देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम २५-२६
निवासमंडपातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू
इस्राएली लोकांच्या छावणीतली आणि निवासमंडपातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे साक्षीचा कोश. या कोशावर असलेल्या प्रायश्चित्ताच्या झाकणावर (दयासनावर) दोन करूब होते. या दोन करूबांच्या मधोमध देवाच्या उपस्थितीला सूचित करणारा ढग असायचा. दर वर्षी प्रायश्चित्ताच्या दिवशी, महायाजक परमपवित्र स्थानात जायचा. तिथे तो इस्राएलच्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी एका गोऱ्ह्याचं आणि बकऱ्याचं रक्त त्या झाकणासमोर शिंपडायचा. (लेवी १६:१४, १५) ही गोष्ट याला सूचित करत होती, की भविष्यात, श्रेष्ठ महायाजक येशूसुद्धा स्वर्गात जाऊन, थेट यहोवासमोर आपल्या खंडणी बलिदानाचं मूल्य त्याला अर्पण करेल.—इब्री ९:२४-२६.
पुढे दिलेली वचनं आणि खंडणीमुळे आपल्याला मिळणारे आशीर्वाद यांच्या जोड्या लावा:
वचनं
आशीर्वाद
सर्वकाळ जगण्याची आशा
पापांची क्षमा
शुद्ध विवेक
हे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?