देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ करिंथकर ४-६
“आम्ही धैर्य सोडत नाही”
एका मोडकळीला आलेल्या अपार्टमेंटमध्ये दोन कुटुंबं राहत आहेत अशी कल्पना करा. साहजिकच त्यातल्या एका कुटुंबाला काहीच आशा नसल्यासारखं दिसत आहे. पण विचित्र गोष्ट म्हणजे त्याच वेळी दुसरं कुटुंब मात्र खूप सुखाने राहत आहे. कसं काय? कारण लवकरच ते कुटुंब एका सुंदर नवीन घरात राहायला जाणार आहे.
“सर्व सृष्टी आजपर्यंत कण्हत व दु:ख सोसत” असल्याचं आपण पाहिलं आहे. पण देवाचे सेवक मात्र त्यांच्याकडे असलेल्या आशेमुळे अशा परिस्थितीतही तग धरून आहेत. (रोम ८:२२) आज आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि कित्येक दशकं आपण अशा संकटांना सहन करत आलो आहोत. पण एक गोष्ट आपल्याला माहीत आहे. ती म्हणजे देवाच्या नवीन जगात अनुभवायला मिळणाऱ्या अनंतकाळच्या जीवनाचा विचार केला, तर ही संकटं केवळ “तात्पुरती व हलकी” आहेत. देवाच्या राज्यामुळे मिळणारे आशीर्वाद जर आपण आपल्या डोळ्यांसमोर ठेवले, तर अशा संकटांमध्येही टिकून राहण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आपल्याला मदत होईल.