ख्रिस्ती जीवन
देवाकडून मिळणारं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत राहा
हे का महत्त्वाचं आहे: आपला महान शिक्षक असणाऱ्या, यहोवाने आपल्यासाठी सर्वात उत्तम अशा प्रशिक्षणाची सोय केली आहे. आपलं जीवन आणखी जास्त अर्थपूर्ण कसं बनवायचं ते तो आपल्याला शिकवतो आणि एका सुंदर भविष्यासाठी आत्तापासूनच आपल्याला तयार करतो. आणि तेही मोफत! (यश ११:६-९; ३०:२०, २१; प्रक २२:१७) त्याने दिलेल्या शिक्षणाद्वारे तो जीवन वाचवणारा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठीसुद्धा आपल्याला तयार करतो.—२कर ३:५.
हे कसं करता येईल:
स्वतःमध्ये नम्रतेचा गुण विकसित करण्याद्वारे.—स्तो २५:८, ९
आठवड्यादरम्यानच्या सभेत मिळणाऱ्या विद्यार्थी भागांच्या नेमणुकांसारखं जे काही प्रशिक्षण सध्या घेणं तुम्हाला शक्य असेल, ते घेण्याचा प्रयत्न करण्याद्वारे
स्वतःसाठी काही ठरावीक आध्यात्मिक ध्येयं निश्चित करण्याद्वारे.—फिलि ३:१३
पुढे मिळणारं प्रशिक्षण घेता यावं म्हणून स्वतःला तयार ठेवण्यासाठी वेगवेगळे त्याग करण्याद्वारे.—फिलि ३:८
यहोवाच्या शिक्षणाने आध्यात्मिक समृद्धी मिळालेले लोक हा व्हिडिओ पाहा, आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
सुवार्तिकांच्या प्रशालेत प्रवेश मिळवण्यासाठी काही प्रचारकांना कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागली आहे?
सुवार्तिकांसाठी असणाऱ्या प्रशालेमुळे प्रचारकांना कोणते फायदे झाले आहेत?
या प्रशालेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन नेमणुकीसाठी मंडळीतल्या लोकांनी कशी मदत केली आहे?
सुवार्तिकांच्या प्रशालेत प्रवेश घेण्यासाठी कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात? (राज किताब पृ. १८९)
तुम्ही यहोवाच्या संघटनेत आणखी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण घेऊ शकता?
यहोवाकडून मिळणारं प्रशिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळतील?