वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr21 नोव्हेंबर पृ. १-११
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
  • उपशिर्षक
  • १-७ नोव्हेंबर
  • ८-१४ नोव्हेंबर
  • १५-२१ नोव्हेंबर
  • २२-२८ नोव्हेंबर
  • २९ नोव्हेंबर–५ डिसेंबर
  • ६-१२ डिसेंबर
  • ईश्‍वरी तत्त्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो
  • १३-१९ डिसेंबर
  • २०-२६ डिसेंबर
  • २७ डिसेंबर-२ जानेवारी
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
mwbr21 नोव्हेंबर पृ. १-११

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

१-७ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा १८-१९

“देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी”

इन्साइट-१ ३५९ ¶१

हद्द

इस्राएली वंशांमध्ये जमीन वाटून देताना दोन गोष्टी केल्या जायच्या. चिठ्ठ्या टाकल्या जायच्या आणि प्रत्येक वंशातल्या लोकांची संख्या किती आहे, हे पाहून जमिनीचे वाटे दिले जायचे. प्रत्येक वंशाला जमिनीचा वाटा अंदाजे कोणत्या भागात मिळेल, म्हणजे उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला की पश्‍चिमेला, समुद्रकिनाऱ्‍याला की डोंगराळ भागात, हे चिठ्ठ्या टाकून ठरवलं जायचं. चिठ्ठ्या टाकून जो काही निर्णय घेतला जायचा तो यहोवाचा आहे असं सगळ्यांनी मानावं आणि एकमेकांचा द्वेष करू नये किंवा भांडू नये म्हणून चिठ्ठ्या टाकल्या जायच्या. (नीत १६:३३) चिठ्ठ्यांमधून आपला निर्णय कळवून यहोवाने या गोष्टीची काळजी घेतली की प्रत्येकाला याकोबने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे जमिनीचा नेमलेला भाग मिळेल. ही भविष्यवाणी याकोबने आपल्या मरणाआधी केली होती आणि ती आपल्याला उत्पत्ती ४९:१-३३ मध्ये वाचायला मिळते.

इन्साइट-१ १२०० ¶१

वारसा

उत्पत्ती ४९:५, ७ या वचनांमध्ये दिलेल्या भविष्यवाणीप्रमाणे शिमोन आणि लेवी वंशाला, इतर वंशाप्रमाणे वारसा म्हणून वेगळा असा जमिनीचा वाटा देण्यात आला नव्हता. तर यहूदा वंशाला दिलेल्या वाट्यातून शिमोन वंशाला जमिनीचा वाटा देण्यात आला होता. (यहो १९:१-९) सगळ्या वंशांना मिळालेल्या वाट्यातून लेवी वंशाला ४८ शहरं देण्यात आली होती.

इन्साइट-१ ३५९ ¶२

हद्द

प्रत्येक वंशाला कुठे जमीन दिली जाईल हे चिठ्ठ्या टाकून ठरवल्यानंतर, वंश किती मोठा आहे हे पाहून जमिनीचा वाटा देण्यात आला. यहोवाने त्यांना म्हटलं: “तुम्ही चिठ्ठ्या टाकून वारशाची जमीन तुमच्या घराण्यांमध्ये वाटून घ्या. मोठ्या घराण्यांसाठी मोठा वाटा आणि लहान घराण्यांसाठी लहान वाटा, वारसा म्हणून दिला जावा. जी चिठ्ठी निघेल त्याप्रमाणे प्रत्येकाला वारसा मिळेल.” (गण ३३:५४) अशा प्रकारे जमीन कोणत्या ठिकाणी मिळेल हे ठरवण्यात आलं आणि त्यात बदल केला जाऊ शकत नव्हता. पण वारशाने मिळणाऱ्‍या या जमिनीचा हिस्सा मात्र वंशातल्या लोकांच्या संख्येनुसार कमी-जास्त केला जाऊ शकत होता. त्यामुळे यहूदा वंशाला मिळालेल्या जमिनीचा वाटा खूपच मोठा आहे हे लक्षात आल्यावर त्याचा काही भाग शिमोनच्या वंशाला देण्यात आला.—यहो १९:९.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ३५९ ¶५

हद्द

यार्देनच्या पश्‍चिमेकडे असलेला भाग ताब्यात घ्यायला इस्राएली लोक टाळाटाळ का करत होते? बायबल विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे यामागे बरीच कारणं असू शकतात. एक कारण हे असावं, की इस्त्राएली लोकांनी आधी काबीज केलेल्या शहरांमधून बराच लुटीचा माल आणला होता आणि उरलेल्या कनानी लोकांपासून त्यांना काही धोका उरला नव्हता. म्हणून कदाचित ते टाळाटाळ करत असावेत. किंवा दुसरं कारण हे असावं, की त्यांचे उरलेले शत्रू त्यांच्यापेक्षा शक्‍तिशाली आणि संख्येने जास्त होते म्हणून त्यांना हरवणं अवघड आहे असं इस्त्राएली लोकांना वाटलं असावं. (यहो १३:१-७) तसंच, पश्‍चिमेकडेच्या या क्षेत्रांबद्दल त्यांना जास्त काही माहीत नसावं म्हणूनही ते टाळाटाळ करत असावेत.

८-१४ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा २०-२२

“गैरसमज बाळगल्यामुळे घडलेल्या घटनेतून मिळणारे धडे”

टेहळणी बुरूज१८.०८ ५ ¶१०

तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?

१० यहोशवाच्या दिवसांत यार्देन नदीच्या पश्‍चिमेला राहणाऱ्‍या इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्यातून आपण धडा घेऊ शकतो. (यहो. २२:९-३४) या लोकांना बातमी मिळाली की यार्देनच्या पूर्वेकडे राहणाऱ्‍या इस्राएली लोकांनी नदीजवळ एक मोठी वेदी बांधली आहे. पूर्वेकडे रऊबेन, गाद व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातले लोक राहायचे. त्यांनी वेदी बांधली ही बातमी खरी होती. आणि ती ऐकून नदीच्या पश्‍चिमेला राहणाऱ्‍या इस्राएली लोकांना वाटलं की पूर्वेकडे राहणाऱ्‍या त्यांच्या बांधवांनी यहोवाविरुद्ध बंड केला आहे. यामुळे ते त्यांच्याविरुद्ध युद्ध करायला एकत्र आले. (यहोशवा २२:९-१२ वाचा.) पण युद्ध करण्याआधी सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी काही माणसांना पूर्वेकडे राहणाऱ्‍या इस्राएली लोकांकडे पाठवलं. तिथे गेल्यावर या लोकांना काय माहिती मिळाली? पूर्वेकडच्या इस्राएली लोकांनी ही वेदी खोट्या देवतांना बलिदानं देण्यासाठी बनवली नव्हती. तर इतर राष्ट्रांतील लोकांना कळून यावं की इस्राएली लोक फक्‍त यहोवाचीच उपासना करतात यासाठी त्यांनी ही वेदी बांधली होती. पश्‍चिमेकडच्या इस्राएली लोकांना हे ऐकून किती बरं वाटलं असेल! तसंच, त्यांना आनंद झाला असेल की त्यांनी आपल्या बांधवांसोबत युद्ध करण्याआधी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी वेळ दिला.

टेहळणी बुरूज०८ ११/१५ १८ ¶५

‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागा’

काही इस्राएल लोकांना वाटले असावे की वेदी बांधणाऱ्‍या गोत्रांवर चढाई करण्यासाठी पुरेसे कारण आहे. शिवाय, त्यांच्यावर अचानक आक्रमण केल्यास लढाईत आपली जास्त माणसे मारली जाणार नाहीत असाही तर्क त्यांनी केला असावा. तरीसुद्धा, उतावीळपणे हल्ला करण्याऐवजी, यार्देनेच्या पश्‍चिमेकडे असलेल्या या गोत्रांनी आपल्या बांधवांशी बोलणी करण्यास आधी आपले दूत पाठवले. या दूतांनी त्यांना विचारले: ‘तुम्ही इस्राएलाच्या देवाचा हा काय विश्‍वासघात केला? आज परमेश्‍वराला अनुसरण्याचे सोडले व त्याच्याविरुद्ध बंड पुकारले?’ खरे पाहता, वेदी बांधलेल्या गोत्रांनी देवाचा विश्‍वासघात केला नव्हता. पण, अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी आरोप करणाऱ्‍यांना भलेबुरे सुनावले का किंवा त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला का? नाही. याउलट, त्यांनी सौम्यतेने उत्तर दिले. आपण जे काही केले ते खरे तर यहोवाची सेवा करण्याच्या इच्छेनेच प्रेरित होऊन केले असा खुलासा त्यांनी केला. त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे ते यहोवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवू शकले व अशा रीतीने मोठा रक्‍तपात टळला. शांतपणे चर्चा केल्याने समस्या मिटवता आली आणि शांती प्रस्थापित झाली.—यहो. २२:१३-३४.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ४०२ ¶३

कनान

इस्त्राएली लोकांच्या जवळपास राहणारे कनानी लोक त्यांना घाबरायचे. जोपर्यंत इस्त्राएली लोक यहोवाच्या आज्ञेत राहणार होते तोपर्यंत त्यांना कनानी लोकांपासून काहीच धोका नव्हता, कारण यहोवा त्यांचं रक्षण करणार होता. यहोवाने त्यांना आधीच सांगितलं होतं, की “मी त्यांना हळूहळू तुमच्यापुढून घालवून देईन”. इस्त्राएली लोकांनी कनान देश ताब्यात घेतला तेव्हा त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना संपूर्ण देशाची गरज नव्हती. त्यांनी जर सर्व कनानी लोकांना घालवून दिलं असतं तर देशातला काही भाग ओसाड पडला असता आणि तिथे रानातल्या हिंस्र पशूंची संख्या वाढली असती.—निर्ग २३:२९, ३०; अनु ७:२२.

१५-२१ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | यहोशवा २३-२४

“यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला”

इन्साइट-१ ७५

संबंध

सर्वशक्‍तिमान यहोवा देवाने इस्त्राएली लोकांना कनान देश ताब्यात घ्यायचा अधिकार दिला होता. ते त्या देशात विदेशी म्हणून राहणार नव्हते. त्यामुळे त्यांनी कनानी लोकांसोबत कोणताही करार करायची गरज नव्हती. कनानी लोक मुर्तीपूजक असल्यामुळे त्यांच्यासोबत कोणताही करार करू नका, अशी स्पष्ट आज्ञा यहोवाने त्यांना दिली होती. (निर्ग २३:३१-३३; ३४:११-१६) त्यांच्याशी लग्नसंबंध जोडू नका हेही यहोवाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. कारण त्यांच्यासोबत लग्न केल्यामुळे इस्त्राएली लोकांकडूनही पाप घडलं असतं. आपल्या बायकोच्या किंवा नातेवाईकांच्या नादाने तेही खोटे धार्मिक रिती-रिवाज पाळू लागले असते. त्यांनी जर असं केलं असतं, तर यहोवाने त्यांचं रक्षण केलं नसतं आणि त्यांना आशीर्वाद मिळाले नसते.—अनु ७:२-४; निर्ग ३४:१६; यहो २३:१२, १३.

टेहळणी बुरूज०७ ११/१ २७ ¶१९-२०

यहोवाचे वचन कधीही टळत नाही

१९ नक्कीच, आपण जे प्रत्यक्ष पाहिले आहे त्याच्या आधारावर आपण असे म्हणू शकतो की “आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहोशवा २३:१४) यहोवा आपल्या लोकांची सुटका करतो, त्यांचे संरक्षण करतो व त्यांचा संभाळ करतो. तुम्ही देवाच्या कोणत्याही अशा प्रतिज्ञेचा उल्लेख करू शकता का की जी त्याच्या नियुक्‍त वेळी पूर्ण झाली नाही? कोणीही करू शकत नाही. म्हणूनच देवाच्या विश्‍वासार्ह वचनावर भरवसा ठेवण्यात सुज्ञपणा आहे.

२० भविष्याविषयी काय? यहोवाने आपल्याला सांगितले आहे की आपल्यापैकी बहुतेकजण पृथ्वीवर एका सुंदर नंदनवनात राहण्याची आशा बाळगू शकतात. आपल्यापैकी काही जणांना ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा आहे. आपली आशा कोणतीही असो, पण आपण सर्वांनी यहोशवासारखे शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले पाहिजे. तो दिवस अवश्‍य येईल जेव्हा आपली आशा वास्तवात उतरेल. मग आपणही यहोवाच्या सर्व प्रतिज्ञांकडे मागे वळून पाहताना असे म्हणू: “त्या सर्व सिद्धीस गेल्या.”

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०४ १२/१ १२ ¶१

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

२४:२—अब्राहामाचा पिता तेरह मूर्तीपूजक होता का? सुरवातीला तेरह यहोवा देवाचा उपासक नव्हता. तो कदाचित ऊर देशात सर्वत्र ज्याची उपासना केली जायची त्या सीन नावाच्या चंद्र दैवताचा भक्‍त होता. यहुदी परंपरेनुसार तेरह कदाचित एक मूर्तीकार असावा. परंतु, देवाच्या आज्ञेवरून जेव्हा अब्राहामाने ऊर सोडले तेव्हा तेरहही त्याच्याबरोबर हारानास गेला.—उत्पत्ति ११:३१.

२२-२८ नोव्हेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते १-३

“एहूदने दाखवलेल्या चातुर्याची आणि धैर्याची गोष्ट”

टेहळणी बुरूज०४ ३/१५ ३१ ¶३

एहूद जुलूम करणाऱ्‍याचे जू मोडतो

एहूदच्या योजना सफल ठरल्या त्या त्याच्या हुशारपणामुळे किंवा शत्रूच्या अक्षमतेमुळे नव्हे. देवाच्या उद्देशांची पूर्ती मानवी कारणांवर निर्भर नाही. एहूदला सफलता प्राप्त होण्याचे प्रमुख कारण हे होते, की त्याने, देवाच्या लोकांना मुक्‍त करण्याकरता त्याच्या इच्छेच्या एकवाक्यतेत कार्य केले. देवाने एहूदला उभे केले होते आणि “जेव्हा जेव्हा परमेश्‍वर [आपल्या लोकांसाठी] शास्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्‍वर असे.”—शास्ते २:१८; ३:१५.

टेहळणी बुरूज०४ ३/१५ ३० ¶१-३

एहूद जुलूम करणाऱ्‍याचे जू मोडतो

एहूदला पहिल्यांदा आपल्यासाठी एक “तरवार” बनवावी लागणार होती; एक अशी तलवार जी लहान आकाराची व दुधारी होती आणि कपड्यांच्या आत लपवता येऊ शकत होती. आपली कदाचित झडती घेतली जाईल अशी त्याने अपेक्षा केली असावी. तलवारी सहसा शरीराच्या डाव्या बाजूला लटकवल्या जात ज्यामुळे उजव्या हाताचा उपयोग करणाऱ्‍यांना ती उपसायला सोपी जात. एहूद डावरा असल्यामुळे त्याने आपली तलवार राजाचे सेवक तपासणार नाहीत अशा ठिकाणी म्हणजे “आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली.” त्यामुळे कसल्याही अडखळणाविना त्याने “मवाबाचा राजा एग्लोन ह्‍याच्यापुढे नजराणा सादर केला.”—शास्ते ३:१६, १७.

एग्लोनच्या राजमहालात सुरवातीपासून काय काय घडले याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले नाही. बायबल फक्‍त इतकेच सांगते, की “नजराणा दिल्यानंतर त्याने नजराणा घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली.” (शास्ते ३:१८) एहूदने नजराणा दिला आणि नजराणा घेऊन आलेल्या लोकांबरोबर तो एग्लोनच्या घरापासून सुरक्षित अंतरापर्यंत चालत गेला आणि त्यांची रवानगी केल्यावर पुन्हा आला. तो पुन्हा का आला? ते लोक त्याला सुरक्षा देण्यासाठी आले होते, केवळ शिष्टाचार म्हणून ते त्याच्यासोबत आले होते, की फक्‍त नजराणा वागवण्यासाठी म्हणून आले होते? आणि आपला डाव साधण्याआधी तो त्यांना सुरक्षितपणे पाठवू इच्छित होता का? यांपैकी काहीही कारण असो, एहूद मात्र धाडसीपणे पुन्हा राजमहालात एकटाच आला.

“गिलगालाजवळील पाषाणमूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, ‘महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे.’” राजा एग्लोनसमोर तो पुन्हा कसा काय येऊ शकला याविषयी शास्त्रवचनांत काही सांगितलेले नाही. रक्षकांना संशय कसा आला नाही? एकटा इस्राएली आपल्या राजाला काय करू शकेल असा त्यांनी विचार केला? एहूदचे एकटे येणे, तो आपल्या देशबांधवांचा विश्‍वासघात करत असल्याची छाप देत होते का? परिस्थिती काहीही असो, एहूदने राजाला एकांतात भेटण्याची परवानगी मागितली आणि ती त्याला मिळाली देखील.—शास्ते ३:१९.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०५ १/१५ २४ ¶७

शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे

२:१०-१२. ‘परमेश्‍वराचे सर्व उपकार विसरू नये’ म्हणून आपण नियमितपणे बायबल अभ्यास केला पाहिजे. (स्तोत्र १०३:२) आईवडिलांनी आपल्या मुलांच्या मनावर देवाच्या वचनातील सत्य बिंबवले पाहिजे.—अनुवाद ६:६-९.

२९ नोव्हेंबर–५ डिसेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते ४-५

“यहोवाने दोन स्त्रीयांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं”

टेहळणी बुरूज१७.४ २९ ¶६

“तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!”

बाराक हा इस्राएलमधील एक योद्धा होता, आणि दबोरा ही यहोवाच्या वतीनं संदेश सांगणारी एक संदेष्ट्री होती. कनानचा राजा याबीन याने २० वर्षांपासून इस्राएली लोकांचा खूप छळ चालवला होता. याबीनची सेना इतकी क्रूर आणि हिंसक होती, की गावांमध्ये राहणारे इस्राएली लोक त्यांच्या घराबाहेर पडायलाही फार घाबरायचे. त्याच्याकडे युद्धासाठी ९०० लोखंडी रथ होते. पण इस्राएली लोकांकडे युद्धात लढण्यासाठी योग्य शस्त्रंही नव्हती आणि युद्धात स्वतःच्या बचावासाठी साधनंही नव्हती.—शास्ते ४:१-३, १३; ५:६-८.

टेहळणी बुरूज१५-E ८/१ १३ ¶२

“आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला”

कनानचा राजा याबीनने २० वर्षं इस्राएली लोकांवर भयंकर अत्याचार केले. पण मग यहोवाने पाहीलं, की त्याचे लोक आपल्या वाईट कामांपासून मागे वळायला तयार आहेत. तेव्हा त्याने इस्त्राएल राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी दबोरा नावाच्या एका संदेष्टीला निवडलं. ती लप्पिदोथ नावाच्या एका माणसाची बायको होती. यहोवाने सांगितलं त्याप्रमाणे दबोराने बाराक नावाच्या एका शास्त्याला बोलवून सीसराविरुद्ध युद्ध करायला सांगितलं. एक आई जशी आपल्या मुलांना सांभाळते, तसं दबोराने इस्त्राएली लोकांना सांभाळलं. देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या गीतात ती म्हणते: “तेव्हा मी, दबोरा त्यांच्या मदतीसाठी आले, आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला.”—शास्ते ४:३, ६, ७; ५:७.

टेहळणी बुरूज१५-E ८/१ १५ ¶२

“आई म्हणून मी त्यांचा सांभाळ केला”

याएलने लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचं होतं. तिने सेनापती सिसराला आपल्या तंबूत आराम करण्यासाठी बोलवलं. सिसराने तिला सांगितलं, जर कोणी विचारलं की ‘आत कोणी माणूस आहे का?’ तर ‘नाही!’ म्हणून सांग. मग सिसरा झोपला आणि याएलने त्याच्या अंगावर घोंगडी घातली. त्याने तिला प्यायला पाणी मागितलं तेव्हा तिने त्याला साईचं दूध दिलं. आणि सिसराला गाढ झोप लागली. त्या काळी बायकांनाही तंबू ठोकायचा खिळा आणि हातोडा चांगला वापरता यायचा. मग याएल खिळा आणि हातोडा घेऊन सिसराजवळ आली. आता तिला लवकर निर्णय घ्यावा लागणार होता. त्याला ठार मारून ती यहोवाच्या लोकांना विजय मिळवून देईल का? सिसराला मारावं की नाही हा विचार जर ती करत बसली असती तर कदाचित सिसरा जागा झाला असता आणि त्याने तिचा जीव घेतला असता. मग याएलने त्यावेळी कोणता विचार केला असेल? कदाचित तिने विचार केला असेल की ‘सिसराने मागच्या २० वर्षांपर्यंत यहोवाच्या लोकांचा खूप छळ केला आहे. आणि आता मला त्यांना मदत करायची संधी यहोवाने दिली आहे. ही संधी मी मुळीच जाऊ देणार नाही. मी त्याचा जीव नक्की घेईल.’ तिने नेमका काय विचार केला असेल त्याबद्दल बायबलमध्ये काहीच सांगितलं नाही. पण तिने पटकन पाऊल उचललं आणि सिसराला ठार मारलं.—शास्ते ४:१८-२१; ५:२४-२७.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०५ १/१५ २५ ¶५

शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे

५:२०—बाराकच्या वतीने आकाशातून तारे लढले ते कोणत्या अर्थाने? देवदूतांनी त्याचे साहाय्य केले, उल्कापात घडून, त्यांना सीसराच्या विद्वान पुरुषांनी अपशकुन मानले किंवा मग सीसराने ज्योतिषविद्येच्या आधारावर केलेले अंदाज चुकीचे निघाले यांपैकी नेमके काय घडले याविषयी बायबल स्पष्ट माहिती देत नाही. पण साहजिकच कोणत्या न कोणत्या प्रकारे देवाने हस्तक्षेप केला होता.

६-१२ डिसेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते ६-७

“हिंमत धर आणि जा”

टेहळणी बुरूज०२ २/१५ ६-७

ईश्‍वरी तत्त्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो

स्वतःबद्दल योग्य विचार करणारा आणि स्वतःची पात्रता जाणारा एक होता गिदोन; तो प्राचीन इब्री लोकांमध्ये शास्ता होता. त्याने इस्राएलचा नेता होण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परंतु, गिदोनला नेता म्हणून निवडण्यात आले तेव्हा आपण यासाठी लायक नाही असे तो म्हणू लागला. “माझे कुळ मनश्‍शे वंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलाच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे,” असे तो म्हणाला.—शास्ते ६:१२-१६.

टेहळणी बुरूज०५-HI ७/१५ १६ ¶३

“यहोवा की तलवार और गिदोन की तलवार!”

अब देखिए मिद्यानियों की छावनी में कैसा तहलका मच जाता है! अचानक, और एक-साथ ३०० घड़ों का चूर-चूर होना, ३०० नरसिंगों के फूँकने की आवाज़ और उन ३०० आदमियों का चिल्लाना, रात की खामोशी को चीरता हुआ पूरे माहौल में आतंक फैला देता है। जब गिदोन के आदमी “यहोवा की तलवार और गिदोन की तलवार” कहकर चिल्लाते हैं तो मिद्यानियों के छक्के छूट जाते हैं। वे भी डर के मारे चीखने-चिल्लाने लगते हैं, जिससे और भी कोलाहल मच जाता है। इस अफरा-तफरी में मिद्यानियों को समझ नहीं आता कि दुश्‍मन कौन है और दोस्त कौन। मगर गिदोन के ३०० आदमी अब भी अपनी-अपनी जगह पर खड़े हैं और देखते हैं कि परमेश्‍वर दुश्‍मनों को कैसे उलझन में डाल देता है, जिससे वे आपस में एक-दूसरे का घात कर देते हैं। बचे हुए मिद्यानी भागना शुरू करते हैं। मगर कुछ को बीच रास्ते में ही रोककर मार डाला जाता है। और बाकियों का गिदोन और उसके आदमी दूर-दूर तक पीछा करते हैं और एक-एक को मार गिराते हैं। इस तरह मिद्यानियों का खतरा हमेशा के लिए टल जाता है। आखिरकार, एक लंबे अरसे से चला आ रहा ज़ुल्मों का दौर खत्म हो जाता है!—न्यायियों ७:१९-२५; ८:१०-१२, २८.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०५ १/१५ २६ ¶६

शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे

६:२५-२७. आपल्या विरोधकांना विनाकारण राग येऊ नये म्हणून गिदोन समंजसपणे वागला. सुवार्तेचा प्रचार करत असताना आपणही आपल्या बोलण्याद्वारे लोकांना विनाकारण राग येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

१३-१९ डिसेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते ८-९

“गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी”

टेहळणी बुरूज०० ८/१५ २५ ¶४

तुम्ही मतभेद कसे हाताळता?

मिद्यानी लोकांबरोबर युद्ध चालू असताना गिदोनाने मदतीकरता एफ्राइमी लोकांना बोलावले. पण युद्ध संपल्यानंतर एफ्राइमी लोक गिदोनावर रागावले आणि अशी तक्रार करू लागले, की गिदोनाने त्यांना युद्ध सुरू होण्याआधीच का बोलावले नाही. अहवाल म्हणतो, की “ते त्याच्याशी हुजत घालू लागले.” मग गिदोन त्यांना म्हणाला “आता तुम्ही केले त्या मानाने मी काय केले? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या सबंध पिकापेक्षा चांगला नाही काय? मिद्यानाचे सरदार ओरेब व जेब ह्‍यांना देवाने तुमच्या हाती दिले; तुम्ही केले त्या मानाने मला काय करिता आले?” (शास्ते ८:१-३) गिदोनाच्या या शांत, चतुर शब्दांमुळे एक मोठे संकट टळले. असे दिसते, की एफ्राइमी लोक गर्विष्ठ, आपलाच जास्त विचार करणारे लोक होते. पण गिदोनाचे त्यांच्यासोबत शांतीने राहण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. आपल्यालाही त्याच्याप्रमाणे करता येईल का?

टेहळणी बुरूज१७.०१ २० ¶१५

नम्र असणं गरजेचं का आहे?

१५ नम्रता दाखवण्याच्या बाबतीत गिदोनाचं खूप चांगलं उदाहरण आहे. मिद्यानी लोकांपासून इस्राएली लोकांचा बचाव करण्याची जबाबदारी जेव्हा यहोवाने त्याला दिली तेव्हा तो म्हणाला: “माझे कूळ मनश्‍शे वंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलाच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.” (शास्ते ६:१५) पण, गिदोनाने यहोवावर भरवसा ठेवला आणि ही जबाबदारी स्वीकारली. यहोवाची त्याच्याकडून काय अपेक्षा आहे हे गिदोनाने चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे प्रार्थना केली. (शास्ते ६:३६-४०) गिदोन हा धाडसी होता. पण त्यासोबतच तो हुशार आणि समजूतदार देखील होता. (शास्ते ६:११, २७) जेव्हा लोकांनी त्याला सांगितलं की त्याने त्यांच्यावर राज्य करावं तेव्हा तो तयार झाला नाही. यहोवाने त्याला दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यावर तो पुन्हा त्याच्या घरी परतला.—शास्ते ८:२२, २३, २९.

टेहळणी बुरूज०८ २/१५ ९ ¶९

यहोवाच्या मार्गांनी चाला

९ देवाचे मित्र व्हायचे असेल तर आपण “नम्र मनाचे” असले पाहिजे.  (१ पेत्र ३:८; स्तो. १३८:६) शास्ते पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात नम्र असणे किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवण्यात आले आहे. गिदोनाचा पुत्र योथाम याने म्हटले: “एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणांवर राजा नेमावे म्हणून निघाली.” जैतून, अंजिर आणि द्राक्षवेल यांचा उल्लेख करण्यात आला. ही झाडे अशा लोकांना चित्रित करत होती की जे योग्यताप्राप्त होते परंतु, त्यांना आपल्या सहइस्राएली बांधवांवर अधिकार गाजवण्याची कसलीही इच्छा नव्हती. पण, काटेरी झुडूप ज्याचा उपयोग केवळ जळणासाठी केला जातो ते राज्यत्व स्वीकारण्यास तयार होते. हे काटेरी झुडूप गर्विष्ठ अबीमलेखाच्या राज्यत्वास चित्रित करत होते. अबीमलेख एक खूनी होता जो इतरांवर अधिकार गाजवू पाहत होता. “अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले;” त्यानंतर त्याचा अकाली मृत्यू झाला. (शास्ते ९:८-१५, २२, ५०-५४) तेव्हा, “नम्र मनाचे” असण्यात किती फायदा आहे!

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-१ ७५३ ¶१

एफोद, I

गिदोनने चांगल्या हेतूने एफोद बनवला होता. यहोवाचा गौरव करता यावा आणि त्याने इस्राएली लोकांना जो विजय मिळवून दिला होता त्याची आठवण राहावी म्हणून त्याने तो एफोद बनवला होता. “पण सर्व इस्राएली लोक त्या एफोदची उपासना करू लागले. आणि ते गिदोन व त्याच्या घराण्यासाठी एक पाश ठरलं.” (शास ८:२७) पण गिदोनने त्या एफोदची उपासना केली असं बायबल सांगत नाही. उलट तो एक विश्‍वासू व्यक्‍ती होता असं बायबल सांगतं. प्रेषित पौलने विश्‍वासू साक्षीदारांमध्ये गिदोनचाही उल्लेख केला.—इब्री ११:३२; १२:१.

२०-२६ डिसेंबर

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते १०-१२

“इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस”

टेहळणी बुरूज१६.०४ ७ ¶९

विश्‍वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते

९ इफ्ताहाला योसेफाच्या उदाहरणावरूनही बरीच मदत झाली असावी. योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करत असले तरी तो त्यांच्याशी दयाळूपणे कसा वागला हे त्याला शिकायला मिळालं असेल. (उत्प. ३७:४; ४५:४, ५) या उदाहरणावर विचार केल्यामुळे, यहोवाचं मन आनंदित होईल अशा प्रकारे वागण्यास इफ्ताहाला मदत झाली असेल. आपल्या भावांच्या वागणुकीमुळे इफ्ताहाला नक्कीच खूप दुःख झालं असेल. पण, स्वतःच्या भावनांपेक्षा यहोवाच्या नावाकरता आणि त्याच्या लोकांच्या वतीनं लढणं इफ्ताहासाठी जास्त महत्त्वाचं होतं. (शास्ते ११:९) यहोवाला विश्‍वासू राहण्याचा त्याचा पक्का निर्धार होता. त्यामुळेच, त्याला आणि इस्राएली लोकांना यहोवाकडून आशीर्वाद प्राप्त करणं शक्य झालं.—इब्री ११:३२, ३३.

इन्साइट-२ २७ ¶२

इफ्ताह

अम्मोनी लोकांच्या राजाने इस्राएली लोकांवर असा आरोप लावला की इस्त्राएली लोकांनी त्याचा प्रदेश बळकावला आहे. (शास ११:१२, १३) मग इफ्ताहने त्यांना एक संदेश पाठवला. त्या संदेशावरून हे कळतं की तो फक्‍त एक शूर योद्धा नव्हता, तर त्याला इस्राएली लोकांच्या इतिहासाबद्दलही चांगली माहिती होती. यहोवाने आपल्या लोकांसाठी काय काय केलं हे त्याला माहीत होतं. अम्मोनी लोकांचा आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने तीन मुद्दे सांगितले: (१) मिसरमधून परत येताना इस्राएली लोकांनी अम्मोनी, मवाबी आणि अदोमी लोकांना काहीच त्रास दिला नव्हता. (शास ११:१४-१८; अनु २:९, १९, ३७; २इत २०:१०, ११); (२) अम्मोनी लोक ज्या प्रदेशाबद्दल बोलत होते तो खरंतर त्यांचा नसून अमोरी लोकांचा होता. यहोवाने इस्राएली लोकांना अमोरी लोकांवर विजय मिळवून दिला होता आणि तिथला राजा व तो प्रदेश त्यांच्या हाती दिला होता. (३) ३०० वर्षांपासून इस्राएली लोक तिथे राहात होते आणि इतक्या वर्षांपर्यंत अम्मोनी लोकांनी तो प्रदेश परत घ्यायचा कधीच प्रयत्न केला नव्हता. मग आता ते कोणत्या हक्काने तो परत मागत होते?—शास ११:१९-२७.

इन्साइट-२ २७ ¶३

इफ्ताह

इफ्ताहने अम्मोनी लोकांना सांगितलं की इस्राएल प्रदेशाचा थोडाही भाग त्यांना मिळणार नाही. आणि याचं कारणही त्याने दिलं. त्याने म्हटलं की इस्राएली लोक यहोवाची उपासना करत असल्यामुळे यहोवाने त्यांना हा प्रदेश दिला आहे. पण अम्मोनी लोक खोट्या देवतांची उपासना करत असल्यामुळे त्यांना या प्रदेशातून थोडाही भाग मिळणार नाही.—शास ११:२४; १रा ११:१, ७, ८, ३३; २रा २३:१३

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-२ २६

इफ्ताह

इफ्ताहची “आई पूर्वी एक वेश्‍या होती.” पण याचा अर्थ असा नव्हता की इफ्ताहच्या वडिलांनी, म्हणजे गिलादनी एका वेश्‍येशी संबंध ठेवला आणि त्यातून इफ्ताहचा जन्म झाला. जसं राहाब लग्नाआधी वेश्‍या होती आणि मग तिने सल्मोनशी लग्न केलं. तसंच इफ्ताहची आईपण लग्नाआधी वेश्‍या होती मग तिने गिलादशी लग्न केलं. खरंतर, इफ्ताहची आई गिलादची दुसरी बायको होती. (शास ११:१; यहो २:१; मत्त १:५) असं म्हणण्याची तीन कारणं आपण पाहू. पहिलं कारण असं की इफ्ताहला आपल्या घराण्याचा वारसा मिळू नये म्हणून त्याच्या सावत्र भावांनी (गिलादच्या पहिल्या बायकोच्या मुलांनी) त्याला घरातून हाकललं. (शास ११:२) तो जर विवाहबाह्‍य संबंधातून झालेला, म्हणजेच अनौरस मुलगा असता तर त्याला वारसा मिळाला नसता आणि म्हणून त्याच्या भावांना त्याला घराबाहेर हाकलण्याची गरजच पडली नसती. दुसरं कारण म्हणजे गिलादच्या वडीलजनांनी त्याला पुढारी म्हणून नेमलं. त्या वेळी इफ्ताहच्या भावांनी आक्षेप घेतला नाही. खरंतर ते खूप नावाजलेले लोक होते आणि जर इफ्ताह अनौरस असता तर त्यांनी त्याला कधीच पुढारी बनू दिलं नसतं. (शास ११:११) आणि तिसरं कारण म्हणजे इफ्ताहने उपासनामंडपात परमेश्‍वराला होमार्पण दिलं. (शास ११:३०, ३१) तो जर विवाहबाह्‍य संबंधातून जन्मलेला असता तर तो असं करू शकला नसता. कारण “विवाहबंधनापासून जन्म न झालेल्या मुलाने यहोवाच्या मंडळीत येऊ नये. दहाव्या पिढीपर्यंतही त्याच्या वंशजांनी यहोवाच्या मंडळीत येऊ नये.” असा यहोवाचा नियम होता.—अनु २३:२.

२७ डिसेंबर-२ जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | शास्ते १३-१४

“मानोहा आणि त्याच्या पत्नीकडून पालक काय शिकू शकतात?”

टेहळणी बुरूज१३ ८/१५ १६ ¶१

पालकांनो—आपल्या मुलांना बालपणापासूनच देवाविषयी शिकवा

प्राचीन इस्राएलमधील सरा गावात राहणाऱ्‍या दानवंशातील मानोहाचे उदाहरण लक्षात घ्या. यहोवाच्या देवदूताने मानोहाच्या वांझ असलेल्या बायकोला सांगितले की ती एका बाळाला जन्म देईल. (शास्ते १३:२, ३) हे ऐकून देवभीरू मानोहाला आणि त्याच्या बायकोला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो! पण त्याचबरोबर त्यांना काही गोष्टींची चिंताही होती. त्यामुळे, मानोहाने अशी प्रार्थना केली: “हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठवला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्‍या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे असे कर.” (शास्ते १३:८) येणाऱ्‍या बाळाचे संगोपन कसे करावे याबद्दल मानोहाला आणि त्याच्या पत्नीला चिंता होती. त्यांनी आपल्या मुलाला, शमशोनाला देवाच्या आज्ञा शिकवल्या असतील यात काहीच शंका नाही आणि त्यांचे हे प्रयत्न नक्कीच सफल ठरले. कारण बायबल म्हणते: “परमेश्‍वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने [शमशोन] संचार करू लागला.” आणि यामुळेच इस्राएलचा शास्ता या नात्याने शमशोन बरीच शक्‍तिशाली कामे करू शकला.—शास्ते १३:२५; १४:५, ६; १५:१४, १५.

टेहळणी बुरूज०५-HI ३/१५ २५-२६

शिमशोन ने यहोवा की शक्‍ति से जीत पायी!

जैसे-जैसे शिमशोन बड़ा होता गया, “यहोवा उसको आशीष देता रहा।” (न्यायियों १३:२४) एक दिन शिमशोन ने अपने माता-पिता के पास आकर कहा: “तिम्ना में मैं ने एक पलिश्‍ती स्त्री को देखा है, सो अब तुम उस से मेरा ब्याह करा दो।” (न्यायियों १४:२) सोचिए कि यह बात सुनकर उसके माता-पिता कितने चौंक गए होंगे! उनका बेटा उन ज़ालिमों के हाथों से इस्राएलियों को छुड़ाने के बजाय उनके साथ रिश्‍ता जोड़ना चाहता है। झूठे देवताओं की बंदगी करनेवाली किसी औरत से शादी करना परमेश्‍वर के कानून के खिलाफ था। (निर्गमन ३४:११-१६) इसलिए उसके माता-पिता ने एतराज़ करते हुए कहा: “क्या तेरे धाइयों की बेटियों में, वा हमारे सब लोगों में कोई स्त्री नहीं है, कि तू खतनाहीन पलिश्‍तियों में से स्त्री ब्याहने चाहता है?” लेकिन शिमशोन अपनी ज़िद पर अड़ा रहा: “उसी से मेरा ब्याह करा दे; क्योंकि मुझे वही अच्छी लगती है।”—न्यायियों १४:३.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०५-HI ३/१५ २६ ¶१

शिमशोन ने यहोवा की शक्‍ति से जीत पायी!

वह पलिश्‍ती स्त्री किस मायने में शिमशोन के लिए सबसे “अच्छी” थी? मैक्लिंटॉक और स्ट्रॉन्ग की साइक्लोपीडिया के मुताबिक, ऐसी बात नहीं कि वह देखने में “खूबसूरत थी और उसका रंग-रूप बहुत लुभावना था, बल्कि वह एक खास मकसद को अंजाम देने के लिए” सबसे अच्छी थी। वह मकसद क्या था? न्यायियों १४:४ बताता है कि शिमशोन ‘पलिश्‍तियों के विरुद्ध दांव ढूंढ़ रहा था।’ और इसी मकसद से उसने उस स्त्री को अपनी पत्नी बनाना चाहा। दरअसल जब शिमशोन बालिग हुआ, तब से ‘यहोवा की आत्मा उसे उभारने लगी’ यानी उसमें काम करने का जोश भरने लगी। (न्यायियों १३:२५) तो फिर यह कहना सही होगा कि यहोवा की आत्मा के उकसाने पर ही शिमशोन ने उस पलिश्‍ती स्त्री से शादी करने की अनोखी गुज़ारिश की। और इसी आत्मा की प्रेरणा से उसने ज़िंदगी भर इस्राएल में न्यायी होने की ज़िम्मेदारी सँभाली। क्या शिमशोन को वह मौका हाथ लगा जिसकी उसे तलाश थी? यह जानने से पहले आइए देखें कि यहोवा ने कैसे उसे यकीन दिलाया कि वह उसके साथ था।

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा