वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑक्टोबर पृ. ३
  • वैयक्‍तिक बायबल अभ्यास करण्यात मेहनत घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वैयक्‍तिक बायबल अभ्यास करण्यात मेहनत घ्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या वचनात आनंद मिळविणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • खोलवर अभ्यास करून सावध राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • यहोवाची सेवा नेहमी करत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑक्टोबर पृ. ३

ख्रिस्ती जीवन

वैयक्‍तिक बायबल अभ्यास करण्यात मेहनत घ्या

दानीएलवर परीक्षा आल्या तेव्हा तो यहोवाला विश्‍वासू राहिला. तुम्हालादेखील त्याच्यासारखं विश्‍वासू राहायचं आहे का? दानीएल देवाच्या वचनांचा आणि त्यातल्या कठीण भविष्यवाण्यांचा अभ्यास करण्यासाठी खूप मेहनत घ्यायचा. (दान ९:२) बायबलचा अभ्यास करण्यात मेहनत घेतल्यामुळे तुम्हालाही विश्‍वासू राहायला मदत होईल. कारण असं केल्यामुळे देवाने दिलेली अभिवचनं नक्की पूर्ण होणार यावर तुमचा विश्‍वास वाढेल. (यहो २३:१४) यासोबतच देवावर असलेलं तुमचं प्रेम आणखीन वाढेल. आणि तुम्हाला योग्य ते करण्याची प्रेरणा मिळेल. (स्तो ९७:१०) पण मग प्रश्‍न येतो, की सुरुवात कशी करावी? पुढे काही सल्ले दिले आहेत. त्यांवर विचार करा.

दानीएल देवाच्या वचनाचा अभ्यास करताना
  • अभ्यासासाठी कोणते विषय निवडावेत? एका चांगल्या अभ्यासाच्या नित्यक्रमात मंडळीतल्या सभांची तयारी करणं सामील आहे. आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यातले काही मुद्दे तुम्हाला समजले नसतील, तर ते समजून घेण्यासाठी तुम्ही वेळ काढून संशोधन करू शकता. त्यासोबतच, तुम्ही आणखीन काही विषयांवरसुद्धा अभ्यास करू शकता. काही जणांनी अभ्यासासाठी बायबलमधल्या भविष्यवाण्या, पवित्र आत्म्याच्या फळाचे वेगवेगळे पैलू, प्रेषित पौलने केलेले मिशनरी दौरे किंवा यहोवाने बनवलेली सृष्टी हे विषय निवडले आहेत. समजा तुम्हाला दिवसभरात बायबल संबंधित एखादा प्रश्‍न पडला, तर तो तुम्ही लिहून ठेवू शकता. आणि मग पुढच्या अभ्यासाच्या वेळी त्या प्रश्‍नाचं उत्तर शोधू शकता.

  • मला माहिती कुठून मिळेल? आध्यात्मिक खजिना शोधण्यासाठी संशोधनाची साधनं या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पर्याय मिळतील. एक उदाहरण घेऊ या: दानीएल अध्याय ७ मध्ये दिलेले पशू कोणकोणत्या जागतिक महासत्तांना दर्शवतात त्यावर संशोधन करून पाहा.

  • अभ्यासासाठी मी किती वेळ दिला पाहिजे? आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. गरज असल्यास, सुरुवातीला तुम्ही अभ्यासाची वेळ कमी ठेवू शकता आणि मग हळूहळू वेळ वाढवू शकता. देवाच्या वचनांचा अभ्यास करणं, हे लपवलेलं धन शोधण्यासाठी केलेल्या खोदकामासारखं आहे. जितकं जास्त तुम्हाला धन सापडेल, तितकं जास्त तुम्हाला आणखीन खोदकाम करावंसं वाटेल! (नीत २:३-६) असं केल्यामुळे देवाच्या वचनाबद्दल तुमचं प्रेम वाढेल आणि नियमितपणे बायबल वाचन करणं हा तुमच्या नित्यक्रमाचा भाग बनेल.—१पेत्र २:२.

    वैयक्‍तिक अभ्यास आनंददायक बनवण्यासाठी, १ ऑक्टोबर २००० च्या टेहळणी बुरूज अंकात पृ. १३-१७ पाहा.

दानीएल अध्याय ७ मध्ये दिलेले पशू कशाला सूचित करतात?

  • गरूडासारखे पंख असलेला सिंहासारखा जंगली पशू

    दान ७:४

  • तोंडात तीन बरगड्या असलेला अस्वलासारखा जंगली पशू

    दान ७:५

  • चार डोकी आणि पाठीवर चार पंख असलेला चित्त्यासारखा जंगली पशू

    दान ७:६

  • मोठे लोखंडी दात व दहा शिंगे असलेला भयानक पशू

    दान ७:७

अतिरिक्‍त प्रश्‍न:

दानीएल ७:८, २४ या वचनांची पूर्णता कशी झाली?

दहा शिंगांमधून एक लहानसे शिंग येते; त्या लहान शिंगाला डोळे आणि तोंड असतं आणि ते तीन शिंगांना उपटून टाकतं

पुढच्या अभ्यासाचा विषय:

प्रकटीकरण अध्याय १३ मध्ये दिलेले पशू कशाला सूचित करतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा