वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १५
  • काळजीपूर्वक मित्र निवडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काळजीपूर्वक मित्र निवडा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या दिवसांतील ईशारेवजा उदाहरणांकडे लक्ष देण्याची विनम्र विनंती
    आमची राज्य सेवा—२००२
  • आव्हानांचा सामना करताना तुम्ही फीनहासाचे अनुकरण करू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • विचार करून मित्र निवडा!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १५
मवाबी स्त्रिया इस्राएली पुरुषांना त्यांच्यासोबत येण्यासाठी बोलवत आहेत.

ख्रिस्ती जीवन

काळजीपूर्वक मित्र निवडा

मवाबाच्या मैदानात इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. (१कर १०:६, ८, ११) मवाबच्या स्त्रिया अनैतिक कामं आणि मुर्तिपूजा करायच्या. काही इस्राएली लोकांनी या स्त्रियांसोबत मैत्री करायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी गंभीर पाप केलं आणि त्याचा खूप वाईट परिणाम त्यांना भोगावा लागला. (गण २५:९) आज आपल्याला अशा लोकांसोबत राहवं लागतं जे यहोवाची उपासना करत नाहीत. त्यापैकी काही जण कदाचित आपले नातेवाईक किंवा ओळखीचे लोक असतील. तसंच कामावर, शाळेत किंवा शेजारीसुद्धा बऱ्‍याच लोकांसोबत आपल्याला वेळ घालवावा लागतो. अशा लोकांसोबत जास्त मैत्री केल्यामुळे आपल्यालाही इस्त्राएली लोकांप्रमाणे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

इस्राएली लोकांच्या वाईट उदाहरणातून शिकण्यासारखे धडे—निवडक भाग  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘इस्राएली लोकांच्या वाईट उदाहरणातून शिकण्यासारखे धडे—निवडक भाग ‘ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. जिम्री यामीन आणि इतरांना मवाबी स्त्रीयांबद्दल सांगतो.

    जिम्री आणि इतर लोक यामीनला कोणती चुकीची गोष्ट पटवून द्यायचा प्रयत्न करत होते?

  • ‘इस्राएली लोकांच्या वाईट उदाहरणातून शिकण्यासारखे धडे—निवडक भाग’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. फिनहास यामीनला विचार करायला लावतो.

    फिनहासने यामीनला योग्य दृष्टिकोन बाळगायला कशी मदत केली?

  • विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तींशी मैत्रीपूर्ण वागणं आणि त्यांच्याशी मैत्री करणं यात काय फरक आहे?

  • मंडळीतसुद्धा आपण विचार करून मित्र का निवडले पाहिजेत?

  • अनोळखी लोकांसोबत आपण सोशल मिडियावर चॅट करायचं का टाळलं पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा