वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr21 जानेवारी पृ. १-११
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
  • उपशिर्षक
  • ४-१० जानेवारी
  • ११-१७ जानेवारी
  • १८-२४ जानेवारी
  • २५-३१ जानेवारी
  • १-७ फेब्रुवारी
  • ८-१४ फेब्रुवारी
  • १५-२१ फेब्रुवारी
  • २२-२८ फेब्रुवारी
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०२१
mwbr21 जानेवारी पृ. १-११

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

४-१० जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | लेवीय १८-१९

“नैतिकरित्या शुद्ध राहा”

टेहळणी बुरूज१९.०६ २८ ¶१

सैतानाच्या एका पाशापासून संरक्षण कसं मिळवाल?

इस्राएलच्या आजूबाजूची राष्ट्रं ज्या अनैतिक गोष्टी करत होती त्याचा उल्लेख करत यहोवाने म्हटलं: “ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका . . . त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे.” पवित्र देवाच्या, यहोवाच्या नजरेत कनानमध्ये राहणारे लोक इतके दुष्ट आणि अनैतिक होते, की त्याच्या मते तो देश अतिशय भ्रष्ट आणि दूषित झाला होता.—लेवी. १८:३, २५.

टेहळणी बुरूज१७.०२ २० ¶१३

यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करतो

१३ दुसऱ्‍या देशांमध्ये नेतृत्व करणारे मर्यादित मानवी बुद्धीवर अवलंबून होते. उदाहरणार्थ, कनानचं नेतृत्व करणारे आणि इतर कनानी लोक फार घृणास्पद कृत्यं करत होते. या कृत्यांत अगदी जवळच्या नातेवाइकासोबत लैंगिक संबंध ठेवणं, समलैंगिकता, पशूगमन, मुलांचा बळी देणं आणि मूर्तिपूजा करणं अशा घोर कृत्यांचा समावेश होता. (लेवी. १८:६, २१-२५) तसंच, स्वच्छतेविषयीच्या नियमांबद्दल देवाच्या लोकांना जी माहिती होती ती बाबेलच्या आणि इजिप्तच्या नेत्यांकडे नव्हती. (गण. १९:१३) पण याच्या अगदी उलट देवाच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्‍या विश्‍वासू सेवकांनी लोकांना आपली उपासना शुद्ध ठेवण्यास, शारीरिक स्वच्छता बाळगण्यास आणि नैतिक शुद्धता राखण्यास नेहमी प्रोत्साहन दिलं. यावरून हेच दिसून येतं की खरोखर यहोवाच त्याच्या लोकांचं नेतृत्व करत होता.

टेहळणी बुरूज१४ १०/१ ७ ¶२

देव दुष्टाईचे काय करेल?

पण, जे लोक आपले चुकीचे मार्ग बदलण्यास तयार नसतात किंवा वाईट गोष्टी करत राहतात अशांबद्दल काय? बायबल सडेतोड शब्दांत काय अभिवचन देते ते विचारात घ्या: “सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल.” (नीतिसूत्रे २:२१, २२) अशा प्रकारे जगात दुष्ट लोकांचा प्रभावच उरणार नाही. मग, आज्ञाधारक मानवांना वारशाने मिळालेल्या पापातून हळूहळू मुक्‍त केले जाईल.—रोमकर ६:१७, १८; ८:२१.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०६ ७/१ १४ ¶११

“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”

११ देवाला आपल्या लोकांची किती काळजी आहे हे मोशेच्या नियमशास्त्रातल्या आणखी एका तरतूदीवरून दिसून येते. ही तरतूद म्हणजे सरवा वेचण्याची व्यवस्था. यहोवाने अशी आज्ञा दिली होती, की शेतातले पीक कापताना कामकऱ्‍यांकडून जे राहून गेले ते पीक पुन्हा गोळा केले जाऊ नये. ते गरजू लोकांना वेचू द्यावे. इस्राएली शेतकऱ्‍यांना सांगण्यात आले होते की त्यांनी आपल्या शेताची कापणी करताना शेताच्या कानाकोपऱ्‍यातील सगळे पीक कापू नये. तसेच द्राक्षमळ्यात पडलेली किंवा जैतुनाच्या झाडावरून पडलेली सगळी फळे गोळा करू नयेत. धान्याच्या पेंढ्या शेतात चुकून राहिल्यास त्या परत आणू नयेत. ही गरीब लोकांसाठी, परक्या रहिवाशांसाठी तसेच अनाथ व विधवा यांच्यासाठी केलेली एक प्रेमळ व्यवस्था होती. अर्थात, सरवा वेचण्याकरता या गरजू लोकांना स्वत: मेहनत करावी लागे. पण या व्यवस्थेमुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ येत नसे.—लेवीय १९:९, १०; अनुवाद २४:१९-२२; स्तोत्र ३७:२५.

११-१७ जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | लेवीय २०-२१

“यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो”

टेहळणी बुरूज०४ १०/१५ ११ ¶१२

परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का?

१२ पण जिच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये अशी आणखी एक गोष्ट आहे. देवाने इस्राएलांना सांगितले: “जी आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी . . . जात आहा त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल.” (अनुवाद ११:८) लेवीय २०:२२, २४ येथे पुन्हा त्याच देशाचा उल्लेख करण्यात आला आहे: “तुम्ही माझे सर्व विधि व माझे सर्व नियम मान्य करून पाळावे म्हणजे ज्या देशी वसाहत करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही. त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन, असे मी तुम्हाला सांगितले आहे.” होय, प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्यासाठी यहोवा देवासोबत एक उत्तम नातेसंबंध असणे गरजेचे होते. आणि इस्राएलांनी देवाच्या आज्ञांचे पालन केले नाही म्हणूनच देवाने बाबेलोनी लोकांना येऊन त्यांच्यावर विजय मिळवण्यास व त्यांच्या राहत्या देशातून त्यांचा उच्छेद करण्यास अनुमती दिली.

इन्साइट-१ ११९९

वारसा

एका व्यक्‍तिच्या मृत्युनंतर त्याच्या संपत्तीचा अधिकार त्यासाठी हक्कदार असणाऱ्‍या व्यक्‍तिला मिळतो. अशा प्रकारे मिळणाऱ्‍या संपत्तीला आपण वारसा म्हणतो. यासोबतच अशा गोष्टी ज्या आई-वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून पुढच्या पिढीला मिळतात, त्यालाही वारसाहक्काने मिळालेल्या गोष्टी म्हणतात. इब्री भाषेत वारसा यासाठी असणाऱ्‍या शब्दाचा अर्थ पूर्वजांकडून वारशाने मिळणाऱ्‍या किंवा पुढच्या पिढीला दिल्या जाणाऱ्‍या गोष्टी असा होतो. (गण २६:५५; यहे ४६:१८) आणि हा शब्द ज्या मूळ शब्दापासून बनला आहे, त्याचा अर्थ “वारस बनणं” किंवा बहुतेक वेळा वारश्‍याने हक्क नसलेल्या गोष्टीवर “अधिकार मिळवणं” असा होतो. (उत्प १५:३; लेवी २०:२४) याचा आणखी एक अर्थ असाही होतो की सैनिकी हल्ल्याद्वारे एखाद्या गोष्टीचा ताबा घेणं किंवा ज्यांच्या अधिकारात ती गोष्ट आहे, त्यांना हाकलून लावणं. (अनु २:१२; ३१:३) ग्रीक भाषेत वारश्‍यासाठी असणाऱ्‍या शब्दाचा मूळ अर्थ ‘चिट्ठी’ असा होतो. पण नंतर हा शब्दा ‘वाटून घेणं’ किंवा “वारसा” या अर्थानेसुद्धा वापरला जाऊ लागला.—मत्त २७:३५; प्रेका १:१७; २६:१८.

इन्साइट-१ ३१७ ¶२

पक्षी

जलप्रलयानंतर नोहाने प्राण्यांसोबत काही ‘शुद्ध पक्ष्यांनासुद्धा’ देवाला होमार्पण करण्यासाठी वापरलं होतं. (उत्प ८:१८-२०) आणि त्यानंतर देवाने मानवाला अन्‍न म्हणून पक्ष्यांचा वापर करायची अनुमती दिली. त्यांना फक्‍त रक्‍त न खाण्याची आज्ञा दिली होती. (उत्प ९:१-४; ची तुलना लेवी ७:२६; १७:१३ सोबत करा) यावरून कळतं, की देवाने हे सुचवलं होतं की तो फक्‍त काही पक्ष्यांचाच, बलिदान म्हणून स्वीकार करणार होता. बायबलचा अहवाल दाखवून देतो की मोशेचं नियमशास्त्र देण्याआधी कोणत्याही पक्ष्यांना खाण्यासाठी ‘अशुद्ध’ ठरवण्यात आलं नव्हतं. नंतर मोशेच्या नियमशास्त्रातच काही पक्ष्यांना ते खाण्यासाठी “अशुद्ध” असल्याचं सांगितलं होतं. (लेवी ११:१३-१९, ४६, ४७; २०:२५; अनु १४:११-२०) नेमकं असं काय कारण होतं ज्यामुळे या पक्ष्यांना “अशुद्ध” ठरवण्यात आलं होतं, हे बायबलमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नाही. हे खरं आहे, की ज्या पक्ष्यांना अशुद्ध म्हटलं जात होतं, त्यांपैकी बहुतेक पक्षी शिकार करायचे. पण असं सगळ्याच अशुद्ध पक्ष्यांच्या बाबतीत म्हणता येत नव्हतं. कालांतराने जेव्हा नवा करार लागू करण्यात आला तेव्हा हा नियम रद्द करण्यात आला. ही गोष्ट देवाने पेत्रला दिलेल्या दृष्टांतामधून स्पष्ट होते.—प्रेका १०:९-१५.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०४ ९/१५ २७ ¶४

अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

स्वतःच्या अंगावर वार करून घेतल्याने मानवी शरीराबद्दल अनादर दिसून येतो; याचा संबंध खोट्या उपासनेशीही असू शकतो तेव्हा आपण ही प्रथा टाळली पाहिजे. (१ राजे १८:२५-२८) आपल्याला पुनरुत्थानाची आशा असल्यामुळे, मृत व्यक्‍तीबद्दल शोक व्यक्‍त करण्यासाठी अशी टोकाची पावले उचलणे योग्य ठरणार नाही.

१८-२४ जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | लेवीय २२-२३

“नेमलेले सण आणि त्यांचा आपल्यासाठी असलेला अर्थ”

इन्साइट-१ ८२६-८२७

बेखमीर भाकरीचा सण

बेखमीर भाकरींच्या सणाचा पहिला दिवस मोठ्या उत्सवाचा दिवस होता. तो शब्बाथ दिवसपण होता. दुसऱ्‍या दिवशी म्हणजे निसान १६ ला पेलेस्टाईनच्या प्रदेशात कापणीला आलेल्या जवाच्या पहिल्या पिकाची एक पेंढी याजकाकडे आणली जायची. या सणाच्याआधी नवीन पिकापासून बनलेला कोणताही पदार्थ खाल्ला जात नव्हता. याजक त्या धान्याच्या पहिल्या पिकाच्या पेंढीला ओवाळून यहोवासमोर अर्पण करायचा. आणि त्याच दिवशी एक वर्षाचा पुष्ट मेंढा घेऊन तेलात मिसळलेल्या पिठासोबत आणि पेयार्पणासोबत त्याचं होमार्पण केलं जायचं. (लेवी २३:६-१४) नियमशास्त्रात धान्य किंवा पीठ वेदीवर जाळण्याबद्दल कोणतीही आज्ञा दिलेली नव्हती, पण नंतर याजकांनी या गोष्टीची सुरुवात केली. पहिल्या पिकाचं हे अर्पण खासकरून संपूर्ण इस्राएल राष्ट्राच्या वतीने यहोवाला अर्पण केलं जायचं. पण यासोबतच ज्यांच्याकडे वारशाने मिळालेली जमीन होती त्यांनासुद्धा या सणाच्या काळात आभार मानण्याची अर्पणं देता येत होती.—निर्ग २३:१९; अनु २६:१, २.

सणाचं महत्त्व. या सणाच्या वेळी ज्या बेखमीर भाकरी खाल्ल्या जायच्या त्या निर्गम १२:१४-२० मध्ये सांगितलेल्या आज्ञेनुसार होत्या. या आज्ञा यहोवाने मोशेला दिल्या होत्या. याबद्दल १९ व्या वचनात यहोवाने स्पष्टपणे सांगितलं होतं, की त्या सात दिवसांपर्यंत तुमच्या घरांमध्ये “खमीर असलेलं” काही नसावं. अनुवाद १६:३ मध्ये या बेखमीर भाकरीला “दुःखाची भाकर” असं म्हटलं आहे. यहोवाने त्यांना इजिप्तमधून कसं घाईघाईत बाहेर काढलं होतं, याची आठवण या बेखमीर भाकरीमुळे व्हायची. (त्या वेळी त्यांना पिठात खमीर घालण्याइतकाही वेळ मिळाला नाही [निर्ग १२:३४]) तसंच त्यांनी कशा प्रकारे इजिप्तमध्ये गुलामीत दिवस काढले होते आणि मग यहोवाने त्यांना कसं यातून सोडवलं याची आठवण त्यांना राहणार होती. यहोवाने त्यांना म्हटलं, “ज्या दिवशी तुम्ही तिथून बाहेर आलात, तो दिवस आयुष्यभर तुमच्या लक्षात राहावा म्हणून असं करा.” एक राष्ट्र म्हणून त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याची आणि यहोवा त्यांचा सोडवणारा आहे या गोष्टींची जाणीव त्यांना या सणामुळे होणार होती. म्हणूनच, ते हा बेखमीर भाकरीचा सण पाळत होते. हा सण इस्त्राएलांच्या तीन वार्षिक सणांपैकी पहिला होता.—अनु १६:१६.

इन्साइट-२ ५९८ ¶२

पेन्टेकॉस्ट

पेन्टेकॉस्टच्या सणाच्या दिवशी कापणीला आलेल्या पहिल्या जवाच्या पिकाचा जसा वापर केला जायचा, त्यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे गव्हाच्या पहिल्या पिकाचा वापर केला जायचा. त्यासाठी दोन दशांश एफाभर चांगल्या पिठात (४.४ लि.) खमीर घालून दोन भाकरी भाजल्या जायच्या. या भाकरी “घरून” आणल्या जायच्या म्हणजे नेहमीप्रमाणेच बनवल्या जायच्या. (लेवी २३:१७) आणि मग होमार्पण आणि पापार्पणासाठी दोन मेंढ्यांसोबत या भाकरीही आर्पण केल्या जायच्या. मग याजक या भाकरी आणि मेढ्याच्या तुकड्यांच्या खाली हात ठेवून यहोवापुढे ओवाळून त्या अर्पण करायचा. आणि शांतीचं अर्पण म्हणून ते स्वतःसाठी ठेवायचा.—लेवी २३:१८-२०.

टेहळणी बुरूज१४ ५/१५ २९ ¶११

यहोवाच्या संघटनेसोबत तुम्ही पुढे वाटचाल करत आहात का?

११ यहोवाची संघटना आपल्याला प्रेषित पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण करण्यास आर्जवते, जे खरेतर आपल्या फायद्यासाठी आहे. त्याने असे म्हटले: “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री १०:२४, २५) इस्राएली लोकांचे वार्षिक सण व उपासनेच्या इतर सभा यांमुळे त्यांना आध्यात्मिक रीत्या उभारी मिळायची. शिवाय, नहेम्याच्या काळात साजरा करण्यात आलेल्या मांडवांच्या सणासारखे खास मेळावे त्यांच्याकरता खूप आनंददायक होते. (निर्ग. २३:१५, १६; नहे. ८:९-१८) आज सभांमुळे, संमेलनांमुळे आणि अधिवेशनांमुळे आपल्यालाही त्यांच्यासारखेच फायदे होतात. तर मग, आध्यात्मिक रीत्या सुदृढ व आनंदी राहण्याकरता आपण या तरतुदींचा पुरेपूर फायदा उठवू या.—तीत २:२.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१९.०२ २ ¶३

खरेपणा टिकवून ठेवा!

३ देवाचे सेवक खरेपणा कसा दाखवतात? देवावर अतूट आणि पूर्ण मनाने प्रेम करण्याद्वारे ते खरेपणा दाखवतात. आणि यामुळे ते नेहमी अशी कार्य करतात ज्यामुळे देवाचं मन आनंदित होईल. ‘खरेपणा’ या शब्दासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ संपूर्ण, निर्दोष किंवा चांगल्या स्थितीत असणं असा होतो. उदाहरणार्थ, इस्राएली लोक यहोवाला प्राणी अर्पण करायचे. नियमानुसार त्यांना असा प्राणी अर्पण करायचा होता ज्यात कोणताच दोष नव्हता. (लेवी. २२:२१, २२) आंधळे, लंगडे किंवा एखाद्या प्राण्याला कान नसेल, तर असे प्राणी त्यांनी अर्पण करू नये अशी त्यांना आज्ञा देण्यात आली होती. तो प्राणी संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असणं यहोवासाठी खूप महत्त्वाचं होतं. (मला. १:६-९) संपूर्ण आणि निर्दोष हे पैलू यहोवासाठी इतके महत्त्वाचे का आहेत हे आपण एका उदाहरणावरून समजू शकतो. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेता, जसं की फळ, पुस्तक किंवा एखादं साधन, आणि जर ते फळ सडलेलं असलं, त्या पुस्तकात काही पानं नसले, किंवा त्या साधनात काही भाग नसले, तर तुम्ही ते घेणार का? नक्कीच नाही! आपल्याला ती वस्तू अगदी पूर्ण, काहीही दोष नसलेली आणि चांगली हवी असते. त्याच प्रकारे, यहोवाला वाटतं की त्याच्यासाठी असलेलं आपलं प्रेम आणि खरेपणा संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असायला हवा.

२५-३१ जानेवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं  |  लेवीय २४-२५

“सुटकेचं वर्ष आणि भविष्यात मिळणारी कायमची सुटका”

टेहळणी बुरूज१९.१२ ८ ¶३

यहोवा आपल्या सुटकेची योजना करतो

येशूच्या शब्दांचा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आधी यहोवाने इस्राएली लोकांसाठी केलेल्या सुटकेच्या वर्षाच्या योजनेबद्दल पाहू. यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं: “पन्‍नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवाशी मुक्‍त झाल्याची घोषणा करावी; या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे; या वर्षी तुम्ही आपआपल्या वतनात व आपआपल्या कुटुंबात परत जावे.” (लेवीय २५:८-१२ वाचा.) मागच्या लेखात आपण पाहिलं की आठवड्याच्या शब्बाथाच्या योजनेमुळे इस्राएली लोकांना फायदा झाला. पण योबेल किंवा सुटकेचं वर्ष याचा इस्राएली लोकांना कसा फायदा झाला? समजा एखाद्या इस्राएली व्यक्‍तीवर खूप कर्ज असल्यामुळे तिला आपली जमीन विकावी लागली असेल, तर योबेल वर्षादरम्यान तिला ती जमीन परत मिळायची. त्यामुळे ती व्यक्‍ती आपल्या “वतनात” परत जाऊ शकत होती आणि नंतर तिच्या मुलांना ती जमीन वारसा म्हणून मिळणं शक्य व्हायचं. तसंच, एखाद्या व्यक्‍तीने जर कर्ज फेडण्यासाठी स्वतःला किंवा आपल्या मुलांना दास म्हणून विकलं असेल, तर सुटकेच्या वर्षात ती व्यक्‍ती आपल्या “कुटुंबात” परत जाऊ शकत होती. या तरतुदीमुळे कोणालाही कायमचं दास म्हणून राहायची गरज नव्हती. यामुळे यहोवाची लोकांप्रती असलेली काळजी स्पष्टपणे दिसून आली.

इन्साइट-१ १२०० ¶२

वारसा

इस्राएलमध्ये जमिनीचा अधिकार पिढ्या न्‌ पिढ्या एकाच कुटुंबाकडे असायचा. त्यामुळे कोणालाही ही जमीन कायमची विकता येत नव्हती. इस्राएलमध्ये जमीन ही फक्‍त ठेक्यावर विकली जायची. आणि सुटकेच्या वर्षापर्यंत जितकं उत्पन्‍न होईल, त्या उत्पन्‍नाच्या आधारावर जमिनीची किंमत ठरवली जायची. सुटकेच्या वर्षी सर्वांना आपली विकलेली जमीन पुन्हा मिळायची. (लेवी २५:१३, १५, २३, २४) भिंती नसलेल्या वस्त्यांमधली घरं ही शेतजमिनीचाच भाग समजली जायची, त्यामुळे सुटकेच्या वर्षी ती विकलेली जमीन परत मिळायची. एखाद्या माणसाने तटबंदी असलेल्या शहरातलं आपलं घर विकलं, तर ते एका वर्षाच्या काळात सोडवण्याचा हक्क त्याला होता. पण जर ते घर त्याला एका वर्षात सोडवता आलं नाही तर ते घर विकत घेणाऱ्‍याला कायमचं मिळणार होतं. पण लेव्यांसाठी वेगळा नियम होता. लेव्यांना आपलं विकलेलं घर परत घेण्यासाठी वेळेच बंधन नव्हतं. ते कधीही आपलं घर परत घेऊ शकत होते. आपलं विकलेले घर सोडवण्यासाठी त्यांच्याकडे कायमचा अधिकार होता. कारण लेव्यांना वारश्‍याने कोणतीही जमीन मिळत नव्हती.—लेवी २५:२९-३४.

इन्साइट-२ १२२-१२३

सुटकेचं वर्ष

परमेश्‍वराने दिलेल्या नियमांचं पालन केल्यामुळे इस्राएली लोकांचं भलं झालं. त्यामुळे कोणालाही गरिबीचा सामना करावा लागला नाही. आज अनेक देशांची स्थिती अशी आहे, की तिथले काही लोक खूप श्रीमंत आहेत तर काही अगदीच गरीब! पण सुटकेच्या वर्षाचा नियम पाळल्यामुळे इस्राएली लोकांची अशी स्थिती नव्हती. त्यांच्यामध्ये कोणीही गरीब किंवा बेरोजगार नव्हतं. सगळ्यांकडे काम होतं. ते घेत असलेल्या मेहनतीमुळे आणि यहोवाच्या आशीर्वादांमुळे देशाची आर्थिक स्थिती आणि त्यांचं उत्पन्‍नही चांगलं होतं. देवाच्या नियमांप्रमाणे वागल्यामुळे लोक आनंदी राहायचे. परमेश्‍वराने सांगितल्याप्रमाणे जेव्हा देशाचा कारभार चालवला जायचा तेव्हा सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत चालायचं.—यश ३३:२२.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज१० १/१ १२ ¶४

सूड घेणे उचित आहे का?

एखाद्या इस्राएलीने सहइस्राएलीवर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा डोळा फुटला तर नियमशास्त्रानुसार हल्ला करणाऱ्‍याला तशीच शिक्षा दिली जायची. पण, ज्याच्यावर हल्ला झाला आहे त्या मनुष्याला, कायदा हातात घेण्याची अर्थात हल्ला करणाऱ्‍याला किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही शिक्षा देण्याची परवानगी नव्हती. नियमशास्त्रात सांगितले होते, की न्याय मिळण्यासाठी त्याने ही समस्या, नियुक्‍त करण्यात आलेल्या न्यायाधीशांकडे न्यावी. मुद्दामहून गुन्हा करणाऱ्‍याला किंवा दुसऱ्‍यांवर हल्ला करणाऱ्‍याला तशीच शिक्षा मिळेल ही जाणीवच, इस्राएल लोकांना सूड घेण्यापासून परावृत्त करण्यात प्रभावी ठरली. पण इतकेच यात गोवलेले नव्हते. यात आणखीनही काही गोष्टी होत्या.

१-७ फेब्रुवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | लेवीय २६-२७

“यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवता येतील?”

टेहळणी बुरूज०८ ४/१५ ४ ¶८

‘निरर्थक गोष्टींचा’ अव्हेर करा

८ ‘धन’ कशा प्रकारे देवाचे स्थान घेऊ शकते? हे समजून घेण्यासाठी प्राचीन इस्राएलातील एखाद्या शेतात पडलेल्या दगडाचे उदाहरण घ्या. हा दगड एखाद्या घराच्या अथवा भिंतीच्या बांधकामाकरता उपयोगात आणला जाऊ शकत होता. पण पूजण्यासाठी “स्तंभ” म्हणून किंवा ‘आकृति कोरून’ स्थापन करण्यात आल्यास, तोच दगड यहोवाच्या लोकांना पाप करण्यास प्रवृत्त करू शकत होता. (लेवी. २६:१) त्याच प्रकारे पैसाही जीवनात आवश्‍यक आहे. पैशाशिवाय आपल्याला जीवनावश्‍यक गोष्टी मिळवता येणार नाहीत. शिवाय, यहोवाच्या सेवेकरताही आपण पैशाचा चांगला वापर करू शकतो. (उप. ७:१२; लूक १६:९) पण जर पैसा मिळवण्याकरता आपण आपल्या ख्रिस्ती सेवेचा बळी दिला तर आपण पैशाला देवाचा दर्जा देतो असा त्याचा अर्थ होईल. (१ तीमथ्य ६:९, १० वाचा.) या जगात बहुतेक लोकांना श्रीमंत कसे होता येईल याचाच ध्यास लागला आहे. त्यामुळे ख्रिस्ती या नात्याने आपण याबाबतीत समतोल दृष्टिकोन बाळगत आहोत किंवा नाही, याची आपण खात्री केली पाहिजे.—१ तीम. ६:१७-१९.

इन्साइट-१ २२३ ¶३

गाढ आदर, आदरयुक्‍त भय

यहोवा ज्याप्रकारे मोशेसोबत वागला आणि ज्याप्रकारे त्याचा वापर करून घेतला, त्यामुळे इस्राएली लोकांच्या मनात मोशेबद्दल एक प्रकारची आदरयुक्‍त भीती निर्माण झाली. (अनु ३४:१०, १२; निर्ग १९:९) यहोवानेच मोशेला अधिकार दिला आहे, हे त्यांना माहीत असल्यामुळे ते मोशेच्या अधीन होते. त्यांना याचीही जाणीव होती की यहोवा मोशेद्वारेच त्यांच्याशी बोलत आहे. यहोवाच्या उपासनेच्या मंडपाबद्दलसुद्धा इस्राएली लोकांच्या मनात अशीच आदरयुक्‍त भीती असणं गरजेचं होतं. (लेवी १९:३०; २६:२) म्हणजेच, यहोवाने दिलेल्या सर्व आज्ञांचं पालन करून आणि त्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्याची उपासना करून त्याच्या उपासना मंडपाला आदर दाखवायचा होता.

टेहळणी बुरूज९२ १/१ २० ¶१०

“देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो

१० यहोवाने त्या राष्ट्राला सांगितलेः “तुम्ही माझ्या विधीप्रमाणे चालला आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वर्तला, तर योग्य काळी तुम्हाकरिता मी पर्जन्यवृष्टी करीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील वृक्ष आपापली फळे देतील. मी तुमच्या देशास शांतता [शांती] देईन व तुम्ही निजाल तेव्हा तुम्हास कोणापासून भय प्राप्त होणार नाही. मी देशातून दुष्ट पशू नाहीसे करीन; आणि तुमच्या देशात तरवार चालणार नाही. तुमच्याबरोबर माझा समागम होईल; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल.” (लेवीय २६:३, ४, ६, १२) इस्राएलांना शत्रूंपासून सुरक्षितता, भौतिक समृद्धता, आणि यहोवासोबत जवळचे नातेसंबंध याजद्वारे शांतीचा अनुभव घेता येऊ शकत होता. पण हे सर्व, त्यांनी यहोवाच्या कायद्यांचे पालन करण्यावर अवलंबून होते.—स्तोत्रसंहिता ११९:१६५.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-२ ६१७

आजार

देवाचे नियम मोडल्यामुळे झालेला परिणाम. इस्राएल राष्ट्राला असा इशारा दिला होता, की जर त्यांनी नियमशास्त्रातल्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर त्यांना वेगवेगळ्या ‘आजारांना तोंड द्यावं लागेल’. (लेवी २६:१४-१६, २३-२५; अनु २८:१५, २१, २२) देवाच्या वचनातून कळतं, की चांगलं आरोग्य आणि देवासोबतचं चागलं नातं, हे त्याच्या आशिर्वादांमुळेच शक्य आहे. (अनु ७:१२, १५; स्तो १०३:१-३; नीत ३:१, २, ७, ८; ४:२१, २२; प्रक २१:१-४) पण रोगराई आणि आजारांचं कारण हे पाप आणि अपरिपूर्णता आहे. (निर्ग १५:२६; अनु २८:५८-६१; यश ५३:४, ५; मत्त ९:२-६, १२; योह ५:१४) हे खरं आहे, की यहोवाने काही वेळा, काही लोकांवर त्यांच्या चुकांमुळे आजार किंवा रोग आणले. जसं की मिर्याम, उज्जीया आणि गेहजी यांना देवाने कुष्ठरोगाने पिडीत केलं. (गण १२:१०; २इत २६:१६-२१; २रा ५:२५-२७) पण असं दिसून येतं, की बऱ्‍याच वेळा जेव्हा राष्ट्रांनी आणि लोकांनी पापी जीवनशैली अनुसरली तेव्हा त्याचा परिणाम म्हणून त्यांना आजारांना आणि साथीच्या रोगांना तोंड द्यावं लागलं. थोडक्यात, त्यांनी जे पेरलं होतं, त्याचीच त्यांनी कापणी करावी लागली; त्यांच्या चूकीच्या जीवनशैलीचा त्यांच्या शरिरावर वाईट परिणाम झाला. (गल ६:७, ८) ज्यांनी घृणास्पद लैंगिक अनैतिकतेची कामं केली त्यांच्याविषयी प्रेषित पौल म्हणतो, की त्यांनी “त्यांच्या या वाईट वागणुकीची योग्य शिक्षा” भोगावी म्हणून देवाने “त्यांना त्यांच्या शरीराचा अनादर करण्यासाठी अशुद्धपणाच्या स्वाधीन केलं.”—रोम १:२४-२७.

८-१४ फेब्रुवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना १-२

“यहोवा त्याच्या लोकांना सुव्यवस्थितपणे संघटित करतो”

टेहळणी बुरूज९४ १२/१ ९ ¶४

यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात न्याय्य स्थान

४ इस्राएलांनी अरण्यात ठोकलेल्या डेऱ्‍यांचे तुम्ही विहंगमावलोकन केले असते तर काय पाहिले असते? कदाचित ३० लाख किंवा त्यापेक्षाही अधिक लोकांचे ते विखुरलेले पुष्कळ पण व्यवस्थित डेरे होते. त्यांची विभागणी दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्‍चिमेकडील दिशेत तीन वंशाच्या दलात केली होती. जवळून निरीक्षण केल्यावर, छावणीच्या मध्यभागी असलेल्या डेऱ्‍याजवळ आणखी एक दल देखील तुमच्या दृष्टीस पडले असते. या चार लहान डेऱ्‍यांमध्ये लेवी वंशाची कुटुंबे होती. छावणीच्या अगदी मध्यभागी, कापडाच्या भिंतीने वेगळा केलेला एक भाग अद्वितीय होता. तो भाग, “दर्शनमंडप,” किंवा “निवासमंडप” होता; त्याला यहोवाच्या योजनेनुसार ‘सुबुद्ध हृदयाच्या’ इस्राएल लोकांनी बांधले होते.—गणना १:५२, ५३; २:३, १०, १७, १८, २५; निर्गम ३५:१०.

इन्साइट-१ ३९७ ¶४

छावणी

इस्राएलांची छावणी खूप मोठी होती. त्यांच्या १२ वंशांमध्ये निवडलेल्या पुरूषांचा विचार केला तर त्यांची एकूण संख्या ६,०३,५५० इतकी होती. याशिवाय स्रिया, लहान मुलं, वृद्ध, अपंग, २२,००० लेवी आणि “विदेश्‍यांचा एक मोठा समूह” त्यांच्यासोबत होता. आणि त्यांची एकून संख्या ३०,००,००० किंवा त्याहून जास्त होती. (निर्ग १२:३८, ४४; गण ३:२१-३४, ३९) इतक्या मोठ्या समुहाला छावणी करण्यासाठी नक्कीच खूप मोठा परिसर लागला असेल. जेव्हा यार्देन नदीच्या काठावर मवाबच्या मैदानात इस्राएलांनी तळ ठोकला, तेव्हा त्यांची छावणी “बेथ-यशिमोथपासून आबेल-शिट्टिमपर्यंत” पसरली होती.—गण ३३:४९.

आध्यात्मिक रत्नं

इन्साइट-२ ७६४

नोंदणी

इस्राएली लोकांमध्ये नोंदणी सहसा एखाद्याच्या घराण्याप्रमाणे, कुळाप्रमाणे आणि नावाप्रमाणे केली जायची. फक्‍त लोकांची संख्या मोजण्यासाठी ही नोंदणी केली जात नव्हती. तर बायबलमध्ये ज्या नोंदणीबद्दल सांगितलं आहे त्याचा उद्देश वेगवेगळा होता. जसं की, कर गोळा करण्यासाठी, लष्करी सेवेसाठी किंवा उपासना मंडपात जे लेवी होते त्यांना वेगवेगळी कामं सोपवून देण्यासाठी नोंदणी केली जायची.

१५-२१ फेब्रुवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना ३-४

“लेवी करत असलेली सेवा”

इन्साइट-२ ६८३ ¶३

याजक

नियमशास्त्राच्या करारानुसार. इस्राएली लोक इजिप्तच्या दास्यात असताना, जेव्हा यहोवाने इजिप्तवर दहावी पीडा आणून त्यांच्या सर्व प्रथमपुत्रांना ठार मारलं, तेव्हाच यहोवाने इस्राएलमधल्या सर्व प्रथमपुत्रांना स्वतःसाठी वेगळं केलं. (निर्ग १२:२९; गण ३:१३) म्हणजे इस्राएलांच्या या प्रथमपुत्रांवर यहोवाचा अधिकार होता आणि तो त्यांचा वापर एका खास सेवेसाठी करणार होता. यहोवा खरंतर इस्राएलांच्या या सगळ्या प्रथमपुत्रांना याजक म्हणून सेवा करण्यासाठी किंवा उपासना मंडपाची देखरेख करण्यासाठी वापरू शकला असता. पण, त्याऐवजी त्याने लेवी वंशातल्या पुरुषांना या सेवेसाठी वापरायचं ठरवलं. म्हणून त्याने इस्राएलांच्या १२ वंशाच्या प्रथम पुत्रांऐवजी लेवी वंशातल्या सगळ्या पुरुषांना निवडलं. जेव्हा इस्राएली लोकांची मोजणी केली गेली, तेव्हा असं दिसून आलं की लेवी पुरुषांपेक्षा १२ वंशाच्या पुरुषांची संख्या २७३ ने जास्त होती. म्हणून देवाने त्या प्रत्येक पुरुषाच्या मोबदल्यात खंडणी म्हणून प्रत्येकी पाच शेकेल (अंदाजे ८०० रुपये) इतकी किंमत अहरोन आणि त्याच्या मुलांना द्यायला सांगितली. (गण ३:११-१६, ४०-५१) ही तरतूद करण्याआधीच यहोवाने हे सांगितलं होतं, की त्याने लेवी वंशातून अहरोनाच्या कुटुंबातल्या पुरुषांना याजकाचं काम करण्यासाठी निवडलं आहे.—गण १:१; ३:६-१०.

इन्साइट-२ २४१

लेवी

जबाबदाऱ्‍या. गेर्षोन, कहाथ आणि मरारी या लेवीच्या तीन मुलांपासून लेवी वंश बनला होता. (उत्प ४६:११; १इत ६:१, १६) या तिन्ही वंशांना राहण्यासाठी उपासना मंडपाच्या शेजारीच जागा देण्यात आली होती. कहाथी वंशातल्या अहरोनाच्या कुटुंबाचा तळ उपासना मंडपाच्या समोर म्हणजे पूर्वेकडे होता. तर इतर कहाथी वंशातल्या कुटुंबांचा तळ दक्षिणेकडे होता. गेर्षोनी वंशाचा तळ पश्‍चिमेला आणि मरारी वंशाचा तळ उत्तरेला होता. (गण ३:२३, २९, ३५, ३८) उपासना मंडप हालवायचा असेल तर तो काढणं आणि दुसऱ्‍या ठिकाणी नेऊन पुन्हा उभा करणं, अशी कामं लेवी करायचे. उपासना मंडप दुसरीकडे हालवताना अहरोन आणि त्याची मुलं उपासना मंडपाला विभागणारा पडदा काढून त्याने साक्षपेटी, वेदी आणि इतर पवित्र वस्तू आणि भांडी झाकायचे. आणि मग कहाथी वंशाचे लोक ते वाहून न्यायचे. गेर्षोन वंशाचे लोक उपासना मंडपाच्या आतली व बाहेरची आच्छादनं, भेटमंडपाच्या प्रवेशाचा पडदा, अंगणाचे पडदे आणि पडद्याचे दोर घेऊन जायचे. तसंच, मरारी वंशाचे लोक उपासना मंडपाच्या चौकटी, त्याचे दांडे, त्याचे खांब, त्यांच्या खाच असलेल्या बैठका, खुंट्या आणि त्यांचे दोर या गोष्टींची देखरेख करायचे.—गण १:५०, ५१; ३:२५, २६, ३०, ३१, ३६, ३७; ४:४-३३; ७:५-९.

इन्साइट-२ २४१

लेवी

मोशेच्या काळात वयाच्या ३० साव्या वर्षी लेव्यांना त्यांच्या सर्व जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी नेमलं जायचं. जसं की, उपासना मंडप आणि त्याच्या सर्व वस्तू दुसऱ्‍या ठिकाणी वाहून नेण्याचं काम. (गण ४:४६-४९) पण अशी अवघड कामं सोडली, तर काही कामं त्यांना २५ व्या वयापासूनच करता येत होती. (गण ८:२४) दावीद राजाच्या काळात मग ही वयोमर्यादा कमी करून २० करण्यात आली. कारण आता त्यांना उपासना मंडप (ज्याचं आता मंदिर बनलं होतं) दुसरीकडे वाहून नेण्याची गरज नव्हती. अशा प्रकारे लेवी म्हणून जी सेवा करायचे त्यांची जबाबदारी वयाच्या ५० व्या वर्षी संपायची. (गण ८:२५, २६; १इत २३:२४-२६) लेव्यांना नियमशास्त्राची चांगली समज असणं गरजेचं होतं. कारण बऱ्‍याच वेळा त्यांना इतर इस्राएली लोकांसमोर नियमशास्त्राचं वाचन करावं लागायचं आणि त्यातून शिकवावं लागायचं.—१इत १५:२७; २इत ५:१२; १७:७-९; नहे ८:७-९.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०६ ८/१ २४ ¶१३

सुज्ञ व्हा—देवाची भीती बाळगा

१३ संकटकाळी यहोवाचे साहाय्य अनुभवल्यामुळे दाविदाचे देवाबद्दलचे भय आणखी गहिरे झाले आणि त्याच्यावरील त्याचा भरवसा आणखी पक्का झाला. (स्तोत्र ३१:२२-२४) परंतु, तीन प्रसंगी दाविदाच्या मनातून देवाबद्दलचे भय नाहीसे झाले, ज्याचे परिणाम दुःखद घडले; या तिन्ही प्रसंगांची आपण दखल घेणे महत्त्वाचे आहे. पहिला प्रसंग, तो जेव्हा जेरुसलेमहून यहोवाचा कोश आणायची व्यवस्था करत होता तेव्हाचा आहे. देवाच्या नियमशास्त्रात म्हटले होते, की यहोवाचा कोश लेव्यांनी आपल्या खांद्यावर वाहून न्यावा. परंतु दावीद तो एका गाडीत ठेवून आणू इच्छित होता. गाडी हाकणाऱ्‍या उज्जाने जेव्हा तो कोश खाली पडण्यापासून त्याला रोखले, तेव्हा त्याने उद्धटपणे केलेल्या “चुकीमुळे” तो जागीच मरण पावला. होय, उज्जाने घोर पाप केले होते; पण हे सर्व दाविदामुळेच घडले होते. कारण दाविदाने देवाच्या नियमशास्त्राबद्दल योग्य आदर दाखवला नव्हता. देवाचे भय बाळगणे म्हणजे देवाच्या पद्धतीनुसार कार्य करणे.—२ शमुवेल ६:२-९; गणना ४:१५; ७:९.

२२-२८ फेब्रुवारी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना ५-६

“तुमच्यात नाझीर लोकांसारखी मनोवृत्ती आहे का?”

टेहळणी बुरूज०४ ८/१ २४-२५ ¶७

गणना पुस्तकातील ठळक मुद्दे

६:१-७. नाझीरांना द्राक्षारसापासून बनवलेले पदार्थ आणि नशा आणणारी सर्व पेये वर्ज्य करायची होती; यासाठी त्यांना आत्म-त्याग करावयाचा होता. स्त्रियांना जसे त्यांच्या पतीच्या किंवा पित्याच्या आज्ञेत राहायचे होते तसे नाझीरांनाही आपण यहोवाच्या अधीन आहोत हे दाखवण्यासाठी आपले केस वाढू द्यायचे होते. त्यांना कोणत्याही मृत शरीरापासून, मग ते त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे असले तरी त्यापासून दूर राहून शुद्ध राहायचे होते. आज पूर्ण वेळेच्या सेवकांना आत्म-त्याग दाखवावा लागतो आणि यहोवा व त्याच्या व्यवस्थेला अधीनता दाखवावी लागते तेव्हा ते अशीच आत्म-बलिदानाची मनोवृत्ती दाखवतात. काही नेमणूकांमध्ये त्यांना एखाद्या दूर देशांत जावे लागते; यामुळे त्यांच्या जवळच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी येणे देखील कठीण असते किंवा अशक्य असते.

आध्यात्मिक रत्नं

टेहळणी बुरूज०५ १/१५ ३० ¶२

वाचकांचे प्रश्‍न

पण शमशोन हा एका वेगळ्या अर्थाने नाझीर होता. शमशोनाच्या जन्माआधी यहोवाच्या दूताने त्याच्या आईला असे सांगितले: “तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल. आणि इस्राएलास पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.” (शास्ते १३:५) शमशोनाने स्वतः नाझीरपणाचा नवस केला नव्हता. त्याला देवानेच नाझीर नेमले होते आणि त्याचे नाझीरपण आजीवन असणार होते. तेव्हा, त्याच्या बाबतीत प्रेताला स्पर्श करण्याची अट बंधनकारक नव्हती. जर असती, तर मग आकस्मिक रीत्या प्रेताला स्पर्श केल्यावर तो पुन्हा एकदा आजीवन नाझीरपणाचा नवस कसा सुरू करू शकत होता? कारण त्याचा नवस तर त्याच्या जन्माच्या वेळी सुरू झाला होता. त्याअर्थी, आजीवन नाझीर असणाऱ्‍यांकरता असलेल्या अटी स्वेच्छेने नाझीराचा नवस करणाऱ्‍यांकरता असलेल्या अटींपेक्षा वेगळ्या असाव्यात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा