वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ५
  • आपल्या समजशक्‍तीला प्रशिक्षण देत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या समजशक्‍तीला प्रशिक्षण देत राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • आपण चांगले निर्णय कसे घेऊ शकतो?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • विश्‍वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • थोडक्यात परिचय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ५

ख्रिस्ती जीवन

आपल्या समजशक्‍तीला प्रशिक्षण देत राहा

एका खेळाडूला आपलं कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी सतत कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे, आपणही आपल्या समजशक्‍तीला टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देत राहिलं पाहिजे. (इब्री ५:१४) इतरांनी घेतलेले निर्णय आपणही घ्यावेत असा विचार सहसा आपल्या मनात येतो. पण आपण विचार करून स्वतः निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. का बरं? कारण आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःबद्दल देवाला हिशोब देणार आहे.—रोम १४:१२.

मला बाप्तिस्मा घेऊन बरीच वर्षं झाली आहेत, म्हणून मी योग्य निर्णय घेईन, असा विचार आपण करू नये. योग्य निर्णय घ्यायचे असतील तर आपण पूर्णपणे यहोवावर, त्याच्या वचनावर आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर विसंबून राहिलं पाहिजे.—यहो १:७, ८; नीत ३:५, ६; मत्त २४:४५.

“शुद्ध विवेक टिकवून ठेवा”  हा व्हिडिओ पाहा, आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाची उत्तरं द्या:

  • “शुद्ध विवेक टिकवून ठेवा” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. इमा आपल्या पतीसोबत लग्नपत्रिका पाहत आहे.

    इमासमोर कोणती परिस्थिती आली?

  • “शुद्ध विवेक टिकवून ठेवा” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. एमी अगदी ठासून आपलं मत मांडते.

    एखाद्याला त्याच्या विवेकानुसार निर्णय घ्यायची गरज पडते, तेव्हा आपण आपलं व्यक्‍तिगत मत का मांडू नये?

  • “शुद्ध विवेक टिकवून ठेवा” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. इमा शार्लेट आणि ॲलनकडे सल्ला मागते.

    एका जोडप्याने इमाला कोणता योग्य सल्ला दिला?

  • “शुद्ध विवेक टिकवून ठेवा” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. इमा तिच्या कंप्युटरवर “वॉचटॉवर ऑनलाईन लायब्ररीचा” वापर करून संशोधन करते.

    इमाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी कुठे मदत मिळाली?

मी कशाच्या आधारावर निर्णय घेतला पाहिजे?

  • माझं व्यक्‍तिगत मत

  • इतरांचं मत

  • बायबलची तत्त्वं

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा