देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल १–५
देवाचा संदेश सांगण्यात यहेज्केलला आनंद मिळाला
यहोवाने यहेज्केलला एका दृष्टांतात गुंडाळी दिली आणि त्याला ती खायला सांगितली. याचा काय अर्थ होता?
यहेज्केलला देवाचा संदेश पूर्णपणे समजून घ्यायचा होता. त्या गुंडाळीतल्या शब्दांवर मनन केल्यामुळे यहेज्केलच्या मनावर, भावनांवर खोलवर परिणाम होणार होता. त्यामुळे इतरांना तो संदेश सांगण्यासाठी त्याला प्रेरणा मिळणार होती
यहेज्केलने आपल्या कामगिरीविषयी योग्य मनोवृत्ती दाखवली म्हणून त्याला ती गुंडाळी गोड लागली