फेब्रुवारी—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ
६-१२ फेब्रुवारी
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यशया ५०:१) “परमेश्वर म्हणतो, तुमच्या आईस मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्यास तुम्हाला विकले तो माझा सावकार कोणता? पाहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमचा विक्रय झाला; तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईस सोडावे लागले.”
इन्साईट-१ पृ. ६४३ परि. ४-५
घटस्फोट
लाक्षणिक घटस्फोट. देवाच्या वचनात लग्नाच्या नात्याचा लाक्षणिक रीतीने उल्लेख केला जातो. (यश. ५४:१, ५, ६; ६२:१-६) त्याच रीतीने घटस्फोटाचा किंवा पत्नीला परत पाठवण्याचा लाक्षणिक रीतीने उल्लेख केला जातो.—यिर्म. ३:८.
इ.स.पू ६०७ मध्ये यहूदा राष्ट्राचा पराभव आणि जेरूसलेमचा नाश करण्यात आला. तिथं राहणाऱ्यांना बंदी म्हणून बॅबिलॉनमध्ये नेण्यात आलं. बंदीवासात असलेल्या यहूद्यांना अनेक वर्षांआधी, यहोवाने भविष्यवाणीच्या स्वरूपात विचारलं होतं: “तुमच्या आईस मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे?” (यश. ५०:१) त्यांची आई म्हणजे यहूदा राष्ट्राचा नाश झाला ते योग्यच होतं. यहोवाने त्याचा करार मोडला किंवा घटस्फोटाची कार्यवाही सुरू केली म्हणून नव्हे, तर यहूदा राष्ट्राने न्यायाचा करार मोडल्यामुळे त्याचा नाश झाला होता. पण उरलेल्या इस्राएली लोकांनी पश्चात्ताप केला. त्यांना त्यांच्या देशात परत जाता यावं आणि यहोवाने त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार करावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यहोवाने आपल्या नावासाठी, ७० वर्षांच्या बंदीनंतर, इ.स.पू ५३७ मध्ये, आधीच अभिवचन दिल्याप्रमाणे त्याच्या लोकांचं पुन्हा त्यांच्या देशात पुनर्वसन केलं.—स्तो. १३७:१-९.
१३-१९ फेब्रुवारी
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यशया ५४:१) “मूल न झालेल्या वंध्ये, आनंदाने गजर कर; ज्या तुला प्रसूतिवेदना माहीत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार; कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेलीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो.”
टेहळणी बुरूज०६-E ३/१५ पृ. ११ परि. २
“एक लाक्षणिक नाटक” जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे
“मुक्त स्त्री” सारा आणि तिचा मुलगा इसहाक कोणाला सूचीत करतात? पौलाने म्हटलं की “वंध्य स्त्री” सारा यहोवाच्या स्वर्गीय संघटनेला म्हणजे त्याच्या पत्नीला सूचीत करते. येशू पृथ्वीवर येण्याआधी ही स्वर्गीय स्त्री वंध्य होती म्हणजे तिला या पृथ्वीवर कोणतीच अभिषिक्त “मुलं” नव्हती. (गलतीकर ४:२७; यशया ५४:१-६) पण सा.यु. ३३ मध्ये काही स्त्री-पुरुषांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला आणि अशा प्रकारे या स्वर्गीय स्त्रीला मुलं उत्पन्न झाली. या स्वर्गीय संघटनेच्या मुलांना, नवीन करारनुसार देवाची मुलं म्हणून दत्तक घेण्यात आलं आणि ती येशू ख्रिस्तासोबत सहवारस झाली. (रोमकर ८:१५-१७) त्या मुलांपैकी एक म्हणजे प्रेषित पौल याने लिहिलं: “वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.”—गलतीकर ४:२६.