Thai Liang Lim/E+ via Getty Images
जागे राहा!
सोशल मिडियाचा तरुणांवर परिणाम—जगभरात चिंतेचा विषय
२०२५ या वर्षात, जगभरातल्या सरकारांनी सोशल मिडियामुळे तरुणांवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. एका देशाने तर १६ वर्षांखालच्या मुलांना सोशल मिडिया वापरण्यावर बंदी घातली आहे. तसंच, इतर देशही अशी पावलं उचलण्याचा विचार करत आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही तरुणही हे मान्य करतात, की सोशल मिडियामुळे नुकसान होऊ शकतं. एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेतल्या प्यू रिसर्च सेंटरने एक सर्वे केला. त्यात त्यांनी सांगितलं: “१३-१७ वयोगटांतले अर्धेनिम्मे तरुण म्हणतात, की सोशल मिडियामुळे त्यांच्या वयाच्या मुलांवर बऱ्याचदा वाईट परिणाम होतो.”
आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सोशल मिडियामुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामांबद्दल इशारा दिला होता. मागच्या वर्षी अमेरिकेचे सर्जन जनरल असलेले डॉ. विवेक मूर्थी यांनी असं म्हटलं: “लहान मुलांचं मानसिक आरोग्य बिघडण्याची समस्या वाढत चालली आहे. आणि आम्हाला असं दिसून आलंय, की याचं मुख्य कारण सोशल मिडिया आहे.”
आईवडील सोशल मिडियाच्या धोक्यांपासून आपल्या मुलांचं संरक्षण कसं करू शकतात? याबद्दल बायबलमध्ये व्यावहारिक सल्ला मिळतो.
आईवडील काय करू शकतात?
या बायबल तत्त्वांचा विचार करा.
“शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.”—नीतिवचनं १४:१५.
सोशल मिडियाच्या वापरामुळे वाईट परिणाम होऊ शकतो. हे खरं असलं तरी असा विचार करू नका, की मुलांना ते कधीच वापरू द्यायचं नाही. पण मुलांना सोशल मिडियाचा वापर करू देण्याआधी तुम्ही काही गोष्टींची खातरी करू शकता. जसं की, सोशल मिडिया किती वेळ वापरायचं याबद्दल तुम्ही घालून दिलेले नियम मुलं पाळत आहेत, ते त्यावर चांगल्याच गोष्टी पाहत आहेत आणि इतरांसोबत चांगली मैत्री टिकवून ठेवत आहेत.
जास्त माहितीसाठी, “माझ्या मुलाने सोशल मिडिया वापरावं का?” हा इंग्रजीतला आणि “अपने नौजवान बच्चे को सोशल मीडिया सही तरीके से इस्तेमाल करना कैसे सिखाऊँ?” हा लेख वाचा.
“वेळेचा चांगला उपयोग करा.”—इफिसकर ५:१६.
तुम्ही तुमच्या मुलांना सोशल मिडिया वापरू देत असाल, तर ते कसं वापरायचं याबद्दल त्यांना नियम घालून द्या. आणि ते त्यांच्या फायद्याचे कसे आहेत हे त्यांना समजावून सांगा. तुमच्या मुलांच्या वागण्यात काही बदल दिसून येत असतील, तर कदाचित सोशल मिडियाच्या त्यांच्या वापरावर तुम्हाला काही बंधनं घालावी लागतील.
सोशल मिडिया वापरताना काही बंधनं असणं का फायद्याचं आहे हे मुलांना समजावून सांगण्यासाठी सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा हे बोर्डवरचं कार्टून वापरा.
आईवडील काय करू शकतात याबद्दल बायबल आधारित आणखी मार्गदर्शनासाठी “सोशल मिडियाचा तरुणांवर होणाऱ्या परिणामांबद्दल आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ इशारा देतात—बायबल काय म्हणत?” हा इंग्रजीतला लेख पाहा.
जास्त माहितीसाठी
बायबल म्हणतं, की आज आपण ‘खूप कठीण काळात’ जगतोय. (२ तीमथ्य ३:१-५) असं असलं तरी, त्यातल्या व्यावहारिक सल्ल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. “नौजवानों में बढ़ती मायूसी और निराशा—इस बारे में पवित्र शास्त्र में क्या लिखा है?” या लेखात बायबलवर आधारित आणखी २० लेखांची यादी सापडेल. या लेखांमुळे आईवडिलांना आणि मुलांना मदत होऊ शकते.