ख्रिस्ती जीवन
डोळ्यासमोर संपूर्ण चित्र उभं करण्याचा प्रयत्न करा
बायबलचे अहवाल वाचत असताना, डोळ्यासमोर संपूर्ण चित्र उभं करण्याचा प्रयत्न करा. एकंदर परिस्थिती काय आहे, त्यात कोणकोणती पात्रं आहेत, आणि ठरावीक गोष्टी त्यांनी का केल्या असतील, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. अहवाल वाचताना, तेव्हाचं दृश्य कसं असेल, आजूबाजूला कोणते आवाज असतील, तेव्हाच्या वातावरणाचा गंध कसा असेल किंवा त्यातल्या पात्रांच्या भावना काय असतील यांचा अंदाज घेण्यासाठी तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करा.
तुमच्या बायबल वाचनाचा दर्जा वाढवा—निवडक भाग हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
योसेफ आणि त्याच्या भावांमध्ये तणाव निर्माण होण्याची काय कारणं असू शकतात?
योसेफच्या भावांच्या तापट स्वभावाची काय कारणं असू शकतात?
बायबलमधून याकोबबद्दल आपल्याला कोणत्या गोष्टी समजतात?
जेव्हा आपल्या आणि इतरांच्या विचारात फरक असतो, तेव्हा शांती कशी टिकवून ठेवता येईल, याबद्दल याकोबने आपल्या मुलांना कशा प्रकारे एक सुंदर धडा दिला?
या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा झाला आहे?