देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ४०-४१
यहोवा योसेफची सुटका करतो
यहोवाने योसेफची सुटका केली. पण त्याआधी त्याला जवळपास १३ वर्षं एक गुलाम आणि एक कैदी म्हणून आयुष्य काढावं लागलं. या गोष्टीमुळे निराश होण्याऐवजी, योसेफने या संबंध काळाचा उपयोग, स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी केला. (स्तो १०५:१७-१९) यहोवा आपल्याला विसरलेला नाही, ही गोष्ट त्याला माहीत होती. मग या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी योसेफने काय केलं?
त्याने प्रत्येक कामात मेहनत घेतली आणि विश्वासू असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला.—उत्प ३९:२१, २२
ज्यांनी आपल्याला चुकीची वागणूक दिली आहे, त्यांचा बदला घेण्याऐवजी त्याने लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला.—उत्प ४०:५-७
मला माझ्या समस्यांना तोंड देण्यासाठी योसेफच्या उदाहरणामुळे कशी मदत होऊ शकते?
हर्मगिदोनात यहोवा माझा बचाव करेल, पण सध्या मी माझ्या परिस्थितीचा चांगला फायदा कसा करून घेऊ शकतो?