वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. ७
  • खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा
    बायबल नेमके काय शिकवते?
  • दुःखित असलो तरी आपण आशेविना नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांना आपण पुन्हा भेटू!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • पुनरुत्थानाची आशा तुम्हाला मोलाची वाटते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. ७

ख्रिस्ती जीवन

खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य

मरण पावलेल्या एका स्त्रीभोवती तिचं कुटुंब आणि मित्रजन शोक करत आहेत; तिच्या बहिणीला भविष्यात होणाऱ्‍या पुनरुत्थानाच्या आशेवर मनन केल्यामुळं सांत्वन मिळतं

येशूच्या मृत्यूचा स्मारकविधीचा काळ हा, त्यानं दिलेल्या खंडणीमुळं भविष्यात आपल्याला मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर मनन करण्यासाठी उत्तम काळ आहे. आणि पुनरुत्थानाची आशा ही या आशीर्वादांपैकी एक आहे. मानवांनी मरावं, अशी यहोवाची कधीच इच्छा नव्हती. त्यामुळंच प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळं होणारं दुःख हे मानवांना सहन करावं लागत असलेलं सर्वात मोठं दुःख आहे. (१करिं १५:२६) लाजरच्या मृत्यूमुळं शिष्यांना झालेलं दुःख पाहून येशूलासुद्धा अतिशय वाईट वाटलं. (योहा ११:३३-३५) कारण येशू, त्याचा पिता यहोवा याचं हुबेहूब प्रतिबिंब आहे. प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळं आपल्याला होणारं दुःख हे यहोवालादेखील जाणवतं. (योहा १४:७) म्हणून, यहोवा जसा त्याच्या विश्‍वासू सेवकांना पुन्हा जिवंत करण्यास आतुर आहे तसं आपणही त्यांना भेटण्यास आतुर आहोत.—ईयो १४:१४, १५.

यहोवा अव्यवस्था माजवणारा देव नसल्यामुळं पुनरुत्थानसुद्धा टप्प्या-टप्प्यानं व्यवस्थित होईल, अशी आपण खातरी बाळगू शकतो. (१करिं १४:३३, ४०) आताच्या दिवसात अंत्यसंस्कारांची तयारी करावी लागते, परंतु पुनरुत्थानाच्या वेळी प्रिय जनांच्या स्वागतासाठी तयारी करावी लागेल. आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावल्याचं दुःख हे नेहमीच असतं; पण काही प्रसंगी जेव्हा त्यांची जास्तच आठवण येते, तेव्हा तुम्ही पुनरुत्थानाचा प्रसंग कसा असेल त्याची कल्पना करता का? (२करिं ४:१७, १८) खंडणीची तरतूद केल्याबद्दल आणि पुनरुत्थानाची आशा बायबलमध्ये दिल्याबद्दल तुम्ही यहोवाचे आभार मानता का?—कल ३:१५.

  • पुनरुत्थानाच्या वेळी तुम्ही तुमच्या नातेवाइकांपैकी किंवा मित्रांपैकी खासकरून कुणाला भेटू इच्छिता?

  • बायबलमध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांपैकी तुम्ही खासकरून कुणाला भेटू इच्छिता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा