वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. ३
  • सहानुभूती दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सहानुभूती दाखवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • दया आणि करुणा दाखवण्यास साहाय्य करणारी सहानुभूती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • देवाला आपल्याबद्दल सहानुभूती आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • सहानुभूती दाखवा
    सावध राहा!—२०२०
  • प्रश्‍न विचारा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. ३

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

सहानुभूती दाखवा

एखाद्याचे विचार, त्याच्या भावना, तो कोणत्या तत्त्वांनुसार जगतोय आणि त्याच्या गरजा काय आहेत, हे समजून घेण्याची क्षमता म्हणजे सहानुभूती. इतरांना मनापासून मदत करण्याच्या आपल्या इच्छेतून सहानुभूती दिसून येते आणि इतरांनाही ती सहजपणे जाणवते. सेवाकार्यात जेव्हा आपण लोकांना सहानुभूती दाखवतो तेव्हा त्यातून त्यांना यहोवाचं प्रेम आणि काळजी दिसून येते. आणि त्यामुळे ते यहोवाकडे आकर्षित होतात. —फिलि २:४.

सहानुभूती हे शिकवण्यासाठी लागणारं फक्‍त एक कौशल्य नाही. तर आपण इतरांचं ज्या प्रकारे ऐकतो, त्यांच्याशी बोलतो त्यातून दिसून येणारा हा एक गुण आहे. तसंच आपली प्रतिक्रीया आणि आपले हावभाव, यातूनही सहानुभूती दिसून येते. आपण जेव्हा इतरांना काय आवडतं, ते कोणत्या गोष्टी मानतात आणि त्याची परिस्थिती कशी आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचं दाखवत असतो. आपण इतरांवर कोणताही दबाव न आणता त्यांना काही व्यावहारिक गोष्टी सुचवतो आणि त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. ते जेव्हा आपली मदत घ्यायला तयार होतात, तेव्हा सेवाकार्यातला आपला आनंद आणखी वाढतो.

‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—सहानुभूती दाखवून’  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा​—​आपली कौशल्यं वाढवा​—​सहानुभूती दाखवून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. कॉफी शॉपमध्ये जेड आपल्याला स्टडी का करायचा नाही, ते निताला सांगत आहे.

    जेड उशीरा आली तेव्हा निताने तिला सहानुभूती कशी दाखवली?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा​—​आपली कौशल्यं वाढवा​—​सहानुभूती दाखवून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. निता जेडची परिस्थिती समजून घेते आणि तिचं लक्ष देऊन ऐकते.

    थकून गेल्यामुळे स्टडी करायचा मूड नाही, असं जेव्हा जेडने सांगितलं, तेव्हा निताने सहानुभूती कशी दाखवली?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—सहानुभूती दाखवून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. निता जेडला तिच्या रूममधला पसारा आवरायला मदत करते.

    आपण सहानुभूती दाखवतो तेव्हा लोक यहोवाकडे आकर्षित होतात

    सगळ्या गोष्टी सुव्यवस्थितपणे करायला जमत नाहीत, असं जेडने सांगितल्यावर निताने तिला सहानुभूती कशी दाखवली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा