ख्रिस्ती जीवन
देवाची उपासना की शारीरिक प्रशिक्षण?
शारीरिक प्रशिक्षण खरंच फायद्याचं आहे का? हो आहे; पण आध्यात्मिक प्रशिक्षणाएवढं नाही. (१ती ४:८) म्हणूनच ख्रिस्ती बंधुभगिनी खेळांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करतात.
खेळांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा हे बोर्डवरचं कार्टून पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
१. खेळांमुळे आपण कोणती काही कौशल्यं शिकू शकतो?
२. एखादा खेळ आपल्यासाठी चांगला आहे की नाही हे कोणत्या तीन गोष्टींवर अवलंबून आहे?
३. कोणते खेळ पाहावेत आणि खेळावेत हे ठरवण्यासाठी स्तोत्र ११:५ आपल्याला कशी मदत करतं?
४. फिलिप्पैकर २:३ आणि नीतिसूत्रे १६:१८ नुसार खेळ खेळताना आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?
५. एखादा खेळ पाहण्यात किंवा खेळण्यात आपण किती वेळ घालवावा यासाठी फिलिप्पैकर १:१० हे वचन आपल्याला कशी मदत करतं?