच्या भावनांची कदर होती म्हणून त्याने तसं केलं.
सर्वशक्तिमान तरी इतरांचा विचार करणारा
४ १ शमुवेल ३:११-१८ वाचा. मुलांनी मोठ्यांचा खासकरून अधिकारपदावर असलेल्यांचा आदर करावा अशी आज्ञा नियमशास्त्रात होती. (निर्ग. २२:२८; लेवी. १९:३२) त्यामुळे शमुवेलसारख्या लहान मुलाने एलीकडे जाऊन न घाबरता देवाकडून आलेला न्यायाचा संदेश सांगणं ही गोष्ट आपल्याला अशक्य वाटते. बायबलमध्ये सांगितलं आहे की हा दृष्टान्त एलीला सांगायला शमुवेलला भीती वाटत होती. पण देवाने एलीला स्पष्टपणे दाखवून दिलं की तो शमुवेलला बोलवत होता. यामुळे एलीने शमुवेलला सांगितलं, की देवाने सांगितलेली एकूण एक गोष्ट त्याने त्याला सांगावी. यावर शमुवेलने एलीची आज्ञा पाळली आणि त्याला “सर्व काही सांगितले.”
आध्यात्मिक रत्नं शोधा
पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे
३:३—शमुवेल अतिपवित्र स्थानात झोपला होता का? नाही. शमुवेल हा याजक नसलेल्या कहाथी वंशाचा होता. (१ इतिहास ६:३३-३८) त्याअर्थी, त्याला ‘पवित्र वस्तू पाहण्यासाठी क्षणभरहि आत जाण्याची’ परवानगी नव्हती. (गणना ४:१७-२०) शमुवेल केवळ मंदिरातील निवासमंडपाच्या अंगणातच जाऊ शकत होता. तेथेच तो झोपला असावा. एलीसुद्धा अंगणातच कोठेतरी झोपत असावा. “जेथे देवाचा कोश होता तेथे” ही संज्ञा निवासमंडपाच्या परिसराच्या संदर्भात वापरली आहे.
२१-२७ फेब्रुवारी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल ६-८
“तुमचा राजा कोण आहे?”
इन्साइट-२ १६३ ¶१
देवाचं राज्य
मानवी राजाची मागणी. इस्राएली लोकांना इतर राष्ट्रांप्रमाणेच एक मानवी राजा हवा होता. असं करून त्यांनी खरंतर यहोवाला त्यांचा राजा म्हणून नाकारलं होतं. (१शमु ८:४-८) पण यहोवाने त्यांना एका राज्याचं अभिवचन दिलं नव्हतं का? हो, अब्राहम आणि याकोबला त्याने हे अभिवचन दिले होतं. पुढे याकोबने आपल्या मृत्यूच्यावेळी यहूदाबद्दल भविष्यवाणी करतानाही या राज्याचा उल्लेख केला. (उत्प ४९:८-१०). मग, इस्राएली लोकांना इजिप्त देशातून सोडवल्यावर आणि त्यांना नियमशास्त्र दिल्यावर यहोवाने या राज्याबद्दल सांगितलं. (निर्ग १९:३-६; अनु १७:१४, १५) शिवाय, देवाने बलाम संदेष्ट्याद्वारेही या राज्याबद्दल भाकीत केलं. (गण २४:२-७, १७) हन्नाने आपल्या प्रार्थनेत हे राज्य नक्की येईल अशी आशा व्यक्त केली. (१शमु २:७-१०) पण हे राज्य एक “पवित्र रहस्य” होतं. या राज्याबद्दल यहोवाने अभिवचन तर दिलं होतं, पण त्याबद्दल सविस्तर माहिती दिली नव्हती. जसं की हे राज्य कधी येईल, ते कसं चालवलं जाईल, कोण चालवेल आणि ते स्वर्गातून चालवलं जाईल की पृथ्वीवरून, याबद्दल त्याने काहीच सांगितलं नव्हतं. या गोष्टीवरून हे स्पष्ट होतं, की एका मानवी राजाची मागणी करून इस्राएली लोकांनी एक मोठी चुक केली होती; अशी मागणी करायचा त्यांना कोणताही अधिकार नव्हता.
निराशादायक परिस्थितीतही तो टिकून राहिला
शमुवेलाने जेव्हा याबाबतीत यहोवाला प्रार्थना केली तेव्हा यहोवाने त्याला काय म्हटले ते पाहा. तो त्याला म्हणाला: “लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहेत.” शमुवेलाला हे ऐकून थोडेसे सांत्वन मिळाले असेल पण ते लोक सर्वसमर्थ देवाचा किती घोर अपमान करत होते! मानवी राजा निवडून लोकांना खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे, याबद्दलचा इशारा लोकांना देण्यास यहोवाने शमुवेलाला सांगितले. शमुवेलाने जेव्हा यहोवाचा संदेश लोकांना कळवला तेव्हा ते म्हणत राहिले: “नाही, नाही, आमच्यावर राजा पाहिजेच.” शमुवेलाने देवाचे म्हणणे ऐकून त्यांच्यावर देवानेच निवडलेल्या राजाचा अभिषेक केला.—१ शमुवेल ८:७-१९.
यहोवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम!
९ यहोवाने दिलेली ताकीद किती खरी होती हे इतिहासावरून दिसून येते. मानवी राजांच्या, विशेषकरून, देवाला विश्वासू न राहिलेल्या राजांच्या शासनामुळे इस्राएल लोकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले. इस्राएल राष्ट्राचे उदाहरण लक्षात घेतल्यास, यहोवाला न ओळखणारे शासक आजपर्यंत खरी शांती व सुरक्षितता आणण्यात अयशस्वी ठरले आहेत याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. हे खरे आहे की काही राजकारणी आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद द्यावा म्हणून देवाला प्रार्थना करतात. पण, जे स्वतः देवाच्या शासनाच्या अधीन होत नाहीत त्यांना देव कसे आशीर्वादित करेल?—स्तो. २:१०-१२.
आध्यात्मिक रत्नं शोधा
बाप्तिस्मा का घ्यावा?
१३ परिवर्तन हे यहोवाचा साक्षीदार म्हणून आपला बाप्तिस्मा होण्याआधी घडले पाहिजे. परिवर्तन हे ख्रिस्त येशूचे अनुसरण करण्याचा मनःपूर्वक निर्णय घेतलेल्या व्यक्तीने स्वेच्छेने करायचे कृत्य आहे. ही व्यक्ती आपल्या पूर्वीच्या वर्तनाचा धिक्कार करून देवाच्या नजरेत जे योग्य ते करण्याचा निर्धार करते. बायबलमध्ये, परिवर्तनाशी संबंधित असलेल्या इब्री आणि ग्रीक क्रियापदांचा अर्थ मागे फिरणे किंवा वळणे असा होतो. हे एका चुकीच्या मार्गावरून फिरून देवाकडे वळण्याला सूचित करते. (१ राजे ८:३३, ३४) परिवर्तनाकरता “पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये” करणे आवश्यक आहे. (प्रेषितांची कृत्ये २६:२०) त्याकरता आपण खोटी उपासना सोडून दिली पाहिजे, देवाच्या आज्ञांच्या अनुसार वागले पाहिजे आणि केवळ यहोवाची अनन्य उपासना केली पाहिजे. (अनुवाद ३०:२, ८-१०; १ शमुवेल ७:३) परिवर्तनामुळे आपल्या विचारसरणीत, ध्येयांत आणि स्वभावात बदल घडून येतो. (यहेज्केल १८:३१) अधार्मिक गुणांऐवजी आपण नवे मनुष्यपण धारण करतो व या अर्थाने आपण ‘वळतो.’—प्रेषितांची कृत्ये ३:१९; इफिसकर ४:२०-२४; कलस्सैकर ३:५-१४.
२८ फेब्रुवारी-६ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | १ शमुवेल ९-११
“शौल सुरुवातीला नम्र होता”
नम्र राहा आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा
११ शौल राजाच्या बाबतीत काय घडलं त्याचा विचार करा. सुरुवातीला तो खूप नम्र होता. त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. आणि त्यामुळे जेव्हा त्याला एक मोठी जबाबदारी दिली जात होती, तेव्हा ती घ्यायला तो कचरला. (१ शमु. ९:२१; १०:२०-२२) पण राजा बनल्यानंतर मात्र तो गर्विष्ठ बनला. आणि त्याने अशा काही गोष्टी केल्या ज्या करण्याचा त्याला अधिकार नव्हता. एकदा शमुवेल संदेष्ट्याची वाट पाहत असताना शौल खूप अधीर झाला. नम्रपणे यहोवावर विसंबून राहण्याऐवजी त्याने स्वतःच होमार्पण दिलं. खरंतर, असं करण्याचा त्याला अधिकार नव्हता. आणि त्यामुळे शौल यहोवाच्या नजरेतून पडला. आणि शेवटी त्याने आपलं राजपदही गमावलं. (१ शमु. १३:८-१४) शौलच्या उदाहरणातून आपण हा धडा शिकतो, की ज्या गोष्टी करण्याचा आपल्याजवळ अधिकार नाही, त्या आपण करू नये.
स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?
८ स्वार्थीपणा कशा प्रकारे स्वार्थत्यागाच्या मनोवृत्तीला सुरुंग लावू शकतो हे इस्राएलचा राजा शौल याच्या उदाहरणावरून दिसून येते. शौलाने त्याचे राज्य सुरू केले तेव्हा त्याची मनोवृत्ती नम्र आणि विनयशील होती. (१ शमु. ९:२१) उदाहरणार्थ, एकदा काही इस्राएली लोक शौल राजाच्या विरोधात बोलू लागले. खरेतर शौलाला स्वतः देवाने राजा म्हणून निवडले असल्यामुळे, त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्या या लोकांना तो चांगली अद्दल घडवू शकला असता. पण त्याने तसे केले नाही. (१ शमु. १०:२७) आणखी एका उदाहरणाचा विचार करा. अम्मोन्यांविरुद्ध लढाईला जाताना शौल राजाने देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले आणि यामुळे इस्राएलला लढाईत विजय मिळाला. लढाईनंतर शौलाने नम्रपणे यहोवाला या विजयाचे श्रेय दिले.—१ शमु. ११:६, ११-१३.
अम्मोनी दयेची शत्रुत्वाने परतफेड करणारे लोक
पुन्हा एकवार अम्मोन्यांनी यहोवाच्या दयेची परतफेड शत्रुत्वाने केली होती. यहोवाने या दुष्ट धमकीकडे दुर्लक्ष केले नाही. “शौलाने हे वर्तमान [नाहाशचे शब्द] ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर जोराने येऊन तो मनस्वी संतप्त झाला.” देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, शौलाने ३,३०,००० लढाऊ पुरुषांना एकत्र केले ज्यांनी अम्मोन्यांना असा पळ काढावयाला लावला की “त्यांच्यातले दोनसुद्धा एकत्र राहिले नाहीत.”—१ शमुवेल ११:६, ११.
आध्यात्मिक रत्नं शोधा
पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे
९:९—“हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्यास पूर्वी द्रष्टा म्हणत” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? शमुवेलाच्या काळात आणि इस्राएलात राजे राज्य करू लागले त्या काळादरम्यान संदेष्ट्यांना महत्त्वाचे स्थान लाभले आणि त्यामुळे “द्रष्टा” या शब्दाऐवजी “संदेष्टा” हा शब्द जास्त प्रचलित झाला, हे या वाक्यांशावरून सूचित होत असावे. संदेष्ट्यांच्या मालिकेत शमुवेल पहिला मानला जातो.—प्रेषितांची कृत्ये ३:२४.