देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये २३-२४
एक पीडा असल्याचा आणि विद्रोह करण्यासाठी चिथवण्याचा आरोप
यरुशलेममधल्या यहुद्यांनी पौलला ठार मारण्याची “शपथ” घेतली होती. (प्रेका २३:१२) पण खरंतर, पौलने रोमला जावं आणि तिथेही साक्ष द्यावी ही यहोवाचीच इच्छा होती. (प्रेका २३:११) यहुद्यांनी रचलेल्या या कटाबद्दल जेव्हा पौलच्या भाच्याला कळलं तेव्हा या गोष्टीबद्दल त्याने पौलला सांगून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. (प्रेका २३:१६) मग या अहवालातून तुम्हाला पुढील मुद्द्यांबद्दल काय शिकायला मिळतं?
यहोवाच्या उद्देशामध्ये कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतं त्याबद्दल:
आपल्याला मदत करण्यासाठी देव ज्या गोष्टींचा वापर करतो त्याबद्दल:
धैर्य दाखवण्याबद्दल: