देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ३९-४३
यहोवा प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल
बॅबिलॉनला शरण जाण्याविषयी यहोवाने जे मार्गदर्शन दिलं होतं, त्याचं सिद्कीया राजाने पालन केलं नाही
सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यांपुढे जिवे मारण्यात आलं. नंतर त्याचे डोळे फोडण्यात आले आणि त्याला बेड्यांमध्ये जखडण्यात आलं. तसंच, त्याला मृत्यूपर्यंत बॅबिलॉनच्या तुरुंगात ठेवण्यात आलं
एबद-मलेखने यहोवावर विश्वास दाखवला आणि त्याचा संदेष्टा यिर्मया यावर दया दाखवली
यहुदाचा नाश होईल तेव्हा एबद-मलेखला वाचवलं जाईल, असं यहोवाने अभिवचन दिलं
यरुशलेमचा नाश होण्याआधी बऱ्याच वर्षांपर्यंत यिर्मयाने त्याविषयी धैर्याने लोकांना सांगितलं
यरुशलेमला वेढा घालण्यात आला तेव्हा यहोवाने यिर्मयाचं संरक्षण केलं आणि बॅबिलॉनच्या लोकांच्या हातून त्याची सुटका होईल अशी व्यवस्था केली