वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 मार्च पृ. ५
  • विश्‍वासू ईयोब आपलं दुःख व्यक्‍त करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासू ईयोब आपलं दुःख व्यक्‍त करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 मार्च पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब ६-१०

विश्‍वासू ईयोब आपलं दुःख व्यक्‍त करतो

ईयोबाचे तीन मित्र

ईयोबावर आलेल्या संकटांमुळं तो कंगाल झाला. मुलं गमावल्यामुळं तो दुःखी झाला होता. भरीत भर म्हणजे त्याला एक भयंकर आजारही झाला. तरीसुद्धा तो यहोवाशी विश्‍वासू राहिला. तो त्याची एकनिष्ठा सोडत नाही हे पाहून सैतानानं त्याला आता दुसऱ्‍या पद्धतीनं त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्यावर आलेल्या संकटांमुळं तो निराश झाला आहे हे पाहून, सैतानानं या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे ‘मित्र’ म्हणवणारे तिघं जण त्याला सांत्वन देण्यासाठी आले. ‘तुझी परिस्थिती पाहून आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय,’ अशी खोटी सहानुभूती त्यांनी त्याला दाखवली. त्यानंतर ते त्याच्याबरोबर सात दिवस शांतपणे बसून राहिले. ईयोबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांनी तोंडून एकही शब्द काढला नाही. सातव्या दिवसानंतर मात्र त्यांनी त्याच्यावर एकावर एक आरोप लावायला सुरुवात केली.

मानसिक तणावातही ईयोब यहोवाशी एकनिष्ठ राहिला

६:३; ७:१६; ९:२०-२२; १०:१, १२

  • ईयोबावर आलेल्या परिस्थितीमुळं तो अत्यंत दुःखी झाला आणि यामुळं त्याचा दृष्टिकोन बदलला. आपण विश्‍वासू राहिलो किंवा नाही राहिलो तरी याचा देवाला काही फरक पडत नाही, असा त्यानं चुकीचा समज करून घेतला

  • तो इतका निराश झाला की, आपल्यावर ही संकटं का आली याची इतरही काही कारणं असतील, याचा विचारदेखील त्यानं केला नाही

  • पण, दुःखानं इतकं बेजार झालेलं असतानाही त्यानं, यहोवावर त्याचं प्रेम आहे हे त्याच्यावर आरोप लावणाऱ्‍यांना बोलून दाखवलं

ईयोबाच्या शरीरावर फोड उठले आहेत
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा