देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति १२-१४
एक असा करार ज्याचा तुमच्यावरही परिणाम होतो
यहोवाने अब्राहामसोबत एक करार केला. त्यामुळे येशू आणि त्याच्या सहराजांना स्वर्गातून राज्य करण्याचा एक कायदेशीर आधार मिळाला
इ.स.पू. १९४३ मध्ये जेव्हा अब्राहामने कनान देशात जात असताना फरात नदी पार केली तेव्हा हा करार अंमलात आल्याचं दिसून येतं
जोपर्यंत मसीही राज्य देवाच्या शत्रूंचा नाश करून पृथ्वीवरच्या सर्व कुटुंबांना आशीर्वादित करत नाही, तोपर्यंत अब्राहामचा करार अस्तित्वात असेल
अब्राहामच्या भक्कम विश्वासामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिले. जर आपणही यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास दाखवला तर अब्राहामच्या करारामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?