वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जून पृ. ७
  • सोशल नेटवर्किंगचे धोके टाळा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सोशल नेटवर्किंगचे धोके टाळा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचे ऑनलाईन मित्र कोण आहेत?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • सोशल मिडियाचा तरुणांवर परिणाम—जगभरात चिंतेचा विषय
    आणखी विषय
  • आपण स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नये
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या मैत्रीवर
    सावध राहा!—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जून पृ. ७

ख्रिस्ती जीवन

सोशल नेटवर्किंगचे धोके टाळा

दगडांपासून भाकरी बनवायला येशू नकार देतो

हे का महत्त्वाचं: सोशल नेटवर्किंग इतर कोणत्याही साधनांसारखं मदतीचं किंवा धोक्याचं ठरू शकतं. काही ख्रिश्‍चनांनी सोशल नेटवर्किंगचा वापर न करण्याचं ठरवलं आहे. तर इतर काही ख्रिश्‍चनांनी, नातेवाइकांच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करण्याचं ठरवलं आहे. आपण सोशल नेटवर्किंगचा वापर सुज्ञपणे करू नये अशी सैतानाची इच्छा आहे. आणि आपण जर सैतानाच्या इच्छेनुसार केलं तर आपलं नाव खराब होऊ शकतं आणि यहोवासोबतचं आपलं नातंही बिघडू शकतं. येशूने देवाच्या वचनांत दिलेल्या तत्त्वांचा वापर धोके ओळखून ते टाळण्यासाठी केला. आपणही सोशल नेटवर्किंग वापरण्याच्या बाबतीत बायबलची तत्त्वं लक्षात घेऊ शकतो.—लूक ४:४, ८, १२.

कोणते धोके टाळावेत:

  • सोशल मिडियात पूर्णपणे गुंतून जाणं. सोशल नेटवर्क किंवा सोशल मिडिया यांवर तास न्‌ तास घालवण्याद्वारे आपण यहोवाच्या सेवेसाठी असलेला आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो

    बायबलची तत्त्वं: इफि ५:१५, १६; फिलि १:१०

  • ख्रिश्‍चनांसाठी अयोग्य असलेल्या गोष्टी पाहणं. उत्तेजक चित्रं पाहिल्याने एका व्यक्‍तीला पोर्नोग्राफी बघण्याचं व्यसन लागू शकतं किंवा त्याच्याकडून अनैतिक कार्यही घडू शकतं. धर्मत्यागी साहित्य किंवा ब्लॉग वाचल्याने एका व्यक्‍तीच्या विश्‍वासाला तडा जाऊ शकतो

    बायबलची तत्त्वं: मत्त ५:२८; फिलि ४:८

  • अनुचित प्रतिक्रिया किंवा फोटो पोस्ट करणं. आपलं हृदय कपटी असल्यामुळे आपल्याला कदाचित अनुचित प्रतिक्रिया किंवा फोटो पोस्ट करण्याची इच्छा होऊ शकते. पण असं केल्यामुळे एखाद्याचं नाव खराब होऊ शकतं किंवा त्याचा विश्‍वास कमकुवत होऊ शकतो

    बायबलची तत्त्वं: रोम १४:१३; इफि ४:२९

सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या परिस्थिती कशा टाळता येतील त्यावर चर्चा करा:

सोशल मिडियाचा वापर करणाऱ्‍या एक चोराला माहीत आहे की घरमालक सुट्टीवर गेला आहे
मुलाखत घेताना मालक पोस्ट केलेले अनुचित फोटो पाहताना
सोशल नेटवर्किंगमुळे चुकीची भाषा आपल्या कानावर पडू शकते
रात्री उशिरापर्यंत सोशल मिडियाचा वापर करणाऱ्‍या व्यक्‍तीला सकाळी उठायला त्रास होतो
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा