देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ४४-४८
मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागू नको
बारूख हा शिकलेला असून कदाचित राजदरबारात एक अधिकारी असावा. तो यहोवाचा एक उपासक होता आणि विश्वासूपणे यिर्मयाला साहाय्य करायचा. असं असलं तरी एक वेळ अशी आली, जेव्हा आध्यात्मिक गोष्टींपासून तो दूर जाऊ लागला. तो मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागला. या कदाचित राजदरबारातील आणखी काही अधिकार किंवा मग भौतिक गोष्टी असू शकतात. पण, यरुशलेमवर येणाऱ्या नाशापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्याला आपली विचारसरणी सुधारण्याची गरज होती.