वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१५ पृ. २
  • तुमची मुलं तयार आहेत का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची मुलं तयार आहेत का?
  • आपली राज्य सेवा—२०१५
आपली राज्य सेवा—२०१५
km १२/१५ पृ. २

तुमची मुलं तयार आहेत का?

१. शाळेत जाणाऱ्‍या मुलांनी कशासाठी तयार असलं पाहिजे?

१ तुमच्या मुलांना शाळेत नक्कीच बऱ्‍याच आव्हानांचा आणि दबावांचा सामना करावा लागत असेल. त्यासोबतच त्यांना “सत्याविषयी साक्ष” देण्यासाठी अनेक संधीदेखील मिळत असतील. (योहा. १८:३७) यासाठी ते तयार आहेत का?

२. मुलांनी आव्हानांना तोंड देण्यास तयार असण्यासाठी त्यांना कायकाय माहीत असलं पाहिजे?

२ एखाद्या राष्ट्रीय समारंभात किंवा सणासुदीत नेमकं काय केल्यानं एखादी व्यक्‍ती त्यात सहभागी होते, हे आपल्या मुलांना माहीत आहे का? या समारंभात किंवा सणात भाग घेणं चुकीचं का आहे हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे का? शाळेत त्यांना शिक्षकांकडून आणि मित्रांकडून उच्च शिक्षण घेण्याबाबत, डेटिंग करण्याबाबत, बेकायदेशीर रीत्या मद्यपान किंवा ड्रग्स घेण्याबाबत दबाव येऊ शकतो. या दबावांचा सामना करण्यासाठी ते तयार आहेत का? त्यांचं उत्तर फक्‍त, ‘आमच्या धर्मात या गोष्टी चालत नाही,’ इतकंच असेल, की ते आपला धार्मिक विश्‍वास काय आहे हे चांगल्याप्रकारे समजावू शकतात?—१ पेत्र ३:१५.

३. मुलांना तयार करण्यासाठी पालक कौटुंबिक उपासनेत काय करू शकतात?

३ कौटुंबिक उपासनेचा उपयोग करा: संपूर्ण शालेय वर्षादरम्यान तुमच्या मुलांसमोर येणाऱ्‍या समस्यांबद्दल तुम्ही त्यांच्यासोबत नक्कीच चर्चा करत असाल. त्यांच्या या समस्यांकडं तुम्ही जातीनं लक्ष देत आहात हे पाहून तुमच्या मुलांचा आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक उपासनेदरम्यान तुम्ही ही चर्चा करू शकता. शाळेत त्यांना कुठल्या गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते हे तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्ही त्यांच्याशी काही विषयांवर पूर्वीसुद्धा चर्चा केली असेल. त्याच विषयांची तुम्ही आता उजळणी करू शकता कारण आता मुलं थोडी मोठी झाली आहेत आणि त्यांची समजशक्‍तीही वाढली आहे. (स्तो. ११९:९५) तुम्ही त्यांच्यासोबत सराव करू शकता. त्यात तुम्ही एखाद्या शिक्षकाची, शालेय सल्लागाराची किंवा शाळासोबत्याची भूमिका करू शकता. बायबलमधून उत्तर कसं द्यायचं आणि आपल्या प्रकाशनांचा वापर कसा करायचा ते तुमच्या मुलांना शिकवा. एका आईनं तिच्या मुलांसोबत असाच सराव करून त्यांना तयार केलं. दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर नवीन शिक्षकांना, आपण यहोवाचे साक्षीदार आहोत, हे कसं सांगायचं, ते तिनं त्यांना शिकवलं.— टेहळणी बुरूज, १५ डिसेंबर २०१०, पृष्ठं ३-५ पाहा.

४. पालक सुज्ञतेनं काय करू शकतात?

४ शेवटल्या काळात ख्रिस्ती तरुणांना बऱ्‍याच “कठीण” आव्हानांना तोंड द्यावं लागेल. (२ तीम. ३:१) पालक सुज्ञतेनं याची जाणीव ठेवू शकतात. (नीति. २२:३) म्हणून आपल्या मुलांना या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार व्हायला होता होईल तितकी मदत करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा